September 2017

कर्करोग - २

आज आपण कर्क रोग कसा होतो त्यावर जरा विस्ताराने चर्चा करूया. जसे आपण आधी पहिले, कर्क रोग म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ जी आटोक्याबाहेर जाते. त्यातल्या काही पेशी मूळ स्थान सोडून जेव्हा शरीरात इतरत्र पसरतात तेव्हा त्याला मेटॅस्टॅसिस असं म्हणतात. मेटास्टॅटिक पेशी नवीन ठिकाणी परत वाढायला लागतात. वेळेत निदान न झाल्यास व उपचार न केल्यास, कर्क रोग शरीरात अनेक ठिकाणी पसरू शकतो.

असं काय होतं ज्यांनी अचानक सरळमार्गी पेशी अश्या बेताल होतात?

टॉम यम कुन्ग मे नाम थाई सूप प्रकार

थाई सूप प्रकार म्हणजे अगदी लाइट पण चविष्ट नरिशिंग

साहित्यः व्हेन काढलेले नदीतले फ्रेश प्रॉन पक्षी कोळंबी चार पाच. चिकन स्टॉक दोन कप, मध्यम कापलेले लेमन ग्रास दोन टेबल स्पून. काफीर लाइम ची पाने चार तुकडे केलेले गलांगल पक्षी थाई आले. मशरूम्स तुकडे करू न ५० ग्राम. लिंबाचा रस दोन टेबल स्पून. फिश सॉस दोन टेबल स्पून. कापलेली लाल किंवा हिरवी फ्रेश मिरची. एक टी स्पून. चिली ऑइल एक टी स्पून. कोथिंबीर सजावटी साठी.

Taxonomy upgrade extras: 

गेंग क्यो वान गाई अर्थात चिकन इन ग्रीन करी

ही एक मेन कोर्स डिश आहे. बरोबरीने भाताचा कोन हवा.

Taxonomy upgrade extras: 

वेबसिरीज/ वेबिसोड

सध्या युट्युबवर अनेक चॅनल आहेत. काही चॅनलवर मराठी मालिका प्रसारीत होत आहेत.
भारतीय डिजिटल पार्टी हे चॅनल सध्या खूप लोकप्रिय झालेलं आहे. अश्या युट्युब मालिका किंवा वेबिसोडविषयी गप्पा मारण्याविषयी हा धागा.

साम्राज्ञी - पाब्लो नेरुदा - अनुवाद

मी तुझं नाव ठेवलंय, साम्राज्ञी.
तुझ्याहून उंच आहेतच, जास्त उंच.
तुझ्याहून निर्मळ आहेत, अजून निर्मळ.
तुझ्याहून देखण्या आहेत की, खूप देखण्या.
पण तू साम्राज्ञी आहेस.

तू जेंव्हा रस्त्यातून चालत असतेस,
कोणी तुला ओळखत नाही.
कोणी तुझा रत्नजडित मुकूट पहात नाही.
कुणालाही दिसत नाहीत लाल-सोनेरी पायघड्या.
ज्यांना पदांकित करतेस तू जाताना,
त्या अदृष्य पायघड्या.
आणि जेंव्हा तू सामोरी येतेस,
सगळ्या नद्या खळाळतात माझ्या शरीरात.
घंटानादाने आकाश थरारतं.
आणि एक मंत्रोच्चार भरून राहतो सगळ्या जगात.

केवळ तू अन् मी,
केवळ तू-अन्-मीच , माझ्या प्रिये,
ऐकू शकतो हे सगळं.

-पाब्लो नेरूदा

कॉर्न कटलेट्स

साहित्यः एक वाटी ताजे मक्याचे दाणे( आमच्या इथे दहा रुपयाला सोललेल्या अमेरि कन स्वीट कॉर्न चे दाणे असलेली पाकिटे मिळतात. मी दोन तीन घेउन ठेवते. ऑफिसातून आल्यावर खायला बरी पडतात नुसती सुद्धा छान च लागतात. ) एक मध्यम साइजचा उकडलेला बटाटा, लसूण हिरवी मिरची, कोथिंबीर व जिरे ह्यांची एकत्रित पेस्ट, धने पावडर, आमचूर, चाट मसाला एक एक टी स्पून, चवी पुरते मीठ, तेल. कॉर्न फ्लोअर.

Taxonomy upgrade extras: 

नवजागर २०१७ : काकूस पत्र

प्रिय काकूस,

अनेक अनेक नमस्कार. पत्र लिहीण्यास कारण की आज तुझा ८१वा वाढदिवस आणि आज आम्ही तो सर्व जवळची मंडळी साजरा करणार आहोत. तुझ्या वाढदिवसाची चर्चा नुसतीच तुझ्या घरी नाही, तर आमच्या घरीही सुरू होती. काय करायचं?, तुम्हा लोकांचे काय प्लान आहेत? वगैरे वगैरे...

मग अचानक गेल्या आठवड्यात विद्यावहिनीचा फोन आला ठरलं, की आज ‘तुझा’ वाढदिवस साजरा करायचा. विचार करता करता लक्षात आलं की ८१ वर्षे, बापरे! किती हे मोठं वय... मी तुला किंवा तू मला माझ्या जन्मापासून ओळखत आहोत, पण तरीही तुझा उत्साह बघितला की मला अजूनही खरं वाटत नाही की तुझं वय ८१ वर्षे आहे.

Keywords: 

नवजागर २०१७ : स्त्री शिक्षण आणि संघर्ष

१५ सप्टेंबरला माझ्या भाचीचा आम्हा सगळ्यांना मेसेज होता - You all shall be wishing me on this day after 4 years. Thank you all in advance

यंदा ती उत्तम मार्कांनी बारावी पास झाली. इंजिनियरींगला जाण्याची तिची प्रबळ इच्छा होती, एन्ट्रन्सला मार्कही चोख होते पण तरीही तिथे प्रवेश घेण्यासाठी पालकांची मान्यता मिळवायला तिला संघर्ष करावा लागला.

तिच्या पालकांच्या मते इंजिनियरींग करणं आणि त्यात करीअर करणं तिला शारीरिकदृष्ट्या झेपणार नाही. शॉपफ्लोअरवर मुलींना उभं राहणं कठीण असतं. पुरुषी वर्चस्वाशी खूप कठीण सामना करावा लागतो आणि मुलगी म्हणून एक पाऊल नेहमीच मागे घ्यावं लागतं.

Keywords: 

उपक्रम: 

नवजागर २०१७ - माझी प्रेरणास्थाने

असामान्य, लोकोत्तर स्त्रियांची चरित्रे आपण सगळ्या नेहमीच वाचतो,अभ्यासतो. मात्र ज्या स्त्रियांना आपण लहानपणापासून आपल्या नजरेसमोर पाहत आलोय, त्यांचं जीवन हे अगदी जवळून न्याहाळत आलोय किंबहुना त्यांच्या जीवनातील आपणही एक भाग आहोत अशा आपल्याच घरातील, अवतीभवती वावरणार्‍या स्त्रियांचा आपल्या स्वतःच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा असतो, असं माझं मत. आपल्या घरातल्याच म्हणून आपल्याला काही विशेष असे वाटतही नाही त्यांच्याबद्दल, पण कळत नकळतपणे त्यांच्या संस्कारांची जडणघडण आपल्याला लाभत असते आणि त्यानुसार आपलं जीवनही आकार घेत असतं.

Keywords: 

उपक्रम: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle