बरोबर ४:३० वाजता सर्व मैत्रिणी - १२ जणी जय्यत तयारीनिशी सौ. किरण गोखले, हिचे घरी पोहचलो. तशी तिची तब्येत ठीक नसते म्हणून अर्धा तास आधी एकीने जाऊन आम्ही येत असल्याची पूर्व सूचना दिली होती. एक आगळा-वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. किरणही छानशी तयार झालीच झेपत नव्हते पण.....
डायनोसॉर गेले आणि पृथ्वी माणसांना राहायला सुरक्षित झाली. पृथ्वीवर पहिला माणूस बनून येण्याचे भाग्य प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे अॅडम. आज जगात असणार्या बर्याच गोष्टींचा (माणसांसकट!) आद्य जनक म्हणून अॅडम ओळखला जातो. पृथ्वीवर आल्यानंतरच्या त्याच्या अनुभवांबद्दल त्याने विपुल लिखाण करून ठेवले आहे. रिसायकल करता येण्याजोग्या (अॅडम हा जागरूक पर्यावरणवादी होता) भूर्जपत्रांवर सदर दस्तऐवजीकरण त्याने करून ठेवले आहे. त्याची पत्नी इव्ह. अॅडमाची साजेशीच त्याची ही अर्धांगिनी होती. तिच्याही नावावर अनेक शोध नमूद केलेले आहेत.
लेकीसाठी घरी बसण्याचा निर्णय घेतला खरा पण रिकामी वेळ मेंदू कुरतडू लागला ... छंद जोपासू म्हटलं तर खास काही छंद ही नव्हते ,वाचन सुरू होत म्हणा पण तरी काही तरी कर चा भुंगा पाठ सोडत नव्हता ...
त्यात नवऱ्याने गरज नसताना उगाच एके ठिकाणी पैसे उधळले ,(जी अर्थात त्याची नेहमीची सवय आहे म्हणा ) तेंव्हा माझी सटकली :raag: नी म्हटलं बघ मी पण कसे उधळते नको तिथे ...नी जाऊन शिवणाचे मशीन आणले ... मी याला उधळणे म्हणाले कारण माझा नी शिवणाचा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता उलट लहानपणी आईच्या मशीनवर ,'शिकव ना मला' म्हणून बसले तर सुईच मोडली तर आई इतकी ओरडली की मी धसकाच घेतला होता शिवनकामाचा...