आठ तास पूर्ण झोप झाल्यावर आम्ही सगळे चांगले फ्रेश झालो होतो शिवाय आजचा दिवसही तसा आरामाचाच होता.. आज हिक्किम आणि अशी छोटीशी डे ट्रीप करण्याचा इरादा होता. हिक्कीम हे जगातलं सगळ्यात उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस आहे. लांगजा हे डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटस गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा दहा एक घरांची वस्ती, हे जास्त योग्य वर्णन होईल.
आज आम्ही 4450 मीटरपर्यंत उंचीवर जाणार होतो आणि त्यामुळे आजपासून आम्ही ए एम एस साठी असणारी औषधे ज्येनांसाठी तरी चालू केली होती. शिवाय उंचीशी सवय व्हावी म्हणून आजचा दिवस तसा छोटासाच ठेवला होता.
दिवस छोटासाच होता पण आजूबाजूचे नजारे अप्रतिम होते ...किती ठिकाणी थांबू आणि किती फोटो काढू असं काहीस आमचं झालं होतं.
एव्ह्ड्या उन्चीवरचा हा प्रदेश ... गार हवा .. पण डोन्गर मात्र सगळे बोडके ...काहीच बोलू नये ,, फक्त हिमालय डोळ्यात भरून घ्यावा असं आमचं सगळ्यान्चं होत होतं...
गेल्या वर्षी या भागात आम्हाला ब्लू शिप ची एक झुंड बघायला मिळाली होती त्यामुळे आमचं त्यावर लक्ष होतंच, आणि तीन-चार ब्लू शिपचा एक ग्रुप आम्हाला दिसलाच... फोटो काढायला मात्र अजिबात जमलं नाही
हिक्कीमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायला मात्र चांगलाच चढ-उतार करावा लागतो आज औषध न घेतल्याचा शहाणपणा केल्यामुळे अमितला थोडा त्रास होत होता. माझ्या आई-बाबांनीही खाली न उतरण्याचा ठरवलं.शेवटी मी सुरभी आणि अमितचे आईबाबा असे चौघे खाली निघालो या सगळ्या चर्चे मात्र मी कॅमेरा बरोबर घ्यायचं विसरले त्यामुळे हिक्किम मधला हा एकच फोटो आम्ही वर येताना काढलेला आहे
पोस्ट ऑफिसात तसंही काही विशेष बघण्यासारखं होतं असं नाही, पण गेल्यासारखा हिक्किम पोस्ट ऑफिस बोर्ड बरोबर फोटो काढायला मला आवडलं असतं. इथून आम्ही घरापर्यंत काही पोस्ट कार्ड पोस्ट केली.गंमत म्हणजे आठवडाभरात ती घरात पोहोचली सुद्धा
हिक्किम्हून निघालो आणि रस्त्यावर बर्फ लागायला लागला...बर्फ बघून माझी लेक लगेच खाली उतरली आणि मग दमणूक बाजूला ठेवून आम्हीही खेळून घेतलं...
आता भूक लागायला लागली होती त्यामुळे हा एक एकत्र फोटो काढ्ला आणि परतीच्या रस्त्याला लागलो ....
तरी येताना काही फोटो काढ्ले गेलेच ..इथे द्यायचा मोह पण आवरत नाहिए...