June 2024

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 1 - तयारी !!

आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो.
हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते.

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 2 - सारी - देवरियाताल

दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकला सुरुवात झाली तीच एका तीव्र चढणीने!! चढताना एका क्षणी मागे वळून आम्ही सारी बेस कॅम्पचा निरोप घेतला. परत येउ तेव्हा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला असेल की नाही, ते माहिती नव्हते. पण अनुभवसमृद्ध मात्र नक्की होऊन परत येऊ ह्याची ग्वाही मनातच दिली.
रस्ता ओबडधोबड दगडांनी तयार केलेला होता. पण भुसभुशीत मातीत पाय घसरण्यापेक्षा दगड परवडले असे मनाला सांगत चढण चढत होते.
ह्या फोटोवरून चढ किती होता त्याचा तर अंदाज येईल पण आम्ही सगळे कसे चढत होतो ते कळायचे असेल तर व्हिडिओ आहे ना!

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 3 - देवरियाताल -स्यालमी

ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती.
सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच.

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 4 - स्यालमी - बनियाकुंड

आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते,
"इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु?
हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु?
मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना,
कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।"
- वृंदा टिळक

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5 - अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

१५ एप्रिल, त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक

जेहत्ते कालाचे ठायी
हर दुसरा मनुष्य जाई
हिमालयावरी पायी
ट्रेक लागी ।।
आले तियेच्याही मना..
तीव्र झाली कामना
सिद्ध झाली ललना
ट्रेकला जाण्या ।।
वाचा तियेची तयारी
कैसी झाली सवारी
फजिती ही न्यारी
झालीच ना ।।
ट्रेक पूर्ण जाहला
जीव थंडावला
तुम्हालागी आणला
वानोळा हा ।।

Keywords: 

नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग ५

मी परत आले तोवर नियमीत पाऊस सुरू झाला होता. नाचणी रुजुन आली होती पण शेतात कोणी गेले नसल्याने तण नियंत्रण राहिले नाही, परिणामी गवत कुठले व नाचणी कुठली हे कळणे मुश्किल झाले. नाचणीला जास्त ओल राहणारी जमिन चालत नाही, चिखलणी करुन नाचणी लावली जात नाही. चिखलात नाचणी रोपे कुजणार. मी जो तुकडा शिल्लक ठेवला होता त्यावरचे पिक म्हणजे चवळी वगैरे मी काढुन घेतली होती. पाऊस पडल्यावर तिथले तण भराभरा वाढले होते. ते आता हाताने काढणे खर्चीक झाले असते. त्यामुळे नाचणी लावायचा बेत रहित केला. उगवुन आलेली नाचणी गरजुंना देऊन टाकली.

फ्रेंडशीप पीक एक्सपिडीशन - बरंच गोड ( भाग १ )

माऊंट फ्रेंडशीप हा पीर पंजाल रेंजेसमध्ये कुलू भागात येतो.. फ्रेंडशीप पीक हे एक्सपिडीशन आहे, म्हणजे सोप्या शब्दात टेक्निकल ट्रेक. ट्रेकींग गिअर्स वापरुन करायचा ट्रेक. पीक ची ऊंची ५,२९० मीटर्स म्हणजे १७,३५३ फूट. ऊंची एक्सपिडीशन्सच्या मानाने फार नसली तरी हा 'कठीण' कॅटेगरीत येणारा आहे कारण जवळजवळ वर्षभर शिखरावर असणारं बर्फ.

आम्ही पहीलं केलं ते स्टोक कांगरी पण एक्सपिडीशनच होतं., पण तेव्हा तसं काही असतं असं काहीच माहिती नव्हतं. मागच्या वर्षी बाली पास केल्यावर आता दरवर्षी एक तरी ट्रेक करायचा प्रयत्न करायचाच असं पक्कं ठरवून ठेवलं आहे.

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle