December 2017

फुकरे रिटर्न्स

फुकरे रिटर्न्स पाहिला..... आवडेश....चुचा आधीसारखाच मस्त.....नंतर लिहीन सविस्तर
पण साधारण सिक्वेल भ्रमनिरास करतात त्यामुळे साशंक होते.त्यात सिनेमा सुरू व्हायच्या थोडंच आधी रिव्ह्यू चांगला नाही हे समजलं.पण मस्त मॅडनेस अनुभवला

Keywords: 

'ती' (भाग-१)

ती ( भाग - १ )

आज ८ डिसेंबर. तिचा वाढदिवस. पण ........
काय काय करावे काही सुचेना असं झालय. ....विचार करता करता आठवतंय आमच्या विवाहाची तारीख२१ नोव्हेंबर.आणि २७ ला आम्ही दोघे ह्यांच्या नोकरीच्या गावी गेलो होतो.सवय नसल्याने कसंबसं काम निभवत होते अन् चमत्कार झाला म्हणायचा -' ती ' आली माझ्या घरी.... आनंदी आनंद गडे.......
कामात हुश्शार असावी हे पहाताच कोणीही जाणावे अशी. देखणी देखील.येताच कामास लागली.
ही ख़ुशी कोणाबरोबर शेयर करावी हे ही उमजेना. गावात नवीन,शेजारी-पाजारी तेवढी ओळख नाही.

लेख: 

' ती ' (भाग-२)

ती ( भाग - २ )

ही माझी लाडकी मदतनीस व साथीदारीण कोण ?पाहिलत का ? म्हणून तर या- या म्हणत बोलाविले ना. अहो ही माझी आवडती '' gasशेगडी '' गेली ४६ वर्षे मी ती सतत वापरत आहे. लग्ना नंतर इतक्या लवकर मला ' ती ' मिळाली आणि स्वयंपाकासाठी कोळशाची शेगडी किंवा भुसा-शेगडी किंवा स्टोव्ह या साधनांचा उपयोग जास्त करावा लागला नाही जे मला जमत नव्हते.तसेच त्या छोट्या गावात gasएजन्सी नव्हती तर एका दुकानदाराने भोपाळून आणून दिली होती व तोच दोन महिन्यांनी तिचे स्पेशल खाद्य म्हणजे नवीन सिलेंडर आणून देत असे.कालांतराने गावात एजन्सी आली.तिची बटणे फक्त एकदाच बदलली आहेत.

लेख: 

डूड्ल, मंडल, रेघोट्या अन काहीबाही

खरतर हे आगाऊचे खरडकाम तुमास्नी दावू कि नको असं होत होतं पण बस्कुबायने लय मोटिवेट केलं तवा कुटं धीर धरुन आज फोटो टाकणार हाय मी इतं..

तशे थोपू अन इंस्टा फिंस्टावर टाकत असतो मी अदुनमदुन पण सार्यासयले दिसत नाइ ना थे.. निस्त्या लिश्टीतल्या मैत्रीणीले दिसते म्हणुन इथं टाकाचा प्रपंच..

इथल्या मोठ्या मोठ्या आर्टिश्ट मैतरणींमंदी आपलाबी एक पैसा मनलं.. घ्या जमवून..

तर..उगाच काहितरी गिरगिटणं म्हणुन सुरु केलेला हा अजुन एक छंद..
माबोवर रारने तिचं काम टाकलेलं तेव्हा लक्षात आलं कि अरे ये तो अपुनबी करता हय..पण मग तिथे धागा काढायचा राहूनच गेला..

Keywords: 

कलाकृती: 

गरम मसाल्याची आमटी

हा खास कोकणी पदार्थ. घरच्या तांदळाचा मऊ वाफाळता भात, ही खमंग आमटी आणि वरून साजूक तुपाची धार... अहाहाहा!! सोबत कोकाणातला धुवांधार पाऊस असेल तर आमटीचा महिमा वर्णावा किती!!!!!

तर अशी ही गरम मसाल्याची आमटी चार वाट्या करायची असेल तर साधारण प्रमाण पुढीलप्रमाणे:

तुरीची डाळ - अर्ध्या वाटीपेक्शा थोडी कमी. स्वच्छ धुवून मऊ शिजवून घ्यायची, शिजवलेली डाळ साधारण पाऊण वाटी.
कांदे - दोन मध्यम
सुक्या खोबर्‍याचा तुकडा - अर्ध्या वाटीतला अर्धा तुकडा.
लसणी - ५-६
काळी मिरी - ७-८ दाणे
लवंगा - ४-५
दालचिनी - इन्चभर तुकडा
बडीशेप - १ टि स्पून
खसखस - अर्धा टिस्पून

पाककृती प्रकार: 

मुक्त १

सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.

लेख: 

मुक्त २

अम्मा मग मुंबईला गेल्या . श्रीकांत ची तयारी सुरु झाली लंडन ची आणि सुधाने थोडे दिवस मुंबईला राहायचे असा ठरले . घर बंद केले. सगळे दागिने लॉकर मध्ये ठेवले. अम्मा नाराज कारण त्यांना लॉकर आवडत नाही . पण प्रॅक्टिकल विचार तोच होता.

कांजी एक जपानी अनुभव!

सारखे सारखे काय जपान बद्दल लिहायचे? कंटाळा नाही का येत? येतो ना.. पण लिहायला दुसरे काहीच नाहीच आहे. मग गप्प बसावे. ते जमले असते तर??? असो.

लेख: 

मुक्त

सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.

एक आगळे वेगळे ट्रेनिंग ( Retirement and Investment Planning )

प्रत्येक संस्था, कार्यालय आपल्या मनुष्य बळ विकासासाठी अनेक प्रकारचे ट्रेनिंग, मीटींग्ज, सेमिनार इ. सारखे कार्यक्रम हाती घेत असते. यामुळे त्या संस्थेचा फायदाच होत असतो. पण निवृत्त होणार्‍या स्टाफला आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने कसे घालविता येईल याचे ट्रेनिंग देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मोजक्या संस्था मला माहित आहेत त्या पैकी आमचं ऑफिस एक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे . नुकतीच मी Retirement and Investment Planning ह्या ट्रेनिंगला जाऊन आले आणि त्याने मी अक्षरशः प्रभावित झाले आहे.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle