May 2019

मध्यरात्रीच्या सूर्यास

गर्द किट्ट काळोख पांघरुन बसलेय मी
उदास मनाने तुझ्याकडे पाठ फिरवून

तू नाहीच येणारेस अजिजीने विनवत
अबोल्यांशी तुझी नसतेच कधी फारकत

डोळे गुडूप अंधारास सरावतायेत तोवरच
पाठीला तुझ्या अस्तित्वाची उष्ण उब येते

मन धाव घेतं तुझ्या धगधगत्या तेजाकडे
डोळे नव्याने घालतात मनाला साकडे

तू नुसतीच माझ्या उलघालीची मजा पाहतोस
तह करायला चंद्रा आडून चांदणं पाठवतोस

या तुझ्या नसण्या-असण्याच्या, अंधार-प्रकाशाच्या विभ्रमात
मन हेलकावतं नि मी स्वतःशीच गिरकी घेते आनंदात

पुन्हा तू दिसतोस, स्वच्छ हसतोस, क्लेश निवतात
डोळे तुला पिऊ बघतात, पुन्हा तेजाने दिपून जातात

चांदण गोंदण : 4

संध्याकाळची वेळ होती. टेकडीवर मस्त गार वारा सुटला होता. वीकडे असल्यानं तुरळक वर्दळ होती. त्याला यायला जरासा उशीर झाल्याने ती अगदी चिमूटभर का होईना रुसली होती. आजचा दिवस महत्वाचा होता ना! प्रत्येक मिनीट तिला त्याच्यासोबत काढायचा होता या दोन तासातला; त्यातली दहा मिनिटं त्यानं वाया घालवली होती. पण आता रुसून आहे तो वेळ पण वाया जाईल म्हणून ती पटकन तो राग विसरून गेली. त्याला आणखी एक कारण पण होतं.. आज तो तिच्या खूप खूप आवडीचा तो स्पेशल पांढरा शर्ट घालून आला होता. इतर शर्टासारखा तो कडक नव्हता तर एकदम मऊ मुलायम होता. त्या शर्टात त्याला मिठी मारायला तिला खूप आवडायचं. एकदम मऊ, उबदार वाटायचं.

Keywords: 

मुंबई पुण्याच्या जवळची शॉर्टट्रिपसाठी ठिकाणं

मुलींनो , जिंदगी से बेहाल असलेल्याना रिजूवनेट होता येईल अशी ठिकाणं सुचवा , हाती वेळ जास्त नसेल 2 ते 3 दिवस मॅक्स पण त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करता येईल अशी ठिकाणं ,मुंबई पुण्याच्या जवळची ...
तुम्ही जाऊन आला असाल , कुणी सजेस्ट केली असतील , तुमच्या विश लिस्ट मध्ये असतील , अशी ठिकाणांची यादी आपण इथे करू.
फोटो , रिव्ह्यू , हॉटेल्स , फोन न. सहित मोस्ट वेलकम

Keywords: 

चांदण गोंदण : 5

नव्या नव्या प्रेमाचे अलवार दिवस! नुकतंच एका केशरी संध्याकाळी भेटल्यावर काळजाचा डोह तळातून हलला आणि पाणी डोळ्याच्या काठापर्यंत हिंदकळलं. कितीतरी महिन्यांची मैत्री प्रेमात बदलत जाण्याची जाणीव सुखदही होती आणि थोडी दुखरीही. कारण त्या प्रेमात कित्येक पण होते..! खरं सांगायचं तर त्या पाण्यात बुडणार्या डोळ्यांच्या होड्यांनीच त्या दोघांना पैलतीरी सोडलं. कितीही पण परंतु असले तरी हे काठोकाठ भरलेले प्रेम कुठे सांडलं तर? ते जपायला हवं.. हळूवार.. गुपचूप. लाखात एखाद्याला मिळणारं भाग्य आहे ते.. त्याची किंमत या किंतूपरंतु वर तोलण्यात अर्थ नाही. या सुखांच्या लाटा मनात खोल दडवून ठेवायच्या..

Keywords: 

चांदण गोंदण : 6

ती: आठवतं तुला..
कॉलेजमध्ये कोणता तरी इव्हेंट होता
आणि आपण मदतनीस म्हणून नावं नोंदवली होती.
शनिवार संध्याकाळी मोठी चित्र जत्रा होती आणि चिकार लोक मुलं येणार होती.
तेव्हा सगळे तास दीड तास उशीरा येणार होते आणि आपला वेळ जात नव्हता.
आख्या कॉलेजला तीन फेऱ्या मारून पण कुणी येईना.
मग तहान तहान झाली तेव्हा
आपण बर्फाचा गोळा घेतला.

तो : बर्फाचा गोळा?
अच्छा, सकाळ आणि कॅम्लिन ने आयोजित केलेला तो चित्रमित्र कार्यक्रम?

तेव्हा सगळ्यांचं पाच वाजता यायचं ठरलं होतं आणि तुझा 3 लाच मला मेसेज आला होता - मी रेडी आहे. चल. मी थांबूच शकत नव्हतो घरात.

वेळ कसा गेला खरंतर कळत नव्हतं ना? तीन नाही पाच फेऱ्या मारल्या होत्या मेन बिल्डिंगला.

तहान मात्र खरी होती. सगळीच!

एकच बर्फाचा गोळा घेतला आपण. तू तुझे ओठ लाल आणि गार करून झाल्यावर मला म्हणालीस - घे!मी या बाजूने खाल्लाय. तू इकडून खाऊ शकतोस.

सायन्स जरा कच्चं आहेच तुझं. वितळणाऱ्या बर्फ़ाला कुठली बाजू असते?

पण तुझ्या ओठावर ओठ ठेवायची तशी का होईना आलेली संधी मी थोडीच सोडणार होतो?

आणि तू तरी कुठे सोडलीस नंतर? घेतलासच की माझ्या हातून पुन्हा. दोघांचे ओठ लाल आणि गारठलेले! तरी अस्पर्शित!

ती : (वितळणाऱ्या बर्फ़ासारखं पाणी पाणी होत)
आणि मग रात्री गप्पा मारताना तू गायलेलं "वो शाम कुछ अजीब थी!"

पुढे सरकून तिचे हात हातात घेऊन त्यानं आवाज लावला -

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास-पास थी, वो आज भी करीब है
वो शाम कुछ अजीब थी...

झुकी हुई निगाह में कहीं मेरा ख़याल था
दबी-दबी हँसी में इक हसीन सा गुलाल था
मैं सोचता था मेरा नाम गुनगुना रही है वो
न जाने क्यों लगा मुझे, के मुस्कुरा रही है वो
वो शाम कुछ अजीब थी...

मेरा ख़याल है अभी झुकी हुई निगाह में
खिली हुई हँसी भी है, दबी हुई सी चाह में
मैं जानता हूँ मेरा नाम गुनगुना रही है वो
यही ख़याल है मुझे, के साथ आ रही है वो
वो शाम कुछ अजीब थी...

Keywords: 

चक्राता - हिमालयन पॅरेडाइज परिसर

ह्या आधीचा भाग इथे वाचा.

दगडी बांधकाम केलेल्या आणि लाकडाचा भरपूर वापर केलेल्या खोल्या मस्त उबदार होत्या. पांघरूण १.५-२ इंच जाडीचं आणि चांगलं जड होतं. ४:३० चा गजर बंद केला पण पांघरूणातून बाहेर येऊ वाटेना. परत झोप लागणार असं वाटत होतं तोवर अंदाजे ५ वाजता पक्षांचे आवाज येऊ लागले होते. प्रोमिनंट येत होते ते आवाज होते Black Francolin आणि Great Barbet यांचे! किका म्हणतात Black Francolin चा कॉल 'चीक पान बिडी सिगरेट' असं म्हणल्यासारखा असतो हे अगदी तंतोतंत पटलं. न रहावून बाहेर आलोच.

रिसॉर्ट असं होतं

Keywords: 

बी मॅन अमित गोडसे

दोनेक वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या काकूंकडे (पुण्यात) मोगऱ्याच्या वेलीवर गचपणात मधमाश्यांनी पोळं केलं होतं. ते काढायला एक जण येणार होता. मला असल्या उद्योगांत रस असतो म्हणून काकूंनी मुद्दाम बोलावलं. यातला जास्त इंटरेस्टिंग भाग असा होता की येणारा माणूस नेहमीप्रमाणे माश्या मारून पोळं काढणार नव्हता. उलट तो माश्या संवर्धनासाठी काम करतो. माझं कुतूहल अजूनच वाढलं. हे कसं करणार हा बाबा? का? मला बघायला मिळेल का? असं करावं हे कुठून मनात आलं? कशी सुरुवात झाली असेल?

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle