July 2018

वाडा (कथा): भाग ६-अंतिम

सारे चाफे गाव निद्रादेवीच्या आधीन झाले होते. गावात कोणाला कल्पनाही नव्हती की उद्याचा सूर्योदय गावासाठी एक भयमुक्त जीवन घेऊन अवतरणार होता, सारी संदिग्धता दूर करुन.... केवळ सुमीतमुळे !!!

Keywords: 

लेख: 

आनंद सोहळा

रूप जाहले अरुप
रंगे सावळा सोहळा
जिवा लगे निज ओढ
भेटी श्रीरंग कानडा

कर ठेऊनिय कटी
मुख शाश्वत सुन्दर
दाटू येई माया खोल
भरे समाधानी उर

निराकार चैतन्याशी
जुळे नाते निराकार
आसावल्या दिठी दिसे
विठू माऊली साकार

लय जुळता सख्याशी
कोण मी कोण सावळा
विश्व सारेच माऊली
जीव आनंद सोहळा
.............आनंद सोहळा

Keywords: 

कविता: 

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विकल जाहलो
विसावेल मन
चरणी या ***
जन्मा घातलेसी
जगजेठी तूचि
जगीन आनंदे
तुज पायी ***
यामिनी अंधारी
याची नाही भीति
यात दिसे तव
तेजबिंदू ***
केली उधळण
केशर अबीर
केवढा दर्वळ
गजबजे ***
लगबग चाले
लहान महान
लय या वाद्यांची
अनुभवे ***
करा स्नान दान
करा पुण्यवाचन
कर कटावरी
पाहूनीया ***
रचिले अभंग
रटविले वेद
रसामृत पाजे
रमाधव ***
विषय विकार
जड डोईभार
यातना विसरवी
पांडुरंग ( एकनाथ) ***
केली एकाग्रता
लक्ष्य एक आता
कमर कसून
रत मार्गी ***

कविता: 

गऱ्याच्या पिठाची आंबील: उपवासाचा कोकणी पदार्थ

गऱ्याच्या पिठाची आंबील: उपवासाचा कोकणी पदार्थ
कोकणात उन्हाळ्यात कच्चे गरे लहान तुकडे करून वाळवतात आणि त्याचं पीठ करून ठेवतात जे श्रावणात उपासाला वापरतात.
साहित्य: एक वाटी पाणी, एक वाटी ताक, मीठ, साखर, जीरं, तूप, गऱ्यांचं पीठ तीन चमचे, मिरची एक
कृती: ताक आणि पाणी एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घाला. गऱ्यांचं पीठ नीट मिक्स करा. कढईत तुपाची जीरं आणि मिरचीचे तुकडे घालून फोडणी करा. त्यात तयार मिश्रण घालून ढवळत रहा. आंबील घट्ट होऊ लागली की गॅस बंद करा. उपासाला खात असाल तर वरून कोथिंबीर घालून गरमागरम प्या.
ही आंबील नाचणीसारखीच लागते, थोडा गऱ्याचा वास येतो.

पाककृती प्रकार: 

वाडा (कथा)

आत्याच्या घरची उन्हाळी सुट्टी म्हणजे चंगळच. किती ते हुंदडणं, आंबे, फणस, चापणं, आजुबाजुची मुले जमवून समुद्रकिनारी वाळूत किल्ले करणं आणि या सर्वांवर कडी म्हणजे आत्याचे लाड करणं. तिच्या हातचे मऊ लुसलुशीत तांदळाचे घावणे, नारळाच्या रसातल्या शेवया, उकडीचे मोदक आणि ताज्या मासळीचं आंबट - तिखट कालवण.... अहाहा स्वर्गसुख ! सुमीतच्या तोंडाला या आठवणीनेच पाणी सुटलं. आता मनसोक्त लाड करुन घ्यायचे आत्याकडून.....आत्या...तिची मायेने ओथंबलेली नजर आजही तशीच डोळ्यांसमोर येते सुमीतच्या. आत्याला रागावलेली तर नाहीच पाहिलं कधी पण तिचा कधी आवज चढलेलाही सुमीतला आठवत नाही.

लेख: 

रे सावळ्या

रे सावळ्या,
बरसतोस असा घननीळ मेघ होऊनि
जोजविसी भूतला तवामॄत पाजुनि

रे सावळ्या,
भिववू पाहसी जरी निशापती होऊनि
आश्वस्त करते ही मज, श्रमपरिहाराची घडी

रे सावळ्या,
दैन्य, दु:ख, वेदना, उज्वल यशाची धुरा
सारं घेशी सामावुनि, होऊनि सावळा

रे सावळ्या,
उडी मारण्या सज्ज तू, ठेवूनि हात कटेवरी
मिठीत घेण्या लेकरा, एका सादेचीच दुरी

रे सावळ्या,
आस तुझीच रे केवळ, अन्य मागणे ते नसे
सावळ्या मिठीत तुझ्या, जगणे 'कांचन' होतसे

Keywords: 

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle