आज मला खुप मस्त वाटतंय... कारण???
हो हो कारण आहेच तर....
मागे मी काही दागिने बनवलेले... त्यातील बरेचसे मैत्रिण वरील मैत्रिणींनी विकत ही घेतले. बनवलेल्यांपैकी ४ सेट्स महाग होते अर्थात quality एकदम बेस्ट. पण घरातुन, " ह्या खोटे दागिने २-२००० ला कोण घेणार.. तुच घाल आता ते " असा आहेर जाऊबाईंकडुन मिळालेला. नाही म्हटलं तरी मनाला लागलेलंच
पण परवाच एक मैत्रिणीने माझे ३ सेट्स एक हाती घेतले. माझा आनंद गगनात, मनात आणि बाकी कुठ्ठे ही मावत नाहीये. म्हणुन ईकडे ही शेयर करतेय.
तसं आपल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासून ऐकून माहिती असतंच की, नोबेल पारितोषिक हा संपूर्ण जगातील अत्यंत सन्मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये अत्युत्तम कामगिरी, अथवा संशोधन केल्याबद्दल ही पारितोषिके दिली जातात. 'आल्फ्रेड नोबेल' या स्वीडीश शास्त्रज्ञाने आपल्या मृत्यूपत्रात या पारितोषिकांची तरतूद करून ठेवली आहे, वगैरे... वगैरे...
नोबेल पारितोषिक विजेते : योशिनोरी ओह्सुमी (Yoshinori Ohsumi)
विभाग : वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र
जन्म : ९ फेब्रुवारी, १९४५ (सध्या वय : ७१ वर्षे)
देश : जपान
स्वप्नांना वगळून रात्र सोसली आहेस कधी?
निळाई गिळून टाकतो काळोख
हट्टाने मग मनातला एकेक तुकडा जोड़ायचा
ठिगळाचा pattern स्वप्न म्हणून खपेल का?
काळोखाला भेदणारी निळाई सापडेल का?
पहात रहायच मिटल्या डोळ्यानी
जाग येतेच कधितरी
पण काळोख असतोच वर खाली
डोळे फाडून बघत रहायच
टक्क!
ठिगळाचा pattern बनवत रहायच
दिवस उजाडे पर्यन्त
स्वप्नांना वगळून दिवस मात्र सोसायचा
हसत हसत ढकलत रहायचा
मनात एकेक तुकडा साठवायचा
एका नवीन रात्री साठी
एका नव्या निळाईसाठी
नोबेल पारितोषिक विजेते : ह्युअॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन (Juan Manuel Santos Calderón)
विभाग : शांतता
जन्म : ऑगस्ट १०, १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
देश : कोलंबिया
दुष्ट शब्द आला आज भेटायला...
खाडकन् थोबाडात मारली माझ्या
म्हणाला
अग दुष्ट या शब्दालाही मर्यादा असते काही
काही क़ायदे असतात दुष्टपणाचे!
तू ज्याला सारखी दुष्ट म्हणतेस
तो कधीचा ओलांडून गेलाय तुला
तुझ्याशी दुष्ट वागावं इतकिही तू
उरली नाहियेस आयुष्यात त्याच्या
दुष्ट म्हणायचच असेल तर म्हण स्वतःलाच
किती छळ स्वतःचा?
इतका त्रास तर त्यानेही दिला नसेल तुला
फेब्रुवारी 2017 मध्ये सकुसप दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश, जमल्यास डेहराडून असा प्लान आहे. दिल्लीत मी अभ्यास करणार, तेव्हा लोक्स टीपी करणार 2 दिवस आणि मग पुढचा प्रवास.
तेव्हा टीपा, राहायची ठिकाण, बघीतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे असं सगळं येऊ द्या.
लेकरू 3 वर्ष आणि ज्येना सोबत आहेत.
मागच्या वर्षीची माईन क्राफ्ट ट्रेझर हंट पार्टी मुलाच्या मित्रांमधे चांगलीच हिट झाली आणि तो पार्टी फीवर उतरत नाही तोवर मुलाची पुढची डिमांड आली, मला पुढच्या वर्षी ईंडिआना जोन्स पार्टी हवी आहे आणि पुन्हा ट्रेझर हंट हवे आहे.
मुलाची डिमांड ऐकून आधी झाले पण कुतुहल म्हणून गूगल केले तर खूप आयडिया मिळाल्या, आणि मग मी तो चॅलेंज स्विकारला :talya: . बजेट मधे ईंडिआना जोन्स थीम पार्टी करण्याचा.