April 2019

पायवाटा

"तुम्हाला कसा प्रवास आवडतो? स्वप्नातल्या गाडीतून घाटातल्या अवघड रस्त्याने किंवा सहा-आठ पदरी मोठ्या महामार्गाने? ऐन पावसाळ्यात दुचाकीने घाटातले धबधबे बघत थांबत की रखरखत्या उन्हात डोंगर दर्‍यात भटकायला? बाहेर बर्फ पडत असताना रेल्वेत उबदार वातावरणात बसून ते क्षण टिपायला की तंत्रज्ञानाची निसर्गाशी सांगड घालत उंचावर नेऊ शकणार्‍या रोपवेने?" असे कितीही पर्याय दिले तरी त्यातून हमखास एक असा निवडणे कोणाच भटक्याला जमण्यासारखे नाही. कारण यातल्या प्रत्येक प्रकाराची वेगळी गंमत आहे.

Keywords: 

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३

----

क्लोंडायकला पोचण्यासाठी त्यातल्या त्यात सुरक्षित पण तितकाच महागडा मार्ग होता 'समुद्रीमार्ग'. या मार्गाला "श्रीमंत माणसाचा मार्ग" असंही म्हणत असत.

507px-Klondike_Routes_Map2.png


सक्युलंटस्

सक्युलंटस्! सक्युलंटस्!! सक्युलंटस्!!!

बागकामाचं मला वेड होतं, आवड होती अशातला काही भाग नाही. पण इथे स्वीडनला आल्यापासून मला जाणवायला लागलं कि घरात झाडं हवीत. स्वीडनच्या लांब आणि हार्श विंटरला सहन करण्यासाठी घरात हिरवळ असणं आवश्यक होतं. कारण बाहेर सगळीकडे बर्फ आणि झाडांचे खराटे झाले होते. 
मग सुरु झाला झाडांचा शोध. 
इनडोअर प्लांट्स मध्ये सगळी फिरंगी झाड होती. आपल्या फुलझाडांना ऊन असणं महत्वाचं असतं त्यामुळे ती आधीच लिस्टमधून बाद होती. 
मग काही इनडोअर झाडं आणली. 
पण ते काय म्हणतात तसं,
I was not amused...
मग अचानक आयकिया मध्ये फिरताना ती दिसली. 
सक्युलंटस्...

Keywords: 

लेख: 

बरिटो बाऊल

अमेरिकेत चिपोटले नावाचे एक सो कॉल्ड "मेक्सिकन" रेस्टॉरंट आहे. तिथला बरिटो बाऊल आणि कसेडिया खायला आम्ही कधी मधी जात असतो. एकतर इतका सारा ल्येटुस आणि टोमॅटो वगैरे बघितले की जरा हेल्थी खाल्ल्याचे फीलींग येते. मग जरा जिवाला बरे पण वाटते. तर हा बाऊल घरी करायला तसा सोपा आहे, थोडी तयारी लागते पण घरी नीट जमतो. तर मी असा करते -

ल्येटुसची मोठी ५- ६ पाने (मी रोमेन प्रकारची वापरते)
१ कप शिववलेला भात, शक्यतो शिळा
१ कप शिजवलेले ब्लॅक बीन किंवा राजमा (खाली कृती देते आहे)
१०-१२ काड्या कोथींबीर
२ टोमॅटो
१ मोठा कांदा
१ हिरची मिरची
१/२ वाटी घट्ट दही
१ अव्होकॅडो
१/२ लिंबू
२ टेबलस्पून तेल

पाककृती प्रकार: 

कोकणातील काळे मोती ... करवंद

मे महिन्यात कोकणात आंबे फणस तर असतातच पण तोरणं, चारणं, शिवणीची फळं, जांभळं, करवंद असा रानमेवा ही खूप मिळतो. . विषय निघालाच आहे तर चारणं म्हणजे काय ते सांगते. आपण सुक्या मेव्यातली चारोळी आणतो त्याचं फळ म्हणजे चारणं. हे तसं आकाराने गोल आणि लहानच असतं. गर ही अगदीच थोडा असतो बी भोवती. पण ती बी फोडली की आत चारोळी असते. ह्या बिया फोडणे हे खूपच वेळमोडं आणि कटकटीचे काम आहे. ती एवढीशी बी हातात धरून स्वतःच्या हातावर मारून न घेता छोट्याशा हतोडीने बी वर हलकेच घाव मारायचा कारण जोरात घाव बसला तर आतल्या चारोळीचा चेंदामेंदा नक्की.

Keywords: 

लेख: 

परकी दुःखं

कविता माझा प्रांत नाही. तरीपण एका खोल वेदनेतून हे या फॉर्म मध्ये लिहिलं गेलं. दोन वर्षांपूर्वी लिहिलेलं हे आज काही कारणाने वर आलं. अस्वस्थ वाटतंय !

परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा हळूच कुरवाळावं

पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी.

त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी...

जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या

त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे..

झेपले तर थोडा दूधभात घालावा म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल...

कोण कुठले गरीब बिचारे

देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे..

मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत

Pet sematary - पूर्ण स्टोरी सहित

मुव्ही चं समीक्षण वगैरे हा माझा प्रांत नाही...तरी पण मी अनु च्या सांगण्यावरून मी हा प्रयत्न करणारे...
या मुव्ही ची बेसलाईन थोडक्यात सांगायची म्हणजे," अशी जागा जिथे प्रेतं चालू लागतात" A PLACE, WHERE DEAD STARTS WALKING

आहे ना भयानक???
तर बोस्टन वरून एक लहान गावात डॉक्टर लुई आपली पत्नी रेचेल, मुलगी एली , लहान मुलगा गेज आणि एक मांजर चर्च सोबत रिलोकेट होतो. ( सुरुवातीचा अर्धा तास माझा मिस झाला. का ते विचारू नका )
अर्थात फार काही नुकसान झालं नाही....
तर, त्यांच्या घरासमोर जेड नावाचा एक विक्षिप्त म्हातारा एकटा च राहत असतो....

Keywords: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle