केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
रात्री मुलांना झोपवताना मी एक गाणं बरेचदा म्हणते - 'गोजिरवाणी खार पहा ही, गोजिरवाणी खार!' पूर्वी मुलांना आवडायचं गाणी ऐकणं...आता ती माझीच गरज म्हणून मी घसा साफ करून घेते. हिचं गाणं ऐकण्यापेक्षा पटकन झोपलेलं बरं...असा विचार करून ते लवकर झोपतात हा एक मोठा फायदा! असो!
देवीचं नवरात्र म्हणजेच स्त्री-शक्तीचा सोहळा! घर-दार-कुटुंब सांभाळणारी स्त्री असू दे, काबाडकष्ट करून लेकरांचं भलं होण्याची स्वप्नं पहाणारी स्त्री असू दे, पुरुषी विश्वात आपली दमदार पावलं आत्मविश्वासानं पुढे टाकणारी स्त्री असू दे अथवा आपल्या व्यवसायाचा भला मोठा पसारा एकहाती सांभाळणारी स्त्री असू दे ..... आपण सगळ्या आहोत त्या स्त्री शक्तीचीच रुपं. त्या आदिमाता शक्तीला वंदन!!!
नवरात्री निमित्त मैत्रिणतर्फे आम्ही तुमच्याकरता विविध उपक्रम घेऊन येत आहोत.
ह्या महिन्यात सृजनाच्या वाटासाठी लिहायला मैत्रिणींना वेळ होत नाहीये असं दिसतं आहे. वेळ काढून लिहुयातच काहीतरी छान!
पण तोवर इथे लिहू शकतोच कि.. अगदी एका शब्दात, एका ओळीतही चालेल!
तुम्हांला कोणत्या एका गोष्टीपासून स्वातन्त्र्य हवं आहे? किंवा समाजाला, देशाला, एखाद्या विशिष्ठ भाग अथवा समुदायाला कशापासून स्वातंत्र्य मिळायला हवं अशी तुमची इच्छा आहे?
एका नातेवाईकाकडच्या लग्नात रुखबतात फक्त रुमाल नव्हते म्हणून १ दिवसात करुन दिले सगळ सामान आणण्यापासुनच तयारी होती. घाईघाई मधेच भरतकाम डिझाईन काढण्यापासून केले आहे.
(नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव. माझ्या आजीतल्या स्त्री शक्तीची माहिती देणारे दोन लेख टाकतेय. काहींनी पूर्वी वाचले असतीलही. आज नवरात्रीच्या निमित्ताने इथे टाकतेय)
( हा उत्तरार्ध लिहिताना माझी इतिहासकाराची कवचं काढून ठेवली आहेत; म्हणून ही कथा. या सर्व लिखाणासाठी केवळ माझी आई, मामा, मावशी यांच्या आठवणीच मदत करू शकल्या. कोणतेच लेखी पुरावे नाहीत. त्यामुळे याला मी लेख नाही म्हणु शकत. अन मग कथा लिहायची तर त्याचे काही नियम, काही सवलती मी स्विकारले, घेतल्यात. आशा आहे तुम्ही समजून घ्याल.