आम्ही गेली ५ वर्षं सॅन डीआगोमध्ये राहतोय (आणि फिरतोय आणि लोकांना फिरवतोय). तरीही काही गोष्टी बघायच्या राहूनच गेल्यात. त्यापैकी एक म्हणजे ही सोन्याची खाण. गेल्या शनिवारी दुपारी टळटळीत उन्हांत फारसं काही करण्यासारखं नव्हतं म्हणून जवळच्या जुलिअन गावात गेलो. आमच्या घरापासून एका तासावर असलेलं हे छोटंसं टुरिस्ट खेडंगाव तसं आम्हाला नवीन नाही. याआधी बरेचदा इथल्या कुयामाका तलावावर फिरायला, अँपल पाय खायला , डिसेंबर महिन्यातला (आम्हाला आमच्या गावात कधीच न दिसणारा) स्नो बघायला किंवा असंच कंटाळा घालवण्यासाठी इथल्या रस्त्यावर, दुकानांतून वगैरे फिरायला आम्ही इथे येऊन गेलोय.
साहित्य -
उडदाची डाळ - अर्धी वाटी
आलं - तीन ते चार इंच
कच्ची बडिशेप - पाव वाटीपेक्षा किंचित कमी
सुकी मिरची - १ किंवा २
तूप - २ चमचे
मीठ - चवीनुसार
साखर - अगदी थोडी, चवीपुरती, नाही घातली तरी चालेल.