अनेकींना कदाचित आठवत असेल 2015 च्या एप्रिलमधे मी माझा नी हा ब्रॅण्ड सुरू केला. एका कानातल्यांच्या कलेक्शनने सुरुवात केली होती.
सात वर्षे पूर्ण होताना म्हणजे एप्रिल 2022 मधे मी दागिन्यांपासून दूर जाऊन ताराचित्रे, मिक्स मिडिया यात उतरले.
आता दशकपूर्तीच्या निमित्ताने मी पुढचे पाऊल टाकते आहे. माझी तारा व मिक्स मिडिया चित्रे यांचे एकल प्रदर्शन पुण्यात करते आहे.
तारखा आहेत 8-13 एप्रिल. रोज सकाळी 11 ते संध्याकाळी 8. उदघाटन: 8 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता.
स्थळ: पी. एन. गाडगीळ & सन्स, हॅपी कॉलनी शाखा, कोथरूड, पुणे
मला कोकणातल्या शिमगा आणि पालखी बद्दल माहिती हवी आहे
कोकणात होळी झाल्यानंतर देवाची पालखी निघते आणि घरोघरी जाते. देव घरी येतात. मला असलेल्या माहिती प्रमाणे सुगीचा हंगाम संपल्याची जाणिव करुन देणारा असा हा सण आहे. वेगवेगऴ्या समजुतीं प्रमाणे गावातील भुतखेत पळवुन लावण्या साठी पण असे घरोघरी देव येतात.
ह्यच्याशी संबधित गोष्टी नक्कीच असतील. कुणाला माहित असतील तर सांगा. मला वरील माहिती पेक्षा जास्त माहिती नाही मिळाली
घरची, दारची, सासरची, माहेरची सगळी माणसं, गुरं, प्राणी पक्षी सगळ्यांना सुखी ठेव रे महाराजा"..
गाऱ्हाण चाललं होतं. आणि डोळे भरून आले. घरी पालखी आली होती. ४ ५ वर्षांनंतर. इतकी वर्ष ऐकलेली आणि इतरांच्या रिल्स वर पाहिलेली पालखी आमच्या घरी आली होती. देव घरी आले होते. घाईत होते तरी थोडा वेळ थांबले. पाहुणचार करून घेतला, विसावले आणि मग पुढच्या घरी निघाले.