December 2017

बॉलिवूड गाणी आणि आपण

बॉलिवूड मुव्हीचं, गाणी हे जसं अविभाज्य अंग आहे तसंच ते आपलं ही आहे. आपण कितीही हॉलिवूडपटांची प्रशंसा केली तरी आपल्या आयुष्यातल्या किती तरी आठवणी,क्षण हे ह्या गाण्यांमध्येच गुरफटलेले असतात ...
अचानक एखादं गाणं सुरू होत नी आपल्याला त्या काळात हात धरून घेऊन जात.
होतं ना असं? चला तर मग इथे त्याबद्दलच लिहुया ... गाणी नी त्या भोवती लपेटलेले आपल्या आयुष्यातले हळुवार ,गमतीदार,रोमँटिक प्रसंग. Lovestruck :dhakdhak:

Keywords: 

एअरफ्रायर पाकृ : कुरकुरीत भेंडी

एअरफ्रायर ३६०डी फॅ.ला प्रिहीट करून झाल्यावर त्यात फ्रोझन भेंडी, हळद, तिखट, मीठ घातले. व एअरफ्रायर १०मिनिटाला सेट केला.
अधून मधून भेंड्या हलवल्या.
क्रिस्पि ओक्रा इज रेडी!!

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

एअरफ्रायर पाकृ : स्वीट पटेटो फ्राईज

स्वीट पटेटो/याम/रताळं/बटाटे काही पण घ्या. सालं काढून फ्राईजच्या आकारात कापा. २०-३० मिनिटं बोलमध्ये पाण्यात घालून ठेवा. नंतर बाहेर काढून पेपर टॉवेलने पाणी टिपून ड्राय करा.थोडा ऑलिव्ह ऑइल (किंवा कोणतेही) घेऊन कापांना चोळा.
एअरफ्रायर ३६० डी फॅ ला प्रिहिट करा.
फ्राईज त्यात ओतून १५-२० मिनिटाला सेट करा. अधूनममधून हलवा.
फ्राईज बाहेर काढले की मीठ चोळा. केचपबरोबर खा.

(मला अतिशय आवडले! थोडा आकार नीट आला पाहिजे. व कडा ब्राउन व्हायला नकोत. पण ते सर्व कॉस्मेटिक चेंचेस. चव अतिशय भन्नाट !!)

पाककृती प्रकार: 

ImageUpload: 

२०१७ च्या नोबेल विजेत्या कार्याची तोंडओळख

nobel_weekचित्र सौजन्य : http://www.nobelprize.org

या आठवड्यात स्टॉकहोम, स्वीडन येथे २०१७ च्या नोबेल पुरस्कारांचा वितरण सोहळा आहे. यावर्षीचा ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर हा आठवडा 'नोबेल वीक' म्हणून साजरा होणार आहे.

Keywords: 

उपक्रम: 

घर

घर
या घरात वावरत नाही आताशा कोणी
तसं फार जुनंही नाहीये घर खरंतर
काही दशकं एवढच वय असेल घराचं
फार लाघवी आहे हे घर
फक्त घरातल्यानाच नाही तर
तर जाणाऱ्या येणाऱ्या सगळ्यांना
अगदी मोलकरानासुद्धा जीव लावायचं हे घर
...
काही वर्षांपूर्वी एक कवडसा खेळायचा घरात
अलीकडे डागडुजी, रंगकाम झाल्यामुळे त्याचही येणं थांबलच कायमच.
...
स्वच्छ उन्ह वारा यावा म्हणून आवर्जून बसवलेल्या फ्रेंच विंडो बंद असतात
आणि त्याच्या आत असणारे जाड दुहेरी पडदे देखील ओढून घेतलेत या घरानी
...
या घराला स्मरत असतात साजरे केलेले अनेक उत्सव
घरातल्या सगळ्यांनी मिळून केलेल्या गमती जमती

अळीव लाडू

अळीवाचे नारळाच्या पाण्यात भिजवुन , खव लेल्या नारळात शिजवून करतात . हे ला डु टिकण्यासाठि फ्रिज मधे ठेवावे लगतात.हा एक वेगळा प्रकार करुन पहा. खरं तर आरोग्यासा ठी बारमाही करायला हरकत नाही. वाढत्या वयाच्या मुलांना ,व्रुद्धांना आणि आपल्यासाठी हि गुणकारक आहेन्त. रुतुमाना प्रमाणे काही जिन्नसात फेर- फार केला तर वर्षभर ही करता येतील.
साहित्य : अळीव २०० ग्राम
खारीक पूड २०० ग्राम
डिन्क पाव वाटी
कणिक २ वाटी
बेसन १ वाटी
नाचणी १ वाटी
वेलची पूड
तूप २५० ग्राम
गूळ पावडर / किसलेला गूळ ३०० ग्राम

पाककृती प्रकार: 

आंखो मे क्या!

गर्दीमधल्या चेहर्‍यांची एक गंमत असते. हे चेहरे स्वत:शी फार प्रामाणिक असतात. “चार लोकांमध्ये” असूनदेखील कसलाही अभिनय करत नसतात. सच्चे असतात. मला म्हणूनच गर्दीमधल्या अशा चेहर्‍यांकडे बघत फिरायला फार आवडतं. प्रवासामध्ये किंवा इतरत्र कुठेही लोकांचे चेहरे निरखायचा, त्या चेहर्‍यामागे नक्की कसला विचार चालू असेल ते बघायचा मला एक आगळाच छंद आहे. ही व्यक्ती मला जशी दिसली तशीच प्रत्यक्षातही असेल असं नाही, किंबहुना, या व्यक्तींकडे बघताना माझा जो काही चष्मा होता त्यातूनच मी पाहिलं असणार.

लेख: 

मदतीसाठी आवाहन.

मैत्रिणींनो,
आमच्या अतिशय जवळच्या कुटुंबातली ९ वर्षाच्या चिमुरडीच्या तातडीने करायच्या हृदय प्रत्यारोपणासाठी मदत हवी आहे.

नाव: रेवती महेंद्र देशपांडे वय: ९ वर्षे
राहणार: जुन्नर, जिल्हा पुणे
आजार: Myocarditis (कमकुवत हृदय)
उपचार: Heart Transplant (हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया)

माझा विरंगुळा ( भरतकाम )

भरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.

Keywords: 

कलाकृती: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle