फार म्हणजेच फारच उशीराने, मे-जून मध्ये केलेल्या भारताच्या ट्रिप बद्दल आता पाच महिने होऊन गेल्यावर अखेरीस त्याबद्दल पोस्ट करायला सुरुवात करते आहे.
ही बरीचशी दैनंदिनी आहे, थोडं प्रवास वर्णन आहे, भारतातल्या तीन चार आठवड्यांच्या वास्तव्यात दिसणारे, जाणवणारे बदल, येणारे अनुभव, त्याबद्दलचे जरा विचार असं सगळंच आहे. अनेक वर्ष भारता बाहेर राहून प्रत्येक भारतवारी वेळी अनेक बदल दिसतात, कळत नकळत दोन्हीकडची तुलना पण होत असते. काही व्यक्तिगत बाबी तर काही माझ्यासारख्या अनेकांना अश्या वेळी जाणवत असतील अश्या गोष्टी.
कधी जायचं भारतात यासाठी सृजन रोज Countdown करत होता, त्यालाही खूप दिवसांनी विमानात बसायला मिळणार होतं. आईची जय्यत तयारी चालू होती. तुम्ही आले की हे करायचं, ते करायचं याच्या याद्या वाढत होत्या. त्या आधीपासून बाबा म्हणत होते की घराला रंग देऊ, आई म्हणत होती आता कशाला? नको एवढ्यात. पण मग मी येणार हे ठरल्यावर बाबा जिंकले आणि रंगाचे काम झाले, त्यामुळे घर पण सगळं सजून धजून होतं. मधल्या काळात घरात नवीन सोफा आला, गार्डन मधल्या फरश्या बदलल्या, नवीन पडदे लागले असे बरेच बदल होते. घरातलं आंब्याचा झाड वाढलं आहे, त्याला कैऱ्या आल्यात त्या बघायच्या होत्या. शक्य त्या सगळ्यांना भेटायचं होतं.