April 2019

चैत्रगौर

चैत्रगौर

अंब्याच्या अंबारीवर झुलत
मोगरा सुगंध झेलत आली
लाडाची लाडली गौराई माहेरा आली ...

शांत शिशिरात किती वाट पहावी
फुटेल फुटेल चैत्र पालवी
कोकिळस्वर घुमता पहाटेस जाग आली
गौराई माहेरा आली ...
सोनसळी शेत शिवार गावी
एक एक ओंबी गाई ओवी
जात्यावरची आईची ओवी लाजली
गौराई माहेरा आली ...
सोसवेना उष्मा , झुल्यावर झुलवावी
डांगरमळ्यातील फळं- खिरणी द्यावी
विविध सुबक आरास पाहुनी कळी खुलली
गौराई माहेरा आली ...
हळदीकुंकवा सुवासिनींना आमंत्रणं धाडावी
भिजल्या हरभर्‍यांनी ओटी भरावी
आंबेडाळ,पन्हे,फराळानं तृप्त ही झाली

कविता: 

रातांबा पन्ह

रातांब्याचं पन्ह: ( कोकम चं पन्ह)IMG_20190423_085816minalms.jpg
साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.IMG_20190421_192417minalms.jpg

पाककृती प्रकार: 

Taxonomy upgrade extras: 

बंध- कलिंदनंदिनी वृत्त

बंध

कलिंदनंदिनी वृत्तः लगालगा लगालगा लगालगा लगालगा

अनाद आर्त साद ही, कशास आत्म ध्यास हा,
न मन पुरे न जन पुरे, कसा पुरेल श्वास हा?

नभात खेळ रंगतो, धरा तुझीच बावरी,
अचूक पेरशी कसा, चराचरात भास हा?

अरूप तू, अनंत तू, तरी तुलाच भाळते,
अरूप रूप देखण्या, अथांग रे प्रयास हा

अदेहदेहि धारणे, तुझ्या क्रिडा युगंधरा!
तुझेच नाम जोडता, अतूट हो समास हा!

नकोच ही अलौकिके, नकोत बंध पाश ही,
अमोघ प्रीत 'मल्लिका', न बंध- बंध खास हा!

Keywords: 

कविता: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle