July 2020

जिल्हा : अकोला

आपल्या स्वतःच्या गावाखेरीज इतर गावे, जिल्हे आपल्या मित्रमंडळी/नातेवाईकांच्या माध्यमातून इतर तीन चार गावं ओळखीची होत जातात. अशा गावाची, जिल्ह्याची ओळख आपल्या गप्पांमधून इतर मैत्रिणींना व्हावी म्हणून असा धागा चालू करण्याच्या अवनीच्या या अभिनव कल्पनेतला हा दुसरा जिल्हा - अकोला! (अक्षरानुक्रमाने जिल्ह्यांविषयी माहिती घेण्याची कल्पना आपल्या लीलावतीची!)

Keywords: 

ऐल पैल 15 - अंडरग्राउंड क्लब

पुढचा पूर्ण दिवस नकुलचं लक्ष ऑफिसच्या कामातून उडालं होतं. आजचा सकाळचा प्रसंग खासकरून नकुलवर जास्त परिणाम करून गेला होता. तिला तो आवडतो ही गोष्ट आता जुनी झाली होती पण त्यांच्यातल्या अडकून पडलेल्या गोष्टी आणि पायल प्रकरण होऊन सुद्धा त्रिशा सारख्या कॉन्शस मुलीला तिच्या एवढ्या पर्सनल गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावंसं वाटणं, ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या नात्याचा पाया पक्का होताना त्याला दिसत होता. त्यांच्या एकमेकांबद्दलच्या फिलिंग्ज वाढत गेल्या तसा तिचा स्वभाव ओळखून तो त्याच्या केअरफ्री स्वभावाला ठरवून बांध घालून तिच्याशी वागत होता.

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 16 - कॅफे

घरी जाऊन आईला, बहिणीला भेटून त्रिशाला रिचार्ज झाल्यासारखं वाटलं. दरवेळी ती गावी आली की नोकरी सोडून देऊन लहानपणी असायचो तसंच इथं कायमचं रहावं असं तिला वाटत असे. यावेळीही तसंच वाटलं. तिची खोली, घराच्या लहानशा बागेतला झोपाळा, फुलझाडं, लहानपणापासून पहात आलेली कपाटं-डबे-भांडी-खिडकीतून दिसणारं तेच दृश्य, डोकं टेकवायला आईची मांडी, ताईगिरी दाखवण्यासाठी बहीण, जुने शेजारी.. आपली जागा! हल्ली काही वर्षांपासून घरी आली की तिला बाबांची कमी जाणवत असे. यावेळीही झालीच पण नकुल म्हणाला तसं " बरोबर घेऊन जगायचं" चा प्रयोग करून बघण्याचा ती प्रयत्न करत होती.

Keywords: 

लेख: 

वाटेवर चालत जाता...

वाटेवर चालत जाता.... पावलास पंख फुटावे...
उचलून पाऊल अलगद... आकाश कवेत भरावे....

नभ श्यामनिळे सोनेरी... मजसाठीच ते झुकणारे....
मी पंख जरा पसरवता....संगे पल्याड नेणारे....

क्षितीजावर पाऊल पडता... नवसृष्टीचा आवेग...
मागे उरल्या शब्दांचा... घनश्याम सावळा मेघ...

क्षितिपार विहरून येता... मन घरट्याशी उतरावे....
नभ अवखळ अंगण होऊन.. उंबऱ्यात उतरून यावे..
-कल्याणी

कविता: 

ऐल पैल 17 - रस्टिक फर्निचर, ऍबस्ट्रॅक्ट ड्रॉईंगस्

नकुल ऑफिसमधून आला. समोरच्या बंद दाराजवळ येऊन त्याने बेल वाजवली. दार मीनाक्षीने उघडलं. ती काही बोलणार तोच त्याने मीनाक्षीला इशाऱ्यानेच "त्रिशा कुठेय?" विचारलं. त्रिशा घरून थेट ऑफिस करून, साल्सा ला दांडी मारून नुकतीच फ्रेश होऊन आईने बरोबर दिलेला चिवडा, लोणचं, पापड बॅगेतून काढून ठेवत होती. मीनाक्षीने नकुल कडे बघत आतल्या दिशेला अंगठ्याचा इशारा केला.
"कोण आहे मीने?" त्रिशाने आतूनच आवाज देऊन विचारलं.
"कोणी नाही, सेल्समन होता, गेला." मीनाक्षीने उत्तर दिलं.

Keywords: 

लेख: 

दिव्याखालचा अंधार

पुण्यापासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेड्यात आमची काही शेतजमीन आहे. सुरवातीपासूनच तिथे विजेची सुविधा नव्हती. डिझेलवर चालणारा कृषीपंप आणि तिथे राहणाऱ्या कुटुंबासाठी सौर्य कंदील अश्या सोयींवर भागत होत. पण लांबचा विचार केला, तर वीज असणं फार सोयीच होणार होत. वीज नसण्यामुळे आमच्या राहत्या घरी जेवढी भयानक अडचण झाली असती. तेवढी अडचण शेतावर होत नव्हती. शेताला आणि शेतावर राहणाऱ्या कुटुंबाला वीज नसण्याची सवय होती. गैरसोय होत होती, पण भागवता येत होते.

जिल्हा : अमरावती

'आपला महाराष्ट्र' धाग्यावर अवनीने एक अभिनव कल्पना मांडली. आपल्या गावाखेरीज इतर गावे, जिल्हे आपल्या मित्रमंडळी/नातेवाईकांच्या माध्यमातून ओळखीच्या होत गेलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांची ओळख करून देण्याची! तेव्हा, या जिल्हा-ओळखीतला हा आहे तिसरा जिल्हा - अमरावती!

Keywords: 

ऐल पैल 18 - मिस्टर रोमँटिक

दोघेही तिथून उठून डान्स फ्लोर च्या कडेकडेने गोलाकार उभ्या असलेल्या गर्दीत जाऊन उभे राहीले. नकुलने त्रिशाला त्याच्या पुढे उभी करून तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिने त्याचे हात मफलर सारखे गळ्याभोवती गुंढाळून घेतले.

Keywords: 

लेख: 

ही प्रीत विलक्षण

ती आतुरलेली, व्याकुळ होती धरती,
तो बरसुन गेला घन ओथंबुन वरती

कण कणात भिनले थेंब टपोरे ओले,
मातीत उधळले अत्तर भरले प्याले

ती धुंद, तृप्त तरि आसुसलेली अजुनी!
तो पुन्हा पुन्हा घन बरसुन जाई फिरुनी

ही प्रीत विलक्षण! असा निरंतर खेळ
हिरवळ अंथरतो, गगन धरेचा मेळ ..

सुप्रिया

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle