December 2024

पंजाबी मेथी कढी

ही रेसिपी मी मध्यंतरी इन्स्टावर पाहिली आणि आवडली म्हणून करुनही पाहिली एका गेटूगेदरला. सगळ्यांना आवडली म्हणून शेअर करते आहे.

साहित्य- मेथीची एक जुडी (जितकी माणसं त्याप्रमाणे प्रमाण वर खाली करावं लागेल)
दही, डाळीचं पीठ, लाल तिखट, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, उभा चिरलेला कांदा, कमी तिखटाच्या लाल सुक्या मिरच्या, मेथी दाणे, जिरं, मोहरी, कढिपत्ता, हिंग, हळद, तेल, तूप, मीठ इत्यादी.

कृती- मेथी धुवून पानं काढून जाडसर चिरुन घ्यायची.
दह्यात डाळीचं पीठ, लाल तिखट, हळद, धण्याची पावडर वगैरे मिक्स करुन पाणी घालून फेटून घेऊन जरा पातळ करायचं.

पाककृती प्रकार: 

चीजकेक गुलाबजाम आणि चीजकेक ओरिओ- नो बेक वर्जन्स

मी विकेंडला ही दोन टाईपची डेझर्ट्स केली. अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हवीत तितकी वेरिएशन्स करता येतील. ह्याची बेक वर्जन्सही करता येतात पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता.

साहित्य-
चीजकेक गुलाबजाम-
रुम टेंपला आलेलं क्रिम चीज, वितळलेलं बटर, मारी किंवा इतर डायजेस्टिव्ह बिस्किट्सचा चुरा, पिठीसाखर, व्हिपींग क्रिम, गुलाबजाम आणि ड्रायफ्रूट्चा चुरा.

पाककृती प्रकार: 

श्रद्धांजली वाइज आउल

आपल्या वाइज आउल आता आपल्यात नाहीत अशी बातमी समजली आहे. हा धागा त्यांना शेवटचे निरोप लिहिण्यासाठी.
त्यांच्या लेकीला व इतर कुटुंबियांना पहाता यावा म्हणून हा धागा प्रतिक्रियांसकट खुला करण्यात येईल. दु:खद बातमीवरील प्रतिसाद इथे हलवले जाणार नाहीत. मैत्रीणवरून वा.आ.ना निरोप देताना त्यांच्या आठवणी, लक्षात राहिलेली वाक्ये आणि कुटुंबियांसाठी धीराचे शब्द एकत्र करण्यासाठी हा धागा आहे.

मैत्रीण टीमकडून वा.आ.ना श्रद्धांजली. त्या आपल्यात नाहीत यावर खरं तर अजून विश्वास बसलेला नाही. त्यांची कमतरता चांगलीच जाणवेल.

जिझेल : शरम आणि हिंमत

या गेल्या तीन चार महिन्यात जिझेल पेलिकॉट ही ७२ वर्षांची 'साधीसुधी' आजी फ्रान्सच्या (आणि इतर जगाच्याही) पुरुषसत्ताक कायद्यांना आव्हान ठरली आहे. तिने तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीवर तिने एक महत्त्वाचं (आणि तसं साधंच) मत मांडलं - की शरम पलिकडच्या बाजूला वाटायला हवी - ज्याने अत्याचार केला, बलात्कार केला त्याला. शरम नाहीच, पण तिने दाखवली ती बिनतोड हिंमत.

लेख: 

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle