प्रवास

देश-परदेशातील प्रवास, भटकंती - प्रश्न, माहिती, जनरल चर्चा, शंका

या धाग्यावर देशातील अथवा विदेशातील सर्व प्रकारच्या प्रवासासंदर्भातील जनरल प्रश्न, शंका विचाराव्यात.

या धाग्यातून जन्माला आलेले पिल्लू धागे :

Keywords: 

काश्मीर - ट्युलिप फेस्टिवल आणि इतर भटकंती

काश्मीर -ट्युलिप फेस्टिवल व्हिजिट आणि इतर भटकंती

एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यात श्रीनगरच्या ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिप फेस्टिवल असतो. लेकीची दहावीची परीक्षा संपत असल्यामुळे लॉंग ब्रेकमध्ये काश्मीर ट्रिप करायची हे ठरलेलं होतच तर ट्युलिप फेस्टिवल कव्हर होईल अशी वेळ ठरवून आम्ही टूर आखली आहे.
वैष्णोदेवी, पेहलगाम, गुलमर्ग,सोनमर्ग, श्रीनगर आणि मुख्य आकर्षण - फुललेली ट्युलिप गार्डन :dhakdhak: असणार आहे.
ह्या सर्व ठिकाणी काय काय बघावेच, कुठे शॉपिंग करावी, काय करू नये असे सगळे सल्ले द्या.

Keywords: 

कॅलिफोर्निया २०१५ : (६) पॅसिफिक कोस्टल हायवे

कॅलिफोर्निया २०१५ : (२) पूर्वतयारीचे तपशील

आधीचा भाग - कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे

आम्ही इतक्या दिवसांकरता अमेरीकेला जाणार म्हटल्यावरच बहिणींनी बोटावर बोटं ठेवायला सुरूवात केली. त्याचं कारण आमचं ट्रॅक रेकॉर्ड खरंच खराब होतं. कोणत्याही ठिकाणी १० दिवसांकरता जरी गेलो तरी ५-६ दिवसांत आम्हाला घरची आठवण येऊ लागते. कधीकधी तर ट्रिप प्रीपोन करून घरी आलोय. त्यामुळे त्यांचंही काही चुकलं नव्हतंच.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे

हा ' माझी उन्हाळ्याच्या सुट्टीतली ट्रीप' या विषयावरील निबंध नव्हे. त्यामुळे मी हे पाहिलं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), ते पाहिलं (आता खालील फोटोंत तुम्हीही पहा), मी हे खाल्लं (आता खालील फोटोत तुम्हीही पहा), अमेरीकेत जाऊन आल्यानं भारतातील अडचणी कशा ठळक दिसतात (आता तुम्ही या विषयावर भांडा), अमेरिकेत जाऊन आल्यानं अमेरिकेचे दोष कसे अधोरेखित होतात (आता तुम्ही या विषयावर भांडा) हा सगळ्या मुद्द्यांना दुय्यम ठरवण्यात आलं आहे. अर्थात या रसाळ मुद्द्यांचा पूर्ण अनुल्लेख करून त्यांची मजा घालवण्याइतकी मी अरसिक खासच नाही, त्यामुळे पुढे मागे हे मुद्दे आलेच तर होऊन जाऊ द्या!

Keywords: 

पाने

Subscribe to प्रवास
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle