सक्युलंट्स... ही वेड लावणारी सुंदर झाडं माझ्या बागेत चांगलीच रुजली आणि बहरली. आता त्यांचं प्रपोगेशन करणंही चांगलंच जमायला लागलंय. त्यामुळे मला त्यांच्यासाठी नवीन प्लांटर्सची म्हणजेच कुंड्यांची सातत्याने गरज भासते. यावेळी नवीन प्लांटर्स आणण्याऐवजी म्हटलं आपल्या लॉन्ग लॉस्ट छंदाला जवळ करूया. सिरॅमिक्स.
मग आणली माती आणि तयार केले हे सुक्युलंट प्लांटर्स.
छान रंगात रंगवले आणि माझ्या सक्युलंट्सना नवीन घरं मिळाली.
सिरॅमिक मी शिकले शाळेत असताना. माझ्या घराच्या शेजारी एक ताई रहायची तिच्याकडून एका उन्हाळ्याच्या सुट्टीत.
बर्याच वर्षांनी हात शिवशिवत होते काहितरी नवीन करायला. म्ह्णून हे परीचं घर केलं.
नवरात्र आणि सणासुदीसाठी नी चे स्टेटमेंट इअरिंग्ज कलेक्शन.
खोकला, मनगटाची जुनी इंजरी, सायटिका अश्या सगळ्यांनी एकाच वेळेला हल्ला करायचे ठरवल्याने कलेक्शन यायला जाहिर केल्यापेक्षा तब्बल ४-५ दिवस उशीर लागला. पण कलेक्शन आले ना बहिणींनो! :)
हे सगळे कलेक्शन आणि इतरही अजून वस्तू प्रत्यक्ष बघणे, ट्राय करणे आणि मग आवडल्यास खरेदी किंवा आपल्या मनाप्रमाणे काही बदल करून नवीन दागिना बनवून घेण्याची ऑर्डर देणे वगैरेमधे इंटरेस्ट असेल तर पुढच्या वीकेंडला मी ठाण्यात येऊ शकते. नंतर पुण्यातही येणार आहे.
मी व आपली इथलीच मैत्रिण स्नेहश्री आम्ही मिळुन काही फुड प्रोडक्टचा बिजनेस करु असे ठरवले. अनायसे, मी गव्हाचे सत्व करत होते तेव्हा त्यासाठी त्याचे "न्युट्रिशनल" हे ब्रँड नेम व फेसबुक पेज तयार केले होते. तर त्याच नावाने व त्याच पेजवरुन पुढे काही करु असे ठरले. सध्या आम्ही "रक्षा बंधनानिमित्त गिफ्ट हँपर" लाँच केले आहे.