पुण्यापेक्षा मावळ भागात पाऊस जास्तच पडतो. सध्या तर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेताच्या आसपास सगळीकडे गच्च हिरवं वातावरण आहे. जवळच्या डोंगरांवरून धबधबे वाहताना दिसतात. तो भाग इंद्रायणी तांदुळाचा. भाताच्या शेतात पाणी भरलं आहे. भाताच्या पिकाचा सुगंधही जाणवतो.
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी..
बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी
आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष..
पण तू....
माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस
येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का
उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस
माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात
माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस
मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी
खूप काही सांगावं वाटतं
पण नाही सांगू शकत मी
मी न्याहाळत राहतो तुला
इतकी कशी तू वेडी...
गेली कित्येक वर्ष पाहतोय मी तुला
नी ला ५ वर्षे पूर्ण झाल्यावर तब्बल सहा महिन्यांनी हे कलेक्शन झाले आहे. काल फेबुवर त्याचा पहिला भाग ओपन केला. तो आता इथे टाकते आहे.
यावेळेला नवीन म्हणजे दागिन्यांमधे युनिसेक्स विभाग सुरू केला आहे.
फेस्टिव्ह नेकलेसेसमधे तुम्हाला आवडतील असे कॉर्डमधे रंगबदल करून मिळू शकतात. किंमत व खरेदीसंबंधी इतर चर्चा खाजगी संदेश वा इमेलद्वारे करूया.
युनिसेक्स विभाग
पेंडंटस
PU 0001
दगडाभोवती स्टीलचा पिंजरा. लांब कॉटन वॅक्स कॉर्ड. (बुक्ड)
एखादा दिवस उगवतोच सुस्तावल्यागत.
का उगवतो?
का सुस्तावतो?
मनातच मळभ दाटलय तर
घसाघस अंग धुऊन काय व्हायचं?
का साचतय मनात हल्ली येवढं,
धुकं, धूर, गाळ, माती,
अश्रू, सल, पानं, फुलं, पक्षी?
सगळंच सांगावं वाटत नाही
काही लिहावं वाटत नाही
तरी पेन टेकला कागदावर की
शब्द झरत जातात
ओढ नसल्या झऱ्यासारखे
नि गढूळतात वाहणं विसरुन.
साचू नका बाबांनो
एकतर वाहत रहा जीथे मन मानेल
नाहीतर जिरून तरी जा मातीत
काय माहीत कोणत्या वेदनेचं मूळ
शेकडो मैल प्रवास करत
माती खाली शोधत असेल ओल.
डिसेंबरमधली एक टळटळीत दुपार. उत्तर कर्नाटकातल्या भीमाकाठच्या एका गावंढ्या खेड्यात मी दुपारच्या विश्रांतीसाठी जरा टेकले आहे. हेमाडपंती देवळाच्या ओसरीत माझ्याशिवाय कुणीच नाही. गावाकडे जवळजवळ पाठ करून नदीसन्मुख निवांत देऊळ. नदीपासून वरती वीसपंचवीस फूट काठ, त्यावर चौथरा बांधून देऊळ. देवळासमोर, नदीच्या काठावर, पायर्या उतरताना सुरुवातीलाच एक सिमेंटचा कट्टा करून आसपास मिळालेली शिल्पे ओळीने मांडून ठेवली आहेत. बैजवार हळदीकुंकू वगैरे वाहून. सकाळपासून बाहेरच्या उन्हात तापून आता इथला थंडावा अंगात भिनवत मी डोळे मिटून बसले आहे. माझ्या भटकंतीचा आणि कामाचा मनातल्या मनात हिशोब लावत.
"Between life and death, there is a library.. and within that library, the shelves go on forever. Every book provides a chance to try another life you could have lived. To see how things would be if you had made other choices."