August 2020

ऐल पैल 20- ट्रस्ट इश्यूज

त्रिशा रात्री घरी पोहोचली आणि थेट झोपली. दुसऱ्या दिवशी आठवडाभरासाठी सेट केलेल्या साडे पाचच्या अलार्मनेच तिला जाग आली. तिला उठावसं तर वाटतंच नव्हतं उलट आज इमेल करून सिक लिव्ह टाकावी असं वाटत होतं. ती बेडवर उठून बसली , मोबाईलवर इमेल टाईप करायला लागली. पुन्हा थांबली. ऑफिसला दांडी मारून काय होणार आहे? मला या सगळ्या प्रकारात स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. त्यासाठी अशा बारीक बारीक वुलनरेबल क्षणांना हरवावं लागेल. मनाशी म्हणत तिने इमेल पुन्हा खोडून टाकला. कशालाच दांडी मारायची नाही, असा विचार करून अंगावरचं पांघरून झर्रकन बाजूला केलं. ब्रश करून टेरेस मध्ये एक्सरसाईझ करायला गेली.

Keywords: 

आनंदयात्री

Miracles take place... If you have faith....

चालत जावं कधीतरी नुसतंच... दिसेल..
डोळ्यासमोर रस्ता कसा 'वाट' बनतो ते...

बसावं कधी निवांत.. जुन्या आठवणींसोबत... कळेल...
आठवणींनाही आपली आठवण येते कधी कधी...

द्यावी मोकळीक स्वतःला।... जखमा नव्याने अनुभवायची...
जाणवेल मग.. वेदना कशी स्वतःच मलम होते ...

दर वेळी कशाला स्वतःला सावरायच? दाटू द्यावा कंठ... वाहू द्यावे अश्रू...
उमगेल मग.. भरून आलेल्या आभाळाच बरसून मोकळं होणं...

द्यावी स्वतःचीच सोबत स्वतःला... आपलीच हरवलेली रूपं भेटतील नव्याने पुन्हा...

घेत तसं सततच असतो काही न काही... कधीतरी द्यावी भेट.. समाधानी असण्याची...

कविता: 

ऐल पैल -21 बु नसल वेदा! (व्हॉट काइंड ऑफ फेअरवेल इज धिस?)

सकाळी त्रिशा ऑफिसला निघण्यासाठी बाहेर पडली तेव्हा समोरचं दार उघडंच होतं. तिने जवळ जाऊन पाहीलं. नकुल त्याच्या बॅग्स एकत्र आणून ठेवत होता. तो जाणार हे तो म्हणाला होता तरी रात्रीतूनच त्याचं ठरेल हे त्रिशाला अजिबातच अपेक्षित नव्हतं. तिला आलेली पाहून त्याने वर पाहीलं.
"तू निघालास? " त्रिशा आश्चर्यचकित होऊन म्हणाली.
बॅगेची चेन लावून तो उभा राहीला.
"हो. तुझीच वाट पहात होतो."
"रात्रीतूनच ठरलं? आशिष म्हणाला तसं? "
" त्याने मला दुसरी जागा सापडेपर्यंतची मुदत दिली. ही इज काइंडेस्ट मॅन. त्याच्याजागी मी असतो तर मला इतकं शांत राहणं जमलं नसतं."

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 22 - नॉस्टॅल्जीया

नकुलला दुसरीकडे रहायला जाऊन महिना होत आला होता. त्रिशाच्या ऑफिस- साल्सा- घर- नकुल या क्रमाने गोष्टी चालूच होत्या आणि नकुल नंतर पायल चा भाग येऊन गाडी पुन्हा स्क्वेअर वन येत होती. फरक एवढाच होता, त्रिशाला आता त्याचा त्रास होत नव्हता. ही परिस्थिती तिच्या सवयीची झाली होती.
नकुल समोर असताना मनातला राग, कन्फ्युजन, सारासार विचार जाऊन पुन्हा त्याची जागा नकुलच कधी घेत हे तिलाही कळत नसायचं, त्यामुळे संपर्क तोडून टाकणं हा उपाय कामाला आला होता. मनात एक पोकळी घेऊन चाकावर फिरत राहण्याऱ्या उंदरासारखं आयुष्य सतत चालत असून तिथेच रहात होतं.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 23- भेट

"ओके मीनू, घरी आले की बोलू." त्रिशाने त्याच्याकडे बघत फोन ठेऊन दिला.
ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघत ती पुढे आली. जशी ती त्यांच्याजवळ येत होती तसं तिच्या दिशेने तोंड करून उभा असणाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे जाऊ लागलं. त्यांना तसं बघताना पाहून त्यानेही मागे वळून पाहीलं.
त्याला पाहून त्रिशाचा नकळत आ झाला आणि एकदम तोंडावर हात ठेवत ती हसायलाच लागली. तो आश्चर्याने डोळे मोठे करत तिच्याकडे पूर्ण वळून उभा राहीला. ती एवढी का हसतेय ते कळून तोही हसायला लागला. किती दिवसांनी त्याचं आजूबाजूचा आसमंत उजळवून टाकणारं मोठ्ठं हसू तिला दिसलं होतं. त्यावरून बळच नजर हटवून तिने बाकी लोकांकडे पाहीलं.

Keywords: 

लेख: 

द मेंटलिस्ट

नेटफ्लिक्सच्या धाग्यावर या सिरीजविषयी मी हा प्रश्न विचारला होता...

'द मेंटलिस्ट' कुणी पाहिलं आहे का? कसा शो आहे?
मागे 'कॅसल' बिंज वॉच केलं होतं... पण नेथन फिलनचा मूळ कॅरॅक्टर- रिचर्ड कॅसल कधीच नाही आवडला. आणि डिटेक्टिव्ह बेकेट मात्र आवडली होती. त्याच प्रकारचा आहे का हा शो? डिटेक्टिव्ह हिरोईन आणि तसा घाबरट पण माईंडगेम्स खेळणारा हुशार, उद्धट हिरो?

त्यानंतर मॅगी आणि प्राचीटीच्या भरवशावर पाहायला सुरुवात केली, आणि बघता बघता सगळी सिरीज पाहून संपवलीसुद्धा. Dancing

ऐल पैल 24 - Sway again! (शेवट)

सकाळी उठल्यानंतर त्रिशाने पुन्हा एकदा नकुल ला कॉल करून पाहिला. उत्तर नाहीच. त्यांचं बोलणं झाल्यापासून ती अस्वस्थ झाली होती. रात्री उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला आणि दोन तासानेच रोजच्या अलार्म ने तिला जागं केलं. रिजाईन केल्यामुळे पुढचे दोन महिने ऑफीसला दांडी मारणे ही शक्य नव्हते. कपाटातून तिचा ब्लॅक टी शर्ट आणि डेनीम जीन्स काढताना तिला तिच्या क्रोशे जॅकेट चा गोंडा खाली लटकताना दिसला. तिने तेही बाहेर काढून ठेवलं.

Keywords: 

लेख: 

फ्रोजन मोदक - चर्चा

फ्रोजन मोदक करण्याचा कोणाला अनुभव आहे का?
मला टिपा हव्या आहेत.
सोमवारी पहाटे 5 वाजता मोदक डब्यात भरून द्यायचे आहेत. सकाळी लवकर उकड काढणे, मोदक वळणे, वाफवणे एवढं सगळं करणं शक्य नाहीये. मी काय कसं केलं तर मला हे प्रोजेक्ट सोपं होईल?

चतुर्थीसाठी सारण करणार आहेच, ते जास्तच करून ठेवणार आहे.

पाककृती प्रकार: 

आंबा काजू कमळफुल

आंबा काजू कमळफुल: 20200820_175235minalms.jpg
आटवलेला आमरस एक वाटी, साखर एक वाटी
काजूगर दोन वाटी, साखर एक वाटी,
दोन्हीसाठी वेलची पावडर आणि पाणी
कृती: १) काजूगर थोडे थोडे घेऊन मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली. ती बाजूला ठेवली.
२) आमरस एक वाटी मोजून घेतला.
३) कढईत एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवलं, त्यात पाव चमचा वेलची पावडर घालून गोळीबंद पाक केला.
४) गॅस बंद करून आटवलेला आमरस मिक्स केला.

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle