मनीमोहोर यांचा रिटायरमेंट प्लॅनिंग वरचा लेख वाचुन मी माझ्या आईच्या रिटायर्ड लाइफ बद्दल लिहिलेला हा लेख आठवला, तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला म्हणुन इथे देतीये,
जुनाट समाधिस्थ
निळसर सुस्त शिखरे
तापून लालभडक झाली तेव्हा,
निरभ्र नभाचे किनारे
हळूहळू पेट
घेऊ लागले तेव्हा,
लोहाराचा भाता फुलून
अग्निफुलांचा
पाऊस पडू लागला तेव्हा,
करपट धुराचे लोळ
स्वच्छ ढगांना खाऊन
ढेकरा देऊ लागले तेव्हा,
हिरवे जिवंत रान
भान विसरून
राखेत उडून जाऊ लागले तेव्हा,
कपारींना जाग येऊन
आवाजाचे कोलाहल
उतू जाऊ लागले तेव्हा,
ओलसर शेवाळलेली जमीन
रुसून एकेका भेगेत
लुप्त होऊ लागली तेव्हा,
मिळकत कर अर्थात इन्कमटॅक्स भरणे, त्यासंबंधीचे वाचन, तो कसा कमी करता येईल यासाठीच्या कायदेशीर बाबी या गोष्टी आवडणार्या व्यक्ती विरळाच असतील. पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करणारे सीए वगैरे मंडळी आणि काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे लोक (ज्यात माझा नवरा मोडतो) सोडले तर हा सगळा अत्यंत कंटाळवाणा, रूक्ष प्रकार आहे हे बहुतेक सगळे जण मान्य करतील. पण जपान सरकारने या वार्षिक करभरणीला एक वेगळेच परिमाण दिले आहे. आता कर वाचवण्यासाठीची तरतूद ही अत्यंत नीरसपणे एक काम उरकून टाकल्यासारखी करावी लागत नाही तर बरेच जपानी अगदी वेळ ठरवून सगळ्या कुटुंबाबरोबर बसून हसत खेळत हा कार्यक्रम पार पाडतात.
पूर्वतयारी
मैत्रीण वरच्या अनेक मैत्रिणींनी कित्ती मदत केली, माहिती पुरवली. आणि जुलै मधे नाही पण ऑक्टोबर मधे अखेर मी लेकाकडे पोहोचले. अगदी व्हिसा काढण्यापासून विमानात बसण्यापर्यंत बस्के, मृदुला, धारा, स्वाती २, सायो, रायगड, गौरी, मिनोती, मोनाली, लोला, मी अनु, आशुडी, चना, विनी, कविता, सन्मि, अकु,... सगळ्यांनी माझं येणं इतकं म्हणून सुकर केलं. तुम्हा सगळ्यांना थांकु थांकु थांकु
इंजियानातलं कोलंबस एक छोटंसं गाव. मुळात हे खूप जुनं गाव. 1821 च्या सुमारास याला कोलंबस हे नाव दिलं गेलं. कोलंबस नावारुपाला आलं के तिथल्या कोलंबस- मॅडिसन रेल्व लाईनमुळे. अनेक उत्पादक संस्था तिथे उभ्या राहिल्या. नोबलिट्ट स्पार्कस इंडस्ट्री ( Noblitt-Sparks Industries) , अॅरव्हिन इंडस्ट्री Arvin Industries - आताची मेरिटॉर (Meritor) , कमिन्स (Cummins, Inc)अशा अनेक इंडस्ट्रिज तिथे निर्माण झाल्या.
हे एक कोलंबस जवळचं छोटंस टुमदार गाव. खरं तर खूप फिरणं अपेक्षित नव्हतं या ट्रिपमधे. पण लेकाची नवीन गाडी अन त्यातून आसपास थोडं फिरणं तर झालच. मग तो संध्याकाळी घरी आला की एक लॉंग ड्राईव्ह व्हायचा. अशाच एका लॉंग ड्राईव्हला लेकाने हे नॅशव्हिल दाखवलं. माझी चित्रकला अन एकंदर कलाप्रेम त्याला चांगलच माहितीय, मग ह्या गावाला भेट देणं त्याने ठरवून ठेवलेलं :)