September 2017

नवजागर २०१७ : मनस्वीची कथा

ह्याआधी मायबोलीवर ही कथा मी प्रकाशित केली होती. त्यावर पुन्हा थोडे काम करून पुन्हा इथे प्रकाशित करते आहे.
==========================================================================

उपक्रम: 

गगनजाई

श्रावण सरता भाद्रपदाची चाहुल लागता सहनिवासाच्या रस्त्यावर कमान केलेली गगन जाई आपल्या आगमनाची वर्दी देते हळूच मोहक टवटवीत फुल डोईवर पडते,अश्विनातल्या घटस्थापनेला या आकाशनिंबाने छान झुंबरे लावलेली असतात ,दोबाजुनी अशा या उंचच उंच चढवलेल्या कमानीवर शुभ्र झुंबरे विराजमान असतात,पावलापावलाशी मग टपोरी सुगंधाची आरास आणि ते मोहक जीव न दुखवता जपून पाऊल टाक जरा चालीवर आपल्याला चालायचे असते.

फॅमिली क्रॉनिकल्स ७ : खरेदी आख्यान

ही आहे घर-घर की कहानी. आमच्या, तुमच्या कोणाच्या ही घराघरात घडणारे हे किस्से. केवळ पात्रांची नावं, तपशिल बदलले जातात पण किस्से थोड्या-फार फरकाने कुठेही घडणारे!
------------------------------------------------------------------------------------------------

Keywords: 

लेख: 

नवजागर २०१७ - मुलाखत : स्वराली - नंदिनी सहस्रबुद्धे

(मिसळपाव.कॉमवर पूर्वप्रकाशित मुलाखत नवरात्रीच्या निमित्ताने मैत्रीणवर आणते आहे.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भरगच्च भरलेला सायंटिफिक सोसायटीचा हॉल, पायर्‍यांवर व व्हरांड्यात उभे असलेले श्रोते असं चित्र आता नागपूरकरांसाठी नवीन नाही. हे असं चित्र वर्षातून तीनदा नक्कीच, कधीकधी चार-पाच वेळा दिसत आलं आहे गेली तेवीस वर्षं! दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे ‘स्वराली' हे समीकरण आता पक्कं झालंय!

Keywords: 

उपक्रम: 

तो निमित्त

तो निमित्त

उकडलेलं अंड घेऊन
ती माझ्याकडे सरकली
खाणारेस का म्हणताच
मला घरच्या बाप्पाची
आठवण झाली
नंतर.........
लंगरच्या रांगेत दोघी
एकमेकींना धरुन होतो
प्लेट कमी आहेत कळताच
एकातच जेवलो
पर्समधला सत्यनारायणाचा प्रसाद
आम्ही स्वीट डीश समजून खाल्ला
दोघींजवळच पाणी संपताच
इकडे तिकडे वळलो
संतत पाऊस तरीही उकाडा
त्यातही गोश्यातली ती
आमच्याकडे पहात होती
तिच्या हातातली बाटली
पाण्याने भरली होती
तिघींनी एकमेकींकडे पाहिलं
आणि.....
दुसऱ्या क्षणी ते पाणी
आमच्या घश्यात उतरलं
सर्वत्र हाहाक्कार .....पुरते बेहाल
पावसाचे थैमान.....
माझे जोडलेले हात, हिची हातात सरकती माळ

नवजागर २०१७ - मारायला दिली नाही माझी लेक तुला!

हा लेख मी यापूर्वी एका मराठी संस्थळावर लिहिला होता. त्यानंतर तो माझ्या ब्लॉगवर आणला. आणि आज इथे मैत्रीणवर प्रसिद्ध करत आहे.

<<<<<<

"आज आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला कायद्याची जाण आहे. म्हणून कुणी आपला फायद घेऊ शकत नाही. पण माझं हृदय अशा स्त्रियांसाठी तुटतं ज्या अशिक्षित आहेत. त्याना कायदा माहित नाही. नवर्याने, सासूने मारलं की रडायचं इतकंच माहिती आहे. अशा स्त्रियापर्यंत आपल्या संस्थेचं काम पोचलं पाहिजे. त्याना आपली मदत झाली पाहिजे..."

Keywords: 

उपक्रम: 

नवजागर २०१७ - आई

‘आई’ ह्या दोन अक्षरी शब्दात केवढं तरी आपलं विश्व सामावलेलं असतं. आई हे एक अजब रसायन असतं. मुलींना लग्न झाल्यावर, व स्वतः आई झाल्यावर खर्‍या अर्थाने आईपण कळायला लागतं. 'थोर आई' म्हटलं की आपल्याला आठवते जिजाबाई शिवाजीसारख्या महापुरूषाला घडवणारी! त्याच काळातील सामान्य अशी हिरकणीसुध्दा असामान्य असं दिव्य करून जाते ते आईपणाच्या बळावर. सामान्यातल्या अश्या कितीतरी असामान्य आया असतील, त्यांच्या बाबतीत आपल्याला ‘नाही चिरा, नाही पणती’ असं म्हणावं लागेल. माझ्या आईच्या निमित्ताने अश्या समस्त अनामिक आयांसाठी ही शब्दरूपी पणती उजळण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Keywords: 

उपक्रम: 

लिपस्टिक अंडर माय बुरखा

दिग्दर्शक - अलंकृता श्रीवास्तव. निर्माता- प्रकाश झा.
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा सिनेमा पाहायला जाताना मनात एक उत्सुकता होती. स्त्रीप्रधान सिनेमा. एका स्त्री ने लिहिलेला. दिग्दर्शित केलेला. पटकथा ही तिचीच. कलाकारांमध्ये रत्ना पाठक-शहा, कोंकणा सेनशर्मा इ. मनातील अपेक्षा उंचावणाऱ्या ह्या गोष्टी.

Keywords: 

भटकंतीचा सल्ला

मुंबई -कोल्हापूर-----१ दिवस रहाणार
कोल्हापूर -कुनकेश्वर......१ दिवस

कुनकेश्वर -तारकर्ली - गोवा-मुंबई
असा प्लॅन आहे (दिवस ठरले नाहीत)
रोड जर्नी (कार) असणार आहे
मला ह्या ठिकाणच्या हटके जागा सुचवा
जस मला मारीओंच घर पहायचय त्याबद्दलही सुचना द्या
कोल्हापूर गोवा येथील नेहमीची ठिकाणे पाहिली आहेत

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle