April 2018

वाईल्ड वाईल्ड कंट्री - डॉक्युमेंट्रीबाबत चर्चा

नेटफ्लिक्सच्या वाईल्ड वाईल्ड कंट्री बद्दल चर्चा करायला धागा उघडला आहे.
माझी अजून पूर्ण व्हायची आहे. परंतू बोलण्यासारखे खूप आहे.
शीला आनंद काय कमालीची बाई आहे! Lol भारीच..
एनीवे, करा चालू चर्चा. मी येतेच डॉक्यू संपवून.

एक छोटासा लमहा है .... भाग १

एक छोटासा लमहा है ,जो खत्म नही होता
मै लाख जलाता हूं, ये भस्म नही होता....

बाकी कुटुंबाला शक्य नाही तरी बापाकडे हट्ट करून एकटीच स्वतःच्या गावी आलेली , 12-13 वर्षांची मुलगी ...
बापाने पण जीवाचा तुकडा आपल्याच लोकांच्यात तर जातोय म्हणून मना विरुद्ध का होईना पण जायची परवानगी दिलेली ,लाडक्या लेकीला काही कमी पडायला नको म्हणून तिच्या सोबत भरपूर खाण्यापिण्याच्या गोष्टी , तिच्यासाठी तर दिल्याच पण तिथे असणाऱ्या बाकी सगळ्यांसाठी ही दिल्या...

ही निघाली तिच्या स्वप्नातल्या साहसी प्रवासाला... डोळ्यावर चढलेली झोप उतरायच्या आधी गावी पोहचली देखील ...

Keywords: 

एक छोटासा लमहा है .... भाग २

एक छोटासा लमहा है,जो खत्म नही होता,
मै लाख जलाता हूं, ये भस्म नही होता

अचानक कोसळलेल आभाळ , सावरायला बाप नाही ... आई गोंधळून गेलेली पदरात नुकतंच जन्मलेल्या मुलासोबत अजून थोडी मोठी मुलं...
काय झालंय नक्की हे मोठ्यांनाच नीट समजलं नाही तर मुलांना कुठले समजायचे... जगाचे भोचक प्रश्न आणि प्राप्त परिस्थितीत काय करावे हा कठीण प्रश्न ह्यात अडकलेली आई ....

एक जवळचा नातेवाईक घरी येतो ,तिला म्हणतो "तुमच्या मागे आधीच इतके व्याप आहेत ,मी काही दिवस थोरलीला माझ्याकडे नेतो ,बायको माझी नीट काळजी घेईल तिची"

Keywords: 

जावई इन हवाई

प्रभात रोडला राहणार्‍या पांढरकवडे काकूंनी लिहिलेला लेख नुकताच (पुन्हा) वाचनात आला. ('प्रभात रोडला राहणार्‍या' असं लिहिलं त्याला कारण आहे. आईला पांढरकवडे आडनावाच्या तीन मैत्रिणी आहेत. एक प्रभात रोडला राहतात, दुसर्‍या बिबवेवाडीत आणि तिसर्‍या सिडनीत!) आईने त्यांच्यासाठी दिलेलं पार्सल (अर्धा किलो उपवासाची भाजणी. आमच्या घराशेजारच्या किराणादुकानात त्यांच्या घराशेजारच्या किराणादुकानापेक्षा पंचाहत्तर पैशांनी स्वस्त मिळते. खेरीज रोज मी जीआरईच्या क्लासला त्यांच्या घरावरूनच जाते.) त्यांच्याकडे पोचवायला गेले होते, तेव्हा त्यांनी लॅमिनेट करून घेतलेलं लेखाचं कात्रण हळुवारपणे माझ्या हातात ठेवलं.

लेख: 

लता सप्तशति:६: इस दुनिया में जीना हो तो सुन लो मेरी बात.

सुहाना मौसम है, पसीने छूट रहे हैं लेकिन तैरकर कलेजेको ठंडक पहुंचानेका सामान भी रेडी है.
नव्या कळ्या फुलू लागल्यात, वसंताचे आगमन मनाला सुखवून टाकते आहे. आतून एक निखळ आनंदाची खुमारी शरीर मनाला बहर आणते आहे. जीवन हे उपभोगण्यासाठी आहे. सर्व सुखे लुट ण्या साठी आपल्या पुढे हात जोडून उभी आहेत. मग हा नकार का बर. चला आपली सर्व इन्हिबिशन्स सोडा आणि जीवनसागरात डुबकी घ्या. सूर मारा, सर्फ करा .... क्युंकी

इस दुनिया मे जीना है तो सुनलो मेरी बात.
गम छोडके मनाओ रंगरेली. और मानलो जो कहे किटी केली.

जीना उसका जीना है जो हंसते गाते जीले.

Keywords: 

एक छोटासा लमहा है .... भाग ३

एक छोटासा लमहा है ,जो खत्म नही होता
मैं लाख जलाता हूं ,ये भस्म नही होता

नवीन लग्न झालेली मुलगी , नात्यातल्या एका लग्नाला गेली ... लग्ना नंतर
पहिल्यांदाला कुणाच्या लग्नाला जात होती ...थोडी बावरलेली तरी बरीच एक्सआयटेड ...
सगळे नातेवाईक भेटतील ओळखी वाढतील.

सगळ्यांशी हसून बोलत होती ,छान सुरू होता दिवस तिचा
इतक्यात एक बाई आल्या ,सासू चा हात धरून ,
"ऐकलस का ग ? ह्या तुझ्या सासू ने खूप कष्ट काढलेत ,आता तिला आराम मिळायला हवा "

ओठावर हसू कायम ," बरोबर आहे तुमचे"

" नुसतं बरोबर आहे काय म्हणतेस? त्या साठी मी तिला माझ्याकडे नेणार आहे रहायला"

सस्मित चेहऱ्याने
" हो , ठीक आहे"

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle