मी सध्या Zentangle शिकायचं मनावर घेतलं आहे. ठराविक वेळेत आणि ठराविक दिवशी असं सध्या काहीच शिकता येत नाही त्यामुळे कोणासोबतच ऑनलाईन कोर्स करायला जमत नाही.
रात्री झोपण्यापुर्वी मिळेल त्या वेळेत सध्या युट्यूब व्हिडीओ पाहून, फेसबुक पेज व काही वेबसाईट्स फॉलो करत शिकते आहे.
तुम्हाला कोणाला शिकायचे असेन तर आपण एक गृप तयार करू शकतो.
इथल्या ज्या मैत्रीणी Tangles काढता, तुम्ही वेळ मिळेल तेव्हा मार्गदर्शन कराल का?
ह्या गोष्टीला नावच नाही (This story does not have a name) ही दिग्दर्शक संदीप सावंत यांची तिसरी फिल्म.
दिवाळीनंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करीत आहेत
'ह्या गोष्टीला नावच नाही'
Teaser Out Now !
८ नोव्हेंबर २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!
पुन्हा एकदा हायवेचा वार्याचा काहीही न विचारता होणारा झंझावाती स्पर्श अनुभवताच माझं डोकं जागेवर आलं. तोवर एका धुंदीतच सगळं चाललं होतं.
झर्याजवळून उठून पुन्हा पायवाटेने चालत आम्ही कधी डायनिंग एरियात आलो, बसलो , खाल्लं, दियाशी बोललो आणि निघालो हे सग्ळं नंतर आठवलं. ब्रेकफास्ट मस्त होता.
पण त्या झर्याजवळून उठताना जग माझ्यासाठी बदललं होतं. त्यानंतर मी आणि अंकित एकमेकांशी फार कमी बोललो.
जास्त बोलण्याची गरज त्या वेळी तरी नव्हती. एक तरल , अलवार अदृष्य तलम मलमल तरंगत आम्हाला लपेटून येत होती. आत्ता या क्षणी जगात कसलेच प्रॉब्लेम्स नाहीत असं वाटत होतं.
घरी कधी एकटी असेन तेव्हा वन पॉट मील म्हणून मी वेगवेगळे राईस करत असते. या वेळी तवा पुलाव केला. आमच्या ऑफिसजवळ कॉफी स्टॉप म्हणून एक पाभा, पुलाव, कोल्ड कॉफी वगैरे मिळणारी टपरी आहे, तिथला तवा पुलाव आम्ही कधीतरी ऑर्डर करतो. सिंबी पब्लिकचं फेवरीट ठिकाण आहे. मोठ्या ठिकाणी खाल्ल्यापेक्षा तिथली चव छान असते. म्हणून तिथला पुलाव आठवून ही रेसिपी केली.
तासाभरापूर्वी मी राजारामपुरीत आमच्या घरी आले. आजीला तिच्या खोलीत जेवण द्यायला गेले तर ती मुटकुळं करून झोपली होती. कुठे आमच्या लहानपणी सत्ता गाजवणारी, ठणकावून बोलणारी, आम्हाला दम देणारी लक्षूमबाई आणि कुठे ही अशक्त दिसणारी, सुरकुतलेली आजी. आईला तिने मुलगा हवा म्हणून दिलेला सगळा त्रास आमच्या डोक्यातून कधीच विसरला जाणार नाही. दोन मुलींवर पुन्हा वंशाच्या दिव्यासाठी तिने आईला ऑपरेशन करू दिलं नाही. तर जाई - जुई झाल्या! एकावर एक फ्री! तेव्हापासून आजी ने चार मुली म्हणून आमचा आणि आईचा जो दु:स्वास केला त्याला तोडच नाही.
रश्मीने गोष्टीतली पलोमाने केलेली रेसिपी विचारली म्हणून देते आहे, फोटो मागू नये! आत्ता केलेली नाही.
आंध्रमध्ये जेवणाच्या सुरुवातीला appetizers म्हणून वेगवेगळ्या पचडी (चटण्या) खायची पद्धत आहे. ही त्यापैकीच एक. करायला खूप सोपी आणि अगदी दहा मिनिटात होणारी!