कृती:-
एकदम सोप्पी कृती आहे. सगळी तयारी करुन हाताशी ठेवा.
जाड कढईत तुपात अगदी मंद आचेवर कणीक भाजायला घ्या. सतत कालथ्याने हलवुन भाजत रहायला हवी, खमंग वास आला रंग बदलला की मग दुधाचा हबका (जसा लाडू करताना बेसन भाजल्यावर) मारा. याने कणीक रवाळ होईल.
ह्या वड्या करायला अगदी सोप्या आहेत. गाजराचा कीस, साखर, दूध, खवा इत्यादींचं प्रमाण बिनचूक माहिती असेल तर शब्दशः डोळे मिटून वड्या होतात. ह्या वड्या यंदाच्या मोसमात मी पहिल्यांदा केल्या त्याच मुळी १ जानेवारीला, म्हणून म्हटलं इथे साग्रसंगीत लिहूया जेणेकरून सृजनाच्या वाटामध्ये लिहायला माझी 'सुरूवात' होईल.
वड्या करण्यासाठी साहित्यः
गाजराचा कीस - ५ वाट्या
साखर - ३ वाट्या
दूध - २ वाट्या
खवा - १ वाटी
वेलची पूड - ३ टी स्पून
बदाम/ काजू/ पिस्त्याचे काप सजावटीसाठी