October 2023

शिरसी- याना- सोदे मठ

शिरसी, उत्तर कन्नडा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेलं पर्यटनाचा एक ठिकाण. सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं आणि मलनाड प्रांतामध्ये मोडणार हे ठिकाण.सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे निसर्ग सौंदर्य, घनदाट जंगले , भरपूर पाऊस यांचा जणू वरदहस्त या ठिकाणावर. शेती हा प्रामुख्याने या भागातला मुख्य व्यवसाय. ऐतिहासिक वारसाबरोबरच , निसर्गाच्या मिळालेल्या वरदहस्तमुळे पर्यटक आणि ट्रेकर्सचे हे एक आकर्षण केंद्र आहे.

Keywords: 

डोंगुर्लीच्या कुशीत

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात निळसर समुद्रकिनारे, भव्य अशी प्राचीन मंदिरे आणि गिरीजा घर, दूरवर पसरलेले माड, पोफळी , आंबा , काजू, फणस आणि रातांबे. पोर्तुगीज संस्कृतीचा बराचसा ठसा उमटलेलं व हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेचा सरमिसळ असलेलं ,क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटस भारतातलं एक राज्य. आयुष्यात बरीच वर्ष गोवा पाहण्याचा योग नाही आला, पण माझ्या मनात कॉलेजमध्ये वाचलेल्या माधवी देसाई यांच्या प्रार्थना कादंबरीने बऱ्याच गोव्याचे दर्शन घडवलं होतं. कादंबरी वाचून जवळपास दीड एक दशक झाली पण त्यातली बरीच पात्र आजही मनात घर करून आहेत

Keywords: 

इंक्टोबर २०२३

नीलूताई सध्या बिझी असल्याने धागा काढायची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आय होप एखदं तरी चित्र काढायला जमावं..
तर हे आहेत ह्या इंक्टोबरचे प्रॉम्प्ट्स.. येऊद्या मस्त चित्रं!!

img_6629.png

कलाकृती: 

अचानक घडलेला ट्रेक - बाली पास

स्टोक कांगरी करुन य वर्ष झाली. मधल्या काळात अजून एका एक्स्पिडीशनची तयारी केली पण निघायच्या आदल्या दिवशी तो सगळा प्रवासच रद्द करावा लागला.

मग मध्ये आला लॉकडाऊन.

त्यानंतर जी पहिली संधी मिळाली, ती पदरात पाडून घेतली, त्याच बाली पास ट्रेकची ही गोष्ट.

Keywords: 

जानेवाले कभी नही आते....

माझी आई सौ. स्नेहल चंद्रशेखर जोशी.... हिच्या बरोबर खरंतर माझ्या काही आठवणी नाहीतच. कारण ती हे जग सोडून गेली तेव्हा मी जेमतेम सात वर्षांची होते. मी जे काही इथे लिहितेय ते नातेवाईक आणि जवळच्या कौटुंबिक स्नेह्यांकडून ऐकलेलं आहे.

Keywords: 

लेख: 

पुनःश्च हरिओम - बाली पास ट्रेक

" आप बाली पास करके आये है लगता है " यमुनोत्रीच्या मंदिरातले पुजारी आम्हाला विचारत होते. आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता मंदिर उघडायची वाट पहात थांबलो होतो. ह्यांना कसं कळलं ? हाच प्रश्न खाली उतरतांना वाटेत लागणार्‍या दुकानातून विचारला गेला, तेव्हाही फार आश्चर्य वाटलं. शेवटी आपले रापलेले चेहरे बघून ह्यांना कळलं असावं अशी समजून करुन घेत होतो ते आमचा एक गाईड म्हणाला, सिर्फ बाली पास करके आने वाले लोग इतने जल्दी यहा पोहोच सकते है. नाहीतर खालून वर चढायला सहा शिवाय सुरुवात करता येत नाही.

Keywords: 

थालीपीठ - एकपात्री खाद्यप्रयोग अर्थात वन डिश मील

थालीपीठ हा खूप आवडता खाद्य प्रकार. लहानपणा पासून. विविध वरायटी मध्ये बनू शकणारा. कांद्याचे बेसिक, पातीचे, मेथीचे, उरलेल्या वरणाचे. उरलेल्या पदार्थांचे तर अक्षरश कशाचेही करता येतेच. त्यातले बटाटा किंवा वांग्याच्या भाजीचे especially मस्त लागते.
मला जरी खायला आवडतं असला तरी दर वेळी माझं थालीपीठ छान जमतं च असं नाही. आईचं कसं हुकमी आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असं चविष्ट खमंग बनतं ते काय मला खात्रीपूर्वक जमेना.

पाककृती प्रकार: 

मटार-मखाणा करी

गौरीपुजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात, (२५ लोकांसाठी) दोन भाज्या करायच्या होत्या. त्यासाठी कांदा-लसूण नसलेल्या कोणत्या भाज्या करता येतील हे शोधत होते. एक भाजी ठरली होती ती वैदर्भीय पद्धतीची लाल भोपळ्याची बाकरभाजी. त्यात खोबरं-खसखस वाटण असतं, त्यामुळे दुसरी भाजी थोडी वेगळी हवी होती. नेटवर शोधताना ही रेसिपी दिसली. तेव्हाच मलाही पहिल्यांदाच ही भाजी कळली. मला ही एक रेसिपी पहिली सापडली होती, मग याच नावाने सर्च करून इतरही ब्लॉग वर दिसली. पण मी मंजुळाची प्राथमिक रेसिपी घेऊन त्यात काही बदल केले, त्याची ही पाककृती.

पाककृती प्रकार: 

पुढचे दिवस - बाली पास

ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.

७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.

आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.

निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle