इथं एकूण शिवणाबद्दल हल्ली बरंच बोललं जातंय. घरात मशीन असणं ही संधी, सोय आणि चैन सगळं आहे. दुरूस्त्यांपासून, रिसायकलिंग ते नवीन क्रिएटिव गोष्टी सगळं लिहीता यावं म्हणून हा धागा.
बऱ्यापैकी मोठं काम असेल. स्पेशल असेल किंवा इमोशनल व्याल्यू जास्त असेल तर नवा धागा काढा. जनरल छोट्या प्रोजेक्टसना प्रोजेक्ट करायला हा वापरू.
डिस्कस करू, चुका दुरूस्त करू, फिनेस कशी आणायची ते बोलू. टीपा देऊ.
जसं की आज मी 10 मिनीटात एका स्टोलचा स्कर्ट करून टाकला. त्या स्टोलचा वापर कमी आणि फॉल आवडेलसा नव्हता. पण रंग आणि प्रिंट आवडतं होतं. सो हा प्रयत्न.
तू बोलत होतीस भडाभडा, मनातली सगळी भडास उतरवत होतीस
होता तो आरसा तुझ्या मनाचा
तुझ्या बोलण्यातून मला दिसणारा...
तुझे मन भयचकित कधी स्वत:च्या वागण्याने
तर कधी उद्विग्न इतरांच्या प्रतिसादाने
किती महत्त्व असते ना या साऱ्याला
मी बोलले - ते वागले
ते बोलले - मी वागले
मनभर पसरत राहतात
बोलण्या-वागण्याचे साद-पडसादही
निसटून पुढे जात असतो वेळ
आपले जगणेही....
किती जागा द्यायची अशा क्षणांना
आपल्या इवल्याशा मेंदूत अन देहकुडीत?
क्षण तर संपलेला अन आपण त्यात अडकलेले
कशासाठी?
इतकं का आपलं आयुष्य कवडीमोल आहे
की ते टाकायचं संपवून
अशा बेचैन करणाऱ्या निरर्थक क्षणांमध्ये?
वयच काय होतं तिचं! खेळण्या-बागडण्याचे दिवस होते तिचे! पण थोरामोठ्यांनी तोंडात बोट घालावं, असं तिने अभूतपूर्व साहस अजाणत्या वयात करुन दाखवलंय, व आज ती कित्येकांची प्रेरणास्थान बनली आहे. तिच्या धाडसाचं वर्णन भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय.
हां तर जायचं बरंच आधी ठरलं होतं हे तर माहिती आहेच तुम्हाला. राजेश हीरल बरोबर मी मागच्या वर्षी हिमाचल ट्रिप केलेली. आणि हीरलबरोबर गोवा वुमेन्स ड्राईवपण. त्यांच्या मुलीला स्पेनमधल्या एका युनिवर्सिटीत अॅडमिशन मिळाली हा स्पेनचा ट्रिगर. तिला तिकडं सेटल करून पुढं अँडाल्युशियाची ट्रिप असा प्लॅन होता. आम्ही तिकिटं बुक केली मुंबई-मद्रिद रिटर्न. विजा वगैरे उरकलं. मग दोन भेटी, अनेक कॉल्स आणि असंख्य वॉटसॅप मेसेजेस मधून गावं आणि तारखा ठरल्या. अयरबीएनबी अपार्टमेंटस बुक झाले. मीनवाईल, इतर मित्रमैत्रिणींशी बोलून माझं हे ठरलं की बार्सेलोनाशिवाय स्पेन अपूर्ण आहे.
केंद्र वर्गात मिनु बायदेव आसामीत एक गाणं गाऊ लागली अन अंगावर सरकन काटा आला .... आसामी भाषेतलं मला ओ की ठो कळत नाही, पण ज्या आर्ततेने ती म्हणत होती ......ते थेट मनाला भिडलं होतं.... गाणं संपल्यावर मोडक्या तोडक्या हिंदीत तिने गाण्याचा भावार्थ सांगितला..... त्यातला मला किती कळला? पण एवढचं लक्षात आलं की प्रत्येक अखमीया स्त्रीच्या मनात जिच्याविषयी हे गाणं आहे तिच्याबद्दल - 'जयमती'बद्दल, अपार माया व श्रध्दा आहे. तेव्हापासून माझ्याही मनात कुठेतरी 'जयमती' रुतुन बसली व ती स्वस्थ बसू देईना. धेमाजीतली पुस्तक-दुकाने, वाचनालय शोधले, पण कुठे काही साहित्य मिळेना. मग गुवाहाटीला गेले असताना श्री.
फेसबुकवरील एका मैत्रीणीने विमान उतरताना मुंबई कशी निळी दिसते असा एक फोटो टाकला होता. ही निळाई होती टर्पोलिनच्या शीट्सने आच्छादलेल्या झोपडपट्टीची!
माझा रोजचा जा-ये करण्याचा नवा बदललेला रस्ता पहिल्या दिवशी कुतूहलाने नीट बघून घेतला. दुसर्या दिवसापासून तिकडे नजर वळेनाशी झाली, कारण तिथे इतकी घाण आहे आणि त्या घाणीतच माणसांची घरं आहेत, अशीच आच्छादलेली, तुटक्या दारांची, खिडक्या असलेली- नसलेली. आपल्या एसी गाडीतून फिरताना नजर बंद करता येऊ शकते, पण वासाचं काय? एअर-फ्रेशनर किती मारणार? आणि त्याला मागे सारून नाकात घुसणारी घाण कशी टाळणार?
हिंदी / मराठी इंग्लीश Use Ctrl+Space to toggle
फाँट वाढवायचा असल्यास : कीबोर्डवरील Ctrl + ही बटणे एकाच वेळी दाबा.