पलाश रिसॉर्टच्या किचनमध्ये शेफला उद्या येणाऱ्या गेस्टच्या फूड ऍलर्जीज आणि त्या टाळून करता येणारे पदार्थ यांची त्या गेस्टने दिलेली लिस्ट समजावून सांगत होता. तेवढ्यात मेसेजच्या आवाजाने त्याने फोन बाहेर काढला. नोराचा मेसेज? म्हणून त्याने पटकन उघडून वाचायला सुरू केला. Forgot to tell you that it's my parents 35th anniversary. We have to be there tonight. Could you be free by 7 pm? I am extremely sorry..
त्याने खोल श्वास घेऊन कपाळावरून हात फिरवला आणि लगोलग तिला कॉल केला.
'इतक्या' लवकर सांगितल्याबद्दल थँक्स! तो तिरकसपणे म्हणाला.
घरी पोहोचताच रोजच्याप्रमाणे शॉवर घेऊन ती ताजीतवानी झाली. जुना वापरून पातळ झालेला ब्लॅक टॅंक आणि पांढरी पेझली प्रिंट असणाऱ्या पिंक शॉर्ट्स घातल्या. ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळून ती किचनकडे गेली. डायनिंग टेबलवर ठेवलेल्या फोनवर हळू आवाजात 'दिल का दरीया, बह ही गया..' सुरू झालं. वरण भाताचा कुकर लावून एकीकडे तिने संध्याकाळी ताजे मिळालेले दोन फडफडीत पापलेट साफ करून वर तिरके कट दिले आणि त्यांना हळद, मीठ, मसाला मॅरीनेट करून बाजूला ठेवले. सकाळचं बिरडं गरम करत ठेवलं आणि पटापट चपात्या करून टाकल्या. उरली सुरली भांडी आवरून तिने हातावर लिंबू पिळून हात धुतले.
"गार्गीss' शर्वरीच्या हाकेने गार्गी धडपडत उठली आणि पलाश हळू जा म्हणेपर्यंत दुडदुडत दाराबाहेर पडली. उघड्या दारातून सॉरीss ओरडून शर्वरीने पुन्हा दार बाहेर ओढून घेतले. सगळ्या आवाजांनी जाग येऊन नोराने डोळे उघडले तेव्हा तिला सगळ्यात आधी हलकासा ब्लॅक ओपीयमचा सुगंध जाणवला. मान जरा हलवल्यावर ती त्याच्या कुशीत घुसून झोपल्याचे लक्षात येताच ती हात पाय उचलून ताडकन बाजूला सरकली.
"मला आधी का उठवलं नाही?" त्याच्याकडे न बघता तिने विचारले.
"शो टाईम!" वहिनीला दारातून दिसलो आपण." तो सरळ म्हणाला.
जवळपास अक्खा आठवडा इतका बिझी गेला की घरात ते फक्त नाश्ता आणि रात्रीच्या जेवणापुरते एकमेकांना दिसत होते. शनिवारी सकाळी ती उठली तेव्हा पलाश त्याच्या बेडरूमचे निळे दार उघड बंद करत होता. ती विस्कटलेले केस एका स्पायरल हेअर टायमध्ये डोक्यावर अडकवत त्याच्याजवळ गेली. "दुपारी सुताराला घेऊन येतो. हे दार नीट लागत नाही." तो बिजागरांना हात लावून बघत म्हणाला. "नीट तर दिसतंय" ती दार हलवून म्हणाली.
"रात्री मी दार व्यवस्थित लावून झोपतो तरी सकाळपर्यंत ते सताड उघडलेलं असतं. स्टॉपर लावला तरी उघडतंय." तो कपाळावर आठ्या पाडून दाराकडे बघत होता.
"हम्म.. आता मला कळलं. काळोखात नीट दिसत नव्हतं. त्याने मला तुझ्याबरोबर डान्स करताना बघितलं असणार आणि तो पझेसिव्ह होऊन माझ्यामागे आला. त्याने येऊन मला किस करायला ट्राय केलं.." ती नॉन स्टॉप बोलत होती. नकळत पलाशच्या हातांच्या मुठी वळल्या होत्या.
"पण मी त्याला जोरात ढोपर मारला. त्याने तो अजूनच हायपर झाला आणि माझे खांदे धरून जवळ ओढायला लागला तेव्हाच तू तिथे पोचलास." ती बोलून थांबताच त्याने श्वास सोडला.
पलाश तिला उचलून आत शिरताच, ती शिंकता शिंकता शक्य तितके ओरडत "पलाश, माका सोड, खाली ठेव" म्हणून हातपाय झाडत सुटायचा प्रयत्न करायला लागली. "काम डाउन, सगळीकडे पाणी व्हायला नको म्हणून तुला बाथरूममध्ये नेतोय. " तो पटापट जिना चढताना म्हणाला. गप्प होऊन तिने त्याच्या छातीवर डोकं टेकलं. तिने डोकं टेकलेल्या जागी त्याचा शर्ट भिजत होता. तिने मान वर करून त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला पण तो ओठ घट्ट मिटून समोर बघत होता. त्याने लक्ष दिले नाही तरी छातीला टेकलेल्या कानात त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती.
ती समोर उभ्या असलेल्या इव्हा वगैरे कझन्सच्या ग्रुपकडे जाऊन हसत काहीतरी गप्पा मारू लागली. अजूनही तिच्या हातापायांतून वीज सळसळत होती. कोणीतरी तिच्या हातात स्पार्कलिंग वाईनचा ग्लास दिला. तिने घोट घेताघेता समोर गार्गीला कडेवर घेऊन दादाबरोबर बोलणाऱ्या पलाशकडे पाहिले. तिच्याकडे त्याची पाठ होती. पण घामेजल्या पाठीला चिकटलेल्या टीशर्टमुळे त्याचे खांदे आणि मसल्स उठून दिसत होते. पाचच मिनिटांपूर्वी तिचे हात तिथे असल्याचे आठवून तिच्या अंगावर पुन्हा शहारा आला. 'डॅम यू गर्ल, भानावर ये' तिने स्वतःला पुनःपुन्हा बजावले.ती बघत असतानाच अचानक त्याने वळून तिच्याकडे बघितले. परत तेच नो इट ऑल स्माईल! शिट!
इव्हा तिला घेऊन सरळ जिना चढून वरच्या मास्टर बेडरूममध्ये गेली.
"तुझ्या चार बॅग आम्ही इथे ठेवल्यात. टॉयलेट्री बॅग आरशासमोर आहे. पटकन हा ड्रेस घाल आणि पार्टीला ये" इव्हा म्हणाली आणि खाली पार्टीची तयारी करायला निघून गेली. बेडवर पसरून ठेवलेला टू पीस गाऊन तिने दाखवला. नेव्ही ब्लू हाय वेस्ट, पायघोळ फ्लेअर असलेला सिल्की नेटचा स्कर्ट आणि नेव्ही ब्लू लेसवर सिल्वर जर्दोजी वर्क केलेला हाय नेक स्लीव्हलेस क्रॉप टॉप होता.
सात वाजताच्या अलार्मने नोरा खडबडून जागी झाली, शेजारी पाहिले तर शर्वरी जागेवर नव्हती. तिने उठून ब्रश वगैरे करून खोलीचं लोटलेलं दार उघडलं तर नुकतीच झोपेतून उठलेली गार्गी डोळे चोळत येऊन एकदम तिला चिकटली. "नोराकाकू तुला मम्मा बोलावते.. चल चल.." म्हणत हात ओढत तिला किचनमध्ये घेऊन गेली. शर्वरी आंघोळ वगैरे आटपून पूजेच्या तयारीत बिझी होती. तिने पटकन नोराच्या हातात चहाचा कप दिला. "नोरा, आंघोळ बिंघोळ पटापट आवर. गुरुजी नऊ वाजता येणार आहेत. साडी, दागिने सगळं बेडवर ठेव तोपर्यंत मी येते नेसवायला."