March 2023

दिंडी चालली.. हर्णैला

मी इथल्या महाराष्ट्र मंडळाच्या अंकात हा लेख मागच्या वर्षी लिहिला होता. तो इथे आणत आहे.

IMG-20220320-WA0015.jpg

शाळेत असताना मार्च महिना आला की वार्षिक परीक्षेचे वेध लागायचे. पण परीक्षेच्या आधी शेवटची मज्जा करायचे दोन सणही मार्चमध्येच यायचे. एक म्हणजे अर्थातच होळी. दुसरा रूढार्थाने ’सण’ नव्हे, पण ’साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ या न्यायाने आमच्या घरी संत एकनाथांच्या पादुकांचं आगमन व्हायचं, तो दिवस आम्हाला सणासारखाच वाटायचा.

Keywords: 

लेख: 

शिरोडकरची शाळा

हुश्श! बसलो एकदाचे आम्ही सगळे गाडीत! तीनचार दिवस नुसती सामानाची बांधाबांधच चालली होती. आता इथून व्ही.टी. आणि मग तिथून नागपूर. ती ट्रेन संध्याकाळी आहे म्हणा. संदीप आणि लहानीला खूपच वाईट वाटत होतं कालपर्यंत, हे घर सोडून जायचं म्हणून. सकाळी स्टेशनवर आल्यापासून मात्र खूश आहेत दोघं. गेल्यावेळेस बाबांची बदली झाली होती तेव्हा मी लहान होते. तेव्हा माझंपण असंच झालं होतं. आज मला एकाच वेळी वाईटही वाटतंय आणि सुटल्यासारखंही.

आठवणीतल्या पाऊलखुणा

'पाऊलखुणा' ही मराठी दुरदर्शन वर १९९३ साली दाखवलेली धारावाहिक मालिका. ही आता युट्यूबवर उपलब्ध नाही. विकिपीडिया वर ही मालिका अमोल पालेकरांची निर्मिती आहे इतकाच त्रोटक उल्लेख आहे.‌ दिग्दर्शन अमोल पालेकरांच होते. मालिकेच‌ कथाबीज अगदी एका ओळीत बसणारे, साधेसे होते. काॅलेज मध्ये जाणारा किंवा फार तर नुकताच पदवीधर झालेला एक तरुण (यतीन कार्येकर) आणि त्याची प्रेयसी (नाव माहिती नाही) ह्या दोघांची फुटकळ कारणांवरून उठसूठ भांडण होतं असतात. ह्यांना आपण सोईसाठी 'तो' व 'ती' म्हणुयात.

सावरीची सुरेल मैफिल

काही काही झाड नकळत्या वयापासून माझ्या मनात ठाण मांडून बसली आहेत,त्याच मुख्य कारण म्हणजे माझ बालपण त्या झाडांभोवती खेळण्यात गेलं आहे. माझं माहेरच घर म्हणजे त्याकाळच्या शहरवजा गाव असलेल्या अंबरनाथमधल मस्त पुढे मागे अंगण असलेलं कौलारू घर. घराला लागून आमचं शेतसुद्धा होत आणि मी चौथीत जाईपर्यंत आम्ही भात, भुईमूग अशी पीकही घेत होतो शेतात. साहाजिकच घराच्या भवताली भरपूर विविध प्रकारची झाड होती.आमचं घर रस्त्यापासून बरच खालच्या पातळीवर होत तर रस्त्यावरून घरात यायला ज्या पायऱ्या होत्या त्याच्या बाजूला एक देवचाफा होता, जो अजूनही भरभरून फुलत उभा आहे आणि त्याच्या बाजूला चक्क शाल्मलीचा भलामोठा वृक्ष होता.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

निसर्ग नोंदी

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी
- ना. धों. महानोर

Keywords: 

लेख: 

जर्मनीतलं वास्तव्य - वासंतिक मिरवणूक - झॉमरटाग्सउमत्सुग (Sommertagsumzug)

दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या रविवारी इथे घड्याळ बदलते ही आता दहा वर्षात सवयीची बाब झालेली आहे. घड्याळ एक तास पुढे केलं जातं, पहिले दोन तीन दिवस जरा भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा सेट होण्यात जातो, पण सगळं पुन्हा नेहमीसारखं चालू होतं. वसंत ऋतू सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. एकदाची थंडी कमी होइल, जास्त वेळ सूर्यदर्शन व्हायला लागेल आणि एकदाचे हिवाळी कपड्यांचे जोखड उतरेल या आशा पल्लवित होतात. खरंतर अजूनही थंडी आहेच, रात्री तापमान एक दोन पर्यंत जातं आहे, पण तरी हवेतला बदलही जाणवायला लागतो.

Keywords: 

लेख: 

पॉईंट लोमा: सॅन डियागोच्या टकमक टोकाची ओळख- भाग १

पॉईंट लोमा म्हणजे सॅन डियागोच्या समुद्रात घुसलेल्या सुळक्याला मी आमचं टकमक टोक म्हणते. कारण, मी इथे बसून दिसणारा नजारा कितीही वेळ टक लावून बघू शकते आणि पूर्वीच्या काळी खरंचच येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवायला ह्या जागेचा उपयोग केला जात असे. पूर्वी इथे एक लाईट हाऊस होतं. सध्या ही जागा कॅब्रियो नॅशनल मॉन्युमेंट म्हणून डेव्हलप केली आहे.
ठिकाणाचा अंदाज येण्यासाठी हा एक मॅपचा स्क्रीनशॉट: 
1

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle