April 2018

कुंकू टिकली आणि टॅटू

तर कलर्स मराठी वर ह्या नावाचा एक डेली सोप सुरू झालाय.

आणि मालिका सुरू होतानाच अशा एका कुटुंबाला आपण भेटतो ज्या कुटुंबात एक अपर्णा रामतीर्थांकर नाव नसलेली एक अपर्णा रामतीर्थांकर आहे.

स्पोयलार अलर्ट

मालिकेच्या दुसऱ्या भागात पतीपाद्यपूजन सोहळा होतो

अलर्ट संपला

तर तो सोहळा बघितल्यावर मला तुम्हा सगळ्या जणींची आठवण झाली म्हणून मी इथे येऊन लिहिले. तुमच्यातल्या कोणी ती मालिका पाहते आहे का... तर चला त्या घरात येणारी नवी सून काशी त्यांना औधारेल त्यावर बोलू

Keywords: 

तू पूर्वीची राहिली नाहीस

"माणसं बदलतात".
हे असं वाक्य नेहमी एखाद्या ब्रेकअप नाहीतर घटस्फोटाच्या प्रसंगी ऐकू येतं.
"इट्स नॉट यू, इट्स मी" वगैरे.

पण माणूस बदलण्याचं एक अत्यंत टोचरं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलंय, आणि त्याच्याशी माझ्या लग्नाचा थेट संबंध नाही.
माझ्या आईची जेव्हा आजी झाली, तेव्हा तिच्या भावनांनी जणू एकशे ऐंशीच्या कोनात गिरकी घेतली. पोराच्या बारशाच्या तिसऱ्या की चवथ्या दिवशी आजीबाई एक सुंदर सोन्याची (माझ्या मापाची) बांगडी घेऊन ठुमकत आल्या.
"ही माझ्या नातसुनेसाठी".

लेख: 

अश्या या पावसात तू असावंस..

अश्या या पावसात
तू असावंस
हातात हात घेऊन फक्त
काहीच न बोलता

पावसाची रिमझिम
झाडांची एकेरी शीळ
रात्रीचं गडद आकाश
झुळुझुळू वाहणारे
नवे ओहोळ, नुकतेच जन्मलेले ,
सुसाट वारा सुटल्यावर
झाडांचे आवेगाचे नृत्य
आणि मग थोडी शांतता
निथळलेले थेंब झेलत
अलगद यावी
तुझ्यात – माझ्यात .

कविता: 

लतासप्त शति ५: मुझे तुम मिल गये हमदम

तर काल काय झालं.... कामं होती म्हणून ठाण्यात दुपारी बाराच्या उन्हात भटकले. धड जेव्ण मिळेल असं एक ठिकाण दिसेना. मग परतताना टिप टॉप लक्षात आलं तिथे गेले. वेटिंग होतंच ते सहन करून मग जागा पटकवली. गार थंड पन्हे, ताक व इतर पदार्थांची गाडी सुरू झाली. आणि मग एक वाटीत मँगो फ्लेवरची अम्गुरी रसमलाई थंडगार व गोड आली आणि सीझनचा राजा आमरस तो ही आलाच छोट्या वाटीत दोन पळ्या!!

Keywords: 

पॅरीस ते लंडन प्रवासासाठी पर्याय

या उन्हाळ्यात पॅरीस आणि लंडन ही दोन शहरे बघणार आहोत. पॅरीसहून लंडनला जायला काय ऑप्शन्स आहेत?

आम्ही सकाळी ७:१६ ला पॅरीसला लँड होत आहोत. लगेच पुढे लंडनला जायचा प्लान आहे. लंडनला जाण्यासाठी युरोस्टार ट्रेनची १०:४५ ट्रेन आहे. तर साडेतीन तासात इमिग्रेशन, कस्ट्म्स वगैरे सोपस्कार पूर्ण करून एअरपोर्टवरून RER घेउन युरोस्टार स्टेशनला वेळेत जाता येईल का? कोणी हा ऑप्शन ट्राय केला आहे का? आय अनुभव आहेत?

बाकी माहितीसाठी प्राजक्तीनं काढलेला धागा वाचते आहे.

Keywords: 

एक विलक्षण अनुभव - होमलेस किड्स कॅम्प - भाग ४

माझ्या कामाच्या वेळा आणि राहिलेल्या वेळात फॅमिली टाइम ह्या कसरतीत ड्रेन आऊट व्हायला झालंय. मागच्याच आठवड्यात पाच आफ्टरस्कूल कँपस ऑर्गनाईझ करुन शिकवावेही लागले.ऐन वेळी टीचर्स बॅकआऊट झाले.असे अनकमिटेड टिचर्स मुलांना कसे मोटीवेट करतील. पुढच्याच आठवड्यात टेस्ट आहे. शेवटी कँप कॅन्सल करणे ह्या उपायापेक्षा मी शिकवणे हा ऑप्शन घेतला. फार फार तारांबळ उडाली.पण शेवटी 'इट्स ऑल अबाऊट द किड्स ' हे माझं ध्येय समोर ठेवलं आणि धकून नेलं. हे सगळं सांगायचं कारण, मला लेख पूर्ण करायचा आहे हे माहिती होतं. सकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ ह्या कामानंतर इमोशनली आणि मेंटली ड्रेन आऊट व्हायला होतेय.

लेख: 

Jenkins Jenkins, यू मी ब्रेड !!

सध्या जेनकिन्स मध्ये आत्यंतिक गरज आहे मला मदतीची.
मला ऑफिसमध्ये एक कॉम्पीटन्सि टेस्ट द्यायची आहे.

आणि मी ह्याआधी जेनकिन्स वापरणं तर सोडाच साधं पाहिलंही नाहीये. पण तरीही हीच क्लियर करायची आहे. म्हणून प्लिज जे कोणी जेनकिन्स एक्सपर्टीज आहेत त्यांनी कृपया थोडे ज्ञानकण मला द्यावेत.
Praying Praying :)

आता हीच टेस्ट का द्यायची आहे वगैरे प्रश्न येतील पण त्याचं उत्तर मी घरी जाऊन लिहिते.
मोबाईलमधून लिहायला लिमिटेशन्स येतायत.

माझ्याकडे सध्या 20 प्रश्न आहेत. एम्सिक्यु स्वरुपातले. मला त्यांची उत्तरं शोधण्यात मदत हवी आहे.

** सापडलेली उत्तरे ठळक केली आहेत. **

Keywords: 

शिक्षण व करीअर: 

एकटी

एकटा , एकटी किंवा एकटं असणं ...अशा असण्यात खूप सामर्थ्य दडलंय. एकट्याला दुकटं असल्याशिवाय आयुष्य समृद्ध होऊ शकत नाही असा समज पूर्णतः चुकीचा आहे. आयुषातले अनेक महत्वाचे निर्णय किंवा जाणीवा आपल्यात मुरतात त्या आपण एकटे असतांना. स्वतःच एकटेपण नीट उपभोगता आलं पाहिजे;ते जमलं नाही तर एकटेपणा बोचतो..

माझ्या पिढीतल्या अनेक जणांना double income families चे तोटे आणि फायदे अनुभवायला मिळाले. शाळेतून घरी आल्यावर, शेजारून किल्ली घेऊन घर उघडायची जवाबदारी काहींना सांभाळावी लागली.

लेख: 

"मी"

"मी"
गुंतलेली प्रत्येक नात्यात तरीही
लिप्ताळ्यातली अलिप्त मी.....

शांत निळ्या डोहाखालचा
ज्वालामुखी जसा सुप्त मी.....

अनंत अडचनींनी चढवलेला
चेहरा असा तृप्त मी.....

शोधतेय कधीची स्वत:ला
सापडली असे वाटताच
होत जाणारी लुप्त मी.....

अर्चना राणे

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle