पोर्टेबल शिलाई मशीन काही वर्षे वापरतेय पण क्रोशे बॅग्ज च्या लायनींगसाठी आणि इतर किडुक मिडुक घरगुती कामासाठीच अजुन वापरत होते. क्रोशे बॅग्ज च्या लायनींग साठी एकेक नवीन नवीन ऍडीशन करत होते तेव्हा मात्र मनात यायचं की एखादी पुर्ण बॅग शिवून पहायचं पण मुहूर्त सापडत नव्हता. पण प्लॅस्टिक बंदीच्या निमित्ताने बाजारात आलेली भाजीची पिशवी पाहिली आणि म्हटलं पाहुचया जमते का. ट्रायल म्हणून जुन्या कपड्यांवरच प्रयोग करूया म्हटलं आणि जुने वापरात नसलेले कुर्ते होते त्यांनाच घेतलं हाताशी आणि बऱ्यापैकी मोठ्या साईज चे कप्पे असलेली जम्बो बॅग शिवली चुकत माकत.
तिसरा भाग लिहायला बराच वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व! पण त्याचे झाले असे.. की मला काही केल्या त्या पहिल्या ड्राईव्हिंग टेस्टनंतर काय झाले ते आठवत नाहीये. म्हणजे त्यानंतर अजुन दोनदा ड्रायव्हिंग टेस्ट झाली. आणि त्या दोन्हीत मी फेल झाले. कशा हे आता आठवत नाही. परीणामी मला एका लेखी परीक्षेवरचे तिनही चान्सेस गमावल्यामुळे परत एकदा लेखी परीक्षा द्यायची वेळ आली. केव्हढी ती नामुष्की!! पहिली लेखी परीक्षा इतकी सहज व लगेच पास झाल्याने आलेला कॉन्फीडन्स, दर बिहाईंड द व्हील परीक्षेमुळे कमी कमी होत चालला होता. पण ते सारं विसरून नव्याने परीक्षा देणे गरजेचे होते.
इटलीमध्ये भटकंती करण्यासाठी माहितीचा धागा.
कुठे, कसे जावे? काय पहावे, टूर्स, पब्लिक ट्रान्स्पोर्ट, टॅक्सीज, काय खावे-प्यावे. खरेदी, हवामान, सुरक्षितता इ.
या ऑगस्ट्मध्ये सिंगापूरला जायचा प्लॅन करतोय. तर विमान तिकिटे व व्हिसा करुन देणारे कुणी खात्रीशीर एजंट असल्यास कृपया सांगा. स्वतः तिकिटे बूक करण्यापेक्षा एजंटमार्फत केली तर स्वस्त पडतात का? तसंच सिंगापूरचा व्हिसा हा एजंटमार्फतच करावा लागतो असं वाचलं. individually apply नाही येत करता म्हणे.
संध्याकाळी साडे पाच च्या सुमाराला गेस्ट रूम च्या बाहेर फेरफटका मारायला बाहेर पडले. सगळीकडे सोनेरी संधीप्रकाश पसरला होता. आकाशात केशरी, पिवळ्या रंगांची उधळण झाली होती. मी फिरता फिरता सहज मेस च्या मागच्या बाजूला गेले. तिथून खालच्या valley चा पूर्ण view दिसत होता. मला हरिश्चंद्रगडा वरच्या कोकणकड्याची आठवण झाली. खाली पाहिलं आणि नजर तिथेच खिळून राहिली. हिरव्या रंगाच्या इतक्या छटा मी पहिल्यांदाच पहात होते… जणू काही Asian paints चं green shade card च!
आमच्या डेक्कन वरच्या घराच्या मागेच पांचाळेश्वराचे देउळ आहे. त्याच्या ही मागे एक शनी/ मारुतीचे देउळ आहे व एक प्रचंड उंच मोठा पिंपळ आहे होता. १९७९ च्या वरशात मी अगदी पहाटे उठून फिजिक्स केमि स्ट्री चा अभ्यास करत असे. तेव्हा पहाटे पहाटे सूर्योदय होताना पक्षी, खाली
वाहणारी नदी व सळसळ णारा पिंपळ सोबत असे.
मध्यंतरी एका भेटीत दिसले की प्रचंड बोर्ड बसवताना ते झाड तोडले गेले आहे. तेव्हा सुचलेली ही कविता आहे.
कुठल्याही सहलीबद्दल त्या त्या वेळी लिहिलं गेलं की त्यात जी उत्स्फूर्तता असते ती नंतर राहत नाही. स्पेन ट्रिप दरम्यान बऱ्याच गोष्टी तुकड्या तुकड्यात लिहून ठेवल्या होत्या पण त्यात एकसंधता नव्हती. पण आज सहज म्हणून स्पेन मधले फोटो बघताना काही गोष्टी आठवल्या आणि पुन्हा लिहायला घेतलं. आधीची दोघांची भटकंती आणि आता सृजन सोबत असताना फिरणे यात फार मोठा फरक आहे याचा अंदाज होता. पण तरीही तो ७ महिन्यांचा असताना आम्ही उत्साहाने इटलीला गेलो आणि ट्रिप चे ७ दिवस, जायची तयारी ७ दिवस आणि आल्यावर आराम आणि आवराआवर यात ७ दिवस असा सगळा हिशोब बघता, आता कुठेही मोठ्या ट्रिपला जायला नको असं ठरवून टाकलं.