ही दोन पेन्सिल स्केचेस म्हणजे "चित्रं काढायचं" म्हणून नीट वेळ काढून बसून काढलेली आहेत. पेन्सिल आवडतं माध्यम आहे पण रंगीत पेन्सिलीने जास्त काही केलेलं नाही. ही सफरचंदं पहिलीच!
हा माझा लेख माबोवर आणि माझ्या ब्लॉगवरही आहे. इथल्या मैत्रिणींपैकी ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी परत टाकतेय.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01 Ganesha-stone.jpg
एक कविता सगळ्याजणींसाठी , आशा करते की आवडेल :) , हा एक अनुवाद आहे -
विषय असा- एखादी साधी मधुर रचना असते. निखळ आनंद देते ती वेदना पोचवतानाही.वेदनेला सुंदर करण्याची ही प्रेरणा कविताच देत असते .. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते जवळ राहूनही कधी कळलंच नाही. आपणही संकोचाची सीमा ओलांडू शकलो नाही. अगदी सर्वसामान्य स्त्रीच्या भावजीवनात घडू शकणारी गोष्ट.’ Union Square’(1911) या SARA TEASDALE (1884–1933) यांच्या याच विषयावरील कवितेत मन असं गुंतून पडतं की जणू ही काल-आजची गोष्ट आहे !पण या कवितेचा शेवट मात्र विलक्षण धीट आहे.खिन्न करणारा आहे. तो आजच्या काळातही पचवायला जड वाटेल ..
नमस्कार मैत्रिणींनो,
बरेच दिवस येणार येणार जे ऐकत आहात त्या 'नी' ब्रॅण्डची एक सुरूवातीची झलक फक्त मैत्रिण वरच्या मैत्रिणींसाठी आणते आहे.
मी डिझाइन केलेली विविध धातूंच्या तारा वापरून बनवलेली काही कानातली लवकरच आणणार आहे.
सध्या केवळ कानातल्यांचेच कलेक्शन असेल.
तांबे, पितळ आणि जर्मन सिल्व्हर या तीन धातूंच्या तारांमधून ही कानातली बनवलेली असतील.
प्रत्येक कानातल्यामधे केवळ एकच वा दोन धातूंचा वापर असेल.