आपण माणसं आनंदी होतो, दुःखी होतो, जेलस, पझेसिव्ह, भित्रे, दुष्ट, अहंकारी, प्रेमळ असतो. पण ह्याच सगळ्या भावना जर खेळण्यांमध्ये आल्या तर? हीच पार्श्वभूमी आहे टॉय स्टोरी ची!
वरकरणी पाहीलं तर हा एक अतिमानवीय थरारपट आहे. सिनेमातल्या नायकाकडे म्हणजेच कियानु रिव्हस् ने पात्र साकारले आहे त्या जॉन कॉन्स्टंटीन कडे काही दैवी शक्ती आहेत, ज्याद्वारे त्याला सामान्य मानवाच्या डोळ्यांना दिसणार नाही अशा गोष्टी दिसतात. ही गोष्ट वेगळी की त्याला तो वरदान न समजता शाप समजतो! सिनेमाची सुरवात पाहून इतर एक्सरसिस्ट प्रमाणे हाही एक रुटीन एक्सरसिस्ट आहे अशी आपली समजूत होते. पण हा तसा नाही. फक्त आपल्याला दैवी शक्ती आहे म्हणून तो पिशाच्चाने झपाटलेल्या लोकांची सुटका करतोय असं नाही. ह्या गोष्टी तो स्वार्थासाठी करतोय. का? तर त्याला माहीत आहे मेल्यानंतर त्याचा आत्मा थेट नरकात जाणार आहे.
घरी पेपरातल्या जाहिराती वाचून, मोठेमोठे प्लॅन्स करून, तयार होऊन, रिक्षात बसून नाहीतर स्कूटरवर ट्रिपल सीट जाऊन, रांगेत थांबून, तिकीट हातात आलं की आता पिक्चर! आता पिक्चर! म्हणून पोटात फुलपाखरं उडायला लागायची :fadfad: तीच आपली जुनी थिएटर्स आणि तो माहोल पुन्हा जागवूया फ्लॅशबॅकमध्ये जाऊन.. लिहूया आपल्या लहानपणापासूनच्या मोठ्या पडद्याच्या आठवणी :)
मला आठवणारे पहिले नाटक कुठले असेल तर ते" कट्यार काळजात घुसली" हेच असेल.
आम्ही पेणला रहात होतो तेव्हा आमच्या शाळेच्या ओपन एअर नाट्यगृहात नाटक बघणे हा एक सोहळाच असे. शहरापासून काहीशी दूर, एरवी दिवसाच्या उजेडात दिसणारी शाळा रात्री किती वेगळी भावत असे. रात्रीचा गारठा, सोबत रातकिड्यांची किर्र्रर्र, अंधूक दिवे, नटून ठटून आलेले लोकं, मध्ये खुर्च्या आणि बाजुला असलेली भारतीय बैठक, समोरचा मरून रंगाचा वेल्व्हेटचा पडदा, लावलेली नाट्यगीतं अन भावगीतं, ... सारं सारं वातावरण अगदी भारून टाकणारं. अन मग उघडला जाणारा पडदा अन त्या मागचे एक पूर्ण वेगळे जग. जणू प्रतिसृष्टीच अवतरायची तिथे.
प्रदर्शित झालेल्या तसेच कमिंग सून असण्याऱ्या चित्रपटांविषयी इथे चर्चा करूयात . आपलं ते हे फिल्मी गॉसिप सुद्धा करायचं बर का :heehee: :winking: :biggrin::bigsmile: