थोडंसं कळू लागल्यावर सुमीतच्या मनात कैक विचारांचं काहूर उठत असे. आत्याबद्दल, त्या वाड्याबद्दल. एव्हढी श्रीमंत असलेली आपली आत्या पतीनिधनानंतर गावातील मंदीराच्या आवारात असलेल्या दोन खोल्यांच्या साध्या घरात भाडोत्री म्हणून का राहते? या वाड्यात कोणीही न जाण्यामागे काय कारण आहे? खरंच काही घडलंय की केवळ अंधश्रद्धा? तो आपल्या आई-बाबांना त्याबद्दल विचारीत असे. तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याला आई-वडीलांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानुसार त्याच्या मनातील शंका दूर होत गेल्या. घटनांची एकसंध साखळी मनात सांधली गेली, केवळ एक कडी निसटत होती... ती म्हणजे 'देसाई वाडा'.... तो असा का मानवविरहीत राहिला?
२०१६ मध्ये शास्ता डेझीच्या बिया आणून, त्याची २०-२१ रोपटी केली. त्यातली निम्मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी Fremont ला लावली, तिथे भरपूर ऊन असल्यामुळे तिच्याकडे छान फुलतील अशी अपेक्षा होती, पण ३-४ महिन्यातच ती रोपं जळून गेली. आमच्या अंगणात मोठ्या झाडांची सावली पडते, पण मला ह्या डेझीजची खूप हौस म्हणून आमच्या अंगणात, सगळ्यात जास्त उन मिळणारा कोपरा शोधला आणि तिथे ६ रोपटी लावली. मग बागेतल्या इतर छोट्या छोट्या पूर्ण सूर्यप्रकाश मिळणाऱ्या कवडश्यात इतर रोपं डकवली. त्याला काहीही symmetry नव्हती. डेझी बर्कली मध्ये फक्त उन्हाळ्यातच उमलते, फार क्वचित कधी fall मध्ये.
१३ डिसेंबर २००१…
जर गुगलवर ही तारीख टाईप केलीत तर त्या दिवशी घडलेली एक खूप महत्वाची घटना आठवेल तुम्हांला… हो, त्या दिवशी दिल्लीमधे आपल्या देशाच्या पार्लमेंटवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तुम्ही सगळ्यांनी ही बातमी वाचली असेल. त्यानंतर काही दिवस मीडियामध्ये त्यावर खूप चर्चाही झाली. आणि नेहेमीप्रमाणे इतर नव्या ‘breaking news’च्या ओझ्याखाली ही बातमी दबून, लोकांच्या विस्मरणात गेली.
पण कितीतरी घरांमधे या एका घटनेचे पडसाद नंतर जवळजवळ एक दीड वर्षं ऐकू येत होते….आणि आमचं घर हे त्यातलंच एक होतं!
सुमीतला पटलं त्यांचं बोलणं. वाड्याची चावी थोरल्या मालकांकडेच असते. त्यामुळे आत शिरायचं तर नवी चावी बनवून घेणं हे पहिलं काम होतं. आता चावीवाल्याला इथे आणायचं तर तो तयार व्हायला हवा आणि त्याचं तोंड बंद ठेवायला हवं. आता काय करावं? मुकुंदा म्हणाला, "आधी आपण दोघं बाहेरुन अंदाज तर घेऊ मग बघू." ठरलं तर आज संध्याकाळीच शेवटची एस टी निघून गेली की वाड्याकडे कूच करायचं.
घरी आल्यावर सुमीतने एक लिस्ट बनवली लॅपटॉपमध्ये. त्याच्या दॄष्टीने या वाड्याशी संबंधित संशयित व्यक्ती:- पाटील काका आणि मुकुंदा हा एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप म्हणजे थोरले जमीनदार, विठू आणि कदाचित हे कारस्थान अवगत असलेली पण गप्प राहण्यास भाग पाडली गेलेली आत्या? ...
“हायला सुमीतराव तुम्ही तर एकामागोमाग एक सर्वांवरच संशय घेऊ लागले. अजुन चार-दोन दिवसांत सगळं चाफे गाव संशयितांच्या यादीत सामील नाही झालं म्हणजे मिळवलं.” सुमीत स्वतःशीच हसत बोलला. विचार करकरुन डोक्याचा भुगा झाला. आता सी सी टी व्ही फूटेज हाच एक मदतीचा मार्ग दिसत होता.
साहित्य: २ वाट्या तांदूळ पिठी, दीड वाटी पाणी, दोन चमचे लोणी, अर्धा चमचा मीठ, अडीच वाट्या आमरस, दोन वाट्या खवलेला नारळ, अर्धी वाटी साखर, एक टीस्पून वेलची पावडर
कृती: सारणासाठी: 1)दोन वाट्या ओलं खोबरं, दोन वाट्या आमरस, अर्धी वाटी साखर एका कढईत एकत्र करा.
2)मंद गॅसवर ठेवा.
3) गोळा होईपर्यंत सतत ढवळत रहा.
4) गॅस बंद करा.
5) सारण गार होऊ द्या.
जवळपास 17 वर्षांनी क्रोशाची सुई हातात घेतली परत काही तरी विणायला... तेव्हा विणता विणता लक्षात आलं ... या सुईने बरंच आयुष्य विणलंय आपलं.. शक्य असेल तिथे परिस्थितीची गाठ अगदी बेमालूमपणे लपवलीय!