June 2023

आंबा गुलाबजाम

नमस्कार मंडळी!
कोकणमेवा सम्पत आला आता आणि जरा सविस्तर लिहायला मोकळा वेळ मिळालाय. आंबे आले की इतके पदार्थ होत असतात ना गोड म्हणू नका की तिखट...जे करू त्यात आंबा! आतापर्यंत बऱ्याच रेसिपीज मी शेअर केल्यात आंब्याच्या अगदी रसगुल्ले, पाकातली पुरी, मोदक सगळ्यात आंबा अगदी चपखल बसतो.
तर आज बरेच दिवस पोस्ट लिहायचा राहून गेलेला प्रकार: आंबा गुलाबजाम!
img-20230614-wa0011.jpg

पाककृती प्रकार: 

सुप्रभात ( चित्राधारीत )

सुप्रभातीस कोवळे ऊन
ऊन झेले फांदी एक
एक फुटवा फांदीशी
फांदीच्या मनी इच्छा अनेक ....

अनेक पक्ष्यांना दिली हाक
हाक ऐके न्यारा पक्षी
पक्षी विसावण्या येई
येता पंखांना नटवे नक्षी ....

नक्षीत पर्णछाया मोहक
मोहकता भावे मना
मन गुंतावे दृश्यात
दृश्याने सुखाविले नयना ....

नयन जाणती अनभिज्ञ खग
खग निरखी चौदिशा
चौदिशांच्या जाणे खुणा
खुणा ध्यानी राहो ही मनिषा ...

मनिषा काढावे छायाचित्र
छायाचित्र मनोहर
मनोहर नि दुर्मिळ
दुर्मिळ सांभाळू धरोहर ....

अंतरीच्या गाभाऱ्यातून..

अंतरीच्या गाभाऱ्यातून कुणी अनामिक साद घालतं..
अन सुरु होतो प्रवास स्वतःपासून स्वत्वापर्यंतचा..!
अवघा देह होतो राऊळ आणि सजू लागते मानसपूजा!
स्थिर पद्मासन होतं राऊळाची पायरी आणि
ध्यानस्थ हात होतात महाद्वार...
मस्तीष्क तेजोमय कळस! मिटलेल्या पापण्यात उजळतात तेजस्वि समया!!
हृदयात उमटतात सावळी स्पंदने आणि श्वास -प्रश्वासातून प्रतिध्वनी उमटतो विठ्ठल विठ्ठल.....
पंचेंद्रीय - पंचप्राण - अंतरात्मा संमेवर येऊन साधतात अनोखी एकादशी..
चंदनाचा दरवळ साक्ष देतो पूर्णत्वाची अन रोमारोमातून वाहू लागते चैतन्याची अनुभूती.. द्वनद्व संपतात अन नाद उमटतो....

वारी

fb_img_1688015934834.jpg

निळ्या जांभळ्या आभाळी, घनगर्द सावळ्या मेघापरी
उभा आहे कधीचा तो, आपल्याचसाठी विटेवरी
सावळी त्याची माया, रूपही सावळे - गोजिरे
शोभे कपाळी टिळा अन गळा तुळशीचे ते तुरे

शांत शांत तो - उमजून आपल्या मनातील कोलाहल
बघता रूप चित्ती, विसरते मना - मनातील चलबिचल

क्षण एक जाता, दिसे तो ठायीठायी
जळी-स्थळी-काष्ठी अन पाषाणी,
नाद - स्वर झंकारले कानी
तन - मन अवघे झाले वारी !

Keywords: 

कविता: 

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle