कदाचित तुम्हाला माहित असेल की मी बिगिनर्ससाठी कलर्ड पेन्सिल वर्कशॉप घेत असते.
पण यावेळेस प्रथमच मी सबजेक्ट स्पेसिफिक असे वर्कशॉप घेतेय. माझ्याच घरी. जास्तीत जास्त ५ जणांचा ग्रूप असेल.
विषय आहे, फुलपाखरु. दोन तासांच्या या वर्कशॉपमध्ये आपण फुलपाखरु इन डीटेल रेखाटणार आहोत.
स्केचिंगचे बेसिक्स ठाऊक असले तर उत्तमच. सो, या शनिवारी सकाळी दोन तास वेळ असेल तर नक्की या. मजा येईल.
मागच्या वर्षीपासून पेंडींग असलेलं हे चित्र आता पूर्ण केलं.
CPM म्हणजे कलर्ड पेन्सिल मॅग्झिनतर्फे दर महिन्याला चित्रांची चॅलेंजेस दिली जातात. त्यातल्या २०१६ च्या जुलै महिन्याचं हे चॅलेंज होतं.
फॅबर कॅसल कंपनीच्या क्लासिक आणि पॉलिक्रोमोस तसेच डेरवन्ट कलरसॉफ्ट या ब्रँडच्या पेन्सिल्स मी यात वापरल्यात. कागद साधाच आहे फार जाड नाही. टोमॅटोची स्कीन स्मूथ दिसणे आणि त्यावरील रंगांचे ग्रेडेशनही स्मूथ दिसणे हे फार चॅलेंजींग होते. नाहीतर टोमॅटो की सफरचंद असं होऊ शकते. :ड
नॉर्थ इस्ट इंडिया म्हणजे पूर्वोत्तर भारतात पर्यटनासाठी योग्य काळ कोणता; तिथे काय काय पहावे; कुठे रहावे; काय खावे; हे सगळी माहिती एकत्रित करण्यासाठी हा धागा.