प्राथमिक शाळेतल्या बालभारती मराठीच्या पुस्तकात एक भैरूचा धडा होता. ‘पहाट झाली, भैरू उठला. बैल सोडले. औत घेतले. शेतात जाऊन औत धरले’ असं काही शेताचं आणि शेतीतल्या कामांचं वर्णन त्यात होतं. आमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या आणि मर्ढेकरांच्या कवितेतल्या ‘ सकाळी उठोनि चहाकॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज-गाडी’ ह्या वातावरणात वाढलेल्या मुलांना शेतीकामाची इतकीच तोंडओळख असे.
"म्हणजे?
देवबाप्पा, कुछ कुछ होता है आणि त्याखालपासून सुरू होऊन चिठ्ठीच्या शेवटच्या टोकाकडे निर्देश करणारा बाण?
याचा अर्थ काय शेठ?"
जयंतानं असं विचारताच सगळ्यांचेच डोळे अनुकडे लागले.
अनु मात्र त्यात काय मोठंसं असा भाव चेहर्यावर आणून सांगू लागला.
"बाबा, पहिली चिठ्ठी देवबाप्पाला लिहायची होती. पहिलं कुठलंही काम देवबाप्पाच्या चरणी असं काकुआज्जी म्हणतात ना? मग?
आणि चिठ्ठी नेहमी हिंदी मध्येच लिहितात किनै. म्हणून लिहिलं तसं". अनु आता शोभाताईंकडे वळून बोलत होता.
डायरी लिहिण्यात अधूनमधून गॅप होतच असतो, पण ह्यावेळेस जरा जास्तच गॅप पडला,हे खरंच.. सांगण्यासारख्या खूपच गोष्टी रोज घडत आहेत, पण ठरवूनही पूर्वीसारख्या लिहिल्या जात नाहीयेत. त्याला 'writer's block' असेही म्हणू शकत नाही, कारण लिहायला सुरुवात केली आणि सुचलेच नाही, असेही झालेले नाहीये. लिहायला बसण्यासाठी वेळ आणि मूड दोन्ही जुळून येणे ह्यावेळी काही ना काही कारणाने घडले नाही. असो.
चिठ्ठी भाग-
"ए आमची चिठ्ठी कुठंय?", हनीने मोठ्या उत्सुकतेने विचारलं. बनीने चिठ्ठीच्या भेंडोळ्याला हात घातलाच होता आणि तेवढ्यात अनु ओरडला- "ए नको. तुमचं काही नाहीये तिथं".
"तू आम्हाला नाही लिहिलीस चिठ्ठी? आम्ही डॅडूला सांगू तुझं नाव. कट्टी जा!", असं म्हणून बनीने निषेध जाहीर केला व ते भेंडोळं शोभाताईंकडे दिलं व नेहमीच्या शिरस्त्यानुसार त्या भोकाड पसरून घरी निघाल्या.
"अरे पण, चिठ्ठी लिहिली तर समजायला तुम्हाला वाचता तरी येतं का? हिंदी समजतं का?", इति अनु.
"हो हो. सगळं येतं आम्हाला. तुझ्या पेक्षा जास्तच. आधी अक्षर सुधार जा!", हनी ओरडून पळाली.
"कायदा" या क्षेत्रात डॉक्टरेट असलेले मात्र डिमेन्शिया म्हणजेच विस्मरणाचा आजार झाल्याने सिनियर केअर होममध्ये दाखल झालेले आजोबा करोना काळातील नियमानुसार क्वारंटाईन फ्लोअरवर दोन आठवडे राहून आणि भरपूर गोंधळ घालून संस्थेच्या तळमजल्यावर असलेल्या डिमेन्शिया वॉर्डमध्ये हलवले गेले.
मागे एका धाग्यावर या विषयावर लिहीन असं म्हणाले होते पण याविषयी लिहिण्याची माझी पात्रता आहे का? अशी रास्त शंका आणि मुख्य म्हणजे मला हवे असलेले पुस्तक उपलब्ध नसणे या दोन कारणांमुळे यावर लिहिणे मागे पडत गेले. आता माझ्याकडे आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेले “ईशावास्य- वृत्ती” हे पुस्तक आहे. जरी या विषयावर लिहिण्याची माझी पात्रता नसली तरी किमान माझा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवावा आणि त्यातून या अमृततुल्य पुस्तिकेची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने लिहीत आहे. लेखात जर काही चुका असल्या तर माझ्या लक्षात आणून द्या अशी विनंती!
आजचं जग हे झपाट्याने होणार्या वैश्विकीकरणाचं आणि त्याचबरोबर अस्मितांविषयक वाढत्या जाणिवांचे आहे. सगळं जग एकसमान व्हायला लागलं तर आपण आपली सांस्कृतिक ओळख विसरून जाऊ, अशा एका नकळत्या भीतीने गेल्या काही दशकांमध्ये अस्मितांच्या भिंती जास्तच पक्क्या होऊ लागल्या आहेत. या अस्मितांचे ताणेबाणे बहुपेडी आणि गुंतागुंतीचे असतात. यातला एक ठळक उठून दिसणारा धागा म्हणजे प्रादेशिक अस्मिता. त्याविषयी आपण समाज पातळीवर, सांस्कृतिक क्षेत्रात वारंवार प्रकट होत असतो.
डॉक्टरेट आजोबा आणि जर्मन लिटरेचरच्या लेक्चरर आज्जींची भलीमोठी गोष्ट आता कन्टीन्यू करते.
आजोबा भेटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी परत या आज्जींना भेटले. त्या चांगल्या मूडमध्येच होत्या. त्या दिवशी आज्जींच्या हातात एक जर्मन पुस्तक होते. मला बघून अतिशय गोड हसून त्या म्हणाल्या, "तुमचे खूप खूप आभार! आता मला अजिबात एकटं आणि ऑड वाटत नाहीये." मग हातातलं पुस्तक दाखवत म्हणाल्या, "हे माझ्या बहिणीने मला पाठवलं आहे. ती दुसऱ्या गावी राहते. माझ्या वाचनाच्या आवडीबाबत तिला कल्पना आहे. आता माझ्याजवळ वेळच वेळ असल्याने तिने माझ्यासाठी हे पुस्तक आणि सोबत पत्रही पाठवलं आहे..."
नेटफ्लिक्सच्या धाग्यावर गप्पा रंगतायत. ह्याचा वेगळा धागाच हवा असे वाटले. तुम्हाला स्वतःच्या पोस्टी कॉपी पेस्ट करता येत असतील तर कराल का? मला आत्ता लगेच पोस्टी हलवायला जमणार नाहीये.