May 2024

मोड़ तो आए, छाँव ना आए- अर्थात Midlife मधली मनाची तगमग

चाळीशी ते साठीच्या दरम्यान आयुष्य निरर्थक वाटणं, ध्येय किंवा उद्दिष्टांबाबत गोंधळ होणं किंवा ती नाहीत असं वाटणं, आपल्या अपेक्षेनुसार एखादं नातं उंचीवर गेलं नाही ह्याची तळमळ वाटणं, आपण आता जे करत आहोत त्याची पाळंमुळं आपल्या बालपणात शोधत बसणं. आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना न स्वीकारता आल्याने दिशाहीन वाटणं, धड तरुणही नाही आणि धड म्हातारंही नाही अशी शरीराची सुद्धा चढावरून उताराला लागायची सुरुवात नकोशी वाटणं. वरवरच्या कलकलाटात आतून रिक्त वाटत रहाणं - याला ढोबळपणे Mid life मधली तगमग म्हणता येईल. पण हे याच वयात अशाच पद्धतीने व्हायला हवं याला काही आधार नाही.

झपूर्झा गडे झपूर्झा - एक सुंदर अनुभूती!

नुकत्याच केलेल्या भारतवारीत पुण्यात आठवडाभर होते. तेव्हा एक दिवस झपूर्झा म्युझिअमला जाण्याचा योग जुळून आला. फार सुंदर म्युझिअम आणि संपूर्ण परिसर, आणि अनुभव! त्या अप्रतिम अनुभवाला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते.

z1.png

बावधान भागातून साधारण ४०-४५ मिनीटे अंतरावर खडकवासला तलावाच्या काठावर, निसर्गरम्य परिसरात हा म्युझिअम उभारला आहे. दागिन्यांकरीता प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ यांचा हा उपक्रम आहे. त्यांच्या वेबसाईटवरून ही माहिती इथे पोस्ट करते.

Keywords: 

घोटाचे सासव

कोकणात आंब्याच्या मोसमात आमच्याकडे कोयाडे खूपदा केले जाते, पण त्याचा हा गोवन चुलतभाऊ एकदा करून बघायचा होता. 'घोट ' म्हणजे रायवळचे लहान गोलसर आंबे. पिकल्यावर आंबटगोड चव लागणारे आणि बाठीला भरपूर रेषा असणारे कुठलेही लहान गावठी आंबे चालतील. हापूस चुकूनही नको. (तोतापुरी तर नकोच नको, त्याला मी आंबाच म्हणत नाही. आंब्याच्या बाबतीत आहे बाबा मी रेसिस्ट!!)

सध्या घरी मला आवडतात म्हणून आलेली एकच पायरीची पेटी सगळ्या हापूसमधून टुकटुक करत होती. मग त्यातलेच तीन आंबे घेतले. खाणारी दोनच माणसं म्हणून!

पाककृती प्रकार: 

ओडिशा भटकंती

येत्या जूनमध्ये ओडिशाला जायचा योग येतो आहे. सध्या तरी भुवनेश्वर, पुरी, कोणार्कचे सूर्यमंदिर आणि चीलीका सरोवर इतक्या जागा यादीत आहेत.

तेव्हा, ओडिशा भेटीविषयी इथे गप्पा मारुया. :-)
काही सूचना, सल्ले, संकेत, मज्जा, चांगल्या वाईट आठवणी नक्कीच सांगा.

Odisha
(चित्र सौजन्य : https://incredibleodisha.in/odisha-tourism/)

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle