लेकीची शाळा, नविन वर्षं सुरू झालं आणि अचानक मला माझ्या शाळेतली एक गमाडीगंमत आठवली. लेकीला ती शिकवण्याच्या निमित्ताने बर्याच दिवसांनी हस्तकलेचा अनुभव घेतला.
ती गंमत म्हणजे शाळेचं वेळापत्रक. आठवतंय का कोणाला? पुठ्ठ्याचं, दोन्ही बाजूनं उघडणारं आणि जादूनं केवळ तीनच दिवसांचं वेळापत्रक दाखवणारं? आठवलं?
लेकीनं - लारानं - बनवलेलं हे पॉलिमर क्लेचं गणपती पेंडंट. सध्या नुसतंच आहे. हेडपिन लावून मग बेक केलं की पेंडंट म्हणून वापरता येईल.
इंटरनेटवरच्या कोणत्याश्या गणपतीच्या फोटोवरून लारानं हे बनवलं आहे. केशरी रंगाची पॉलिमर क्ले लाटून त्यातून गणपतीच्या कोलाजचे तुकडे एका टूलनं कापून घेतले आणि दुसर्या चौकोनी पॉलिमर क्लेच्या तुकड्यावर चिकटवले आहेत.