कथा

आवर्त

एका निबिड जंगलातून तो धावत सुटला होता. समोरचं काही दिसत नाहीये, कुठे जातोय कळत नाहीये ... पण एकच गोष्ट ठाऊक आहे की इथून कसंतरी बाहेर पडायचयं ..... त्याने आपल्याला गाठायच्या आत. मागून आवाज येतोय का? की त्याचंच हॄदय त्याच्या छातीच्या पिंजर्‍यावर धडका मारतय? पायात पेटके येतायत ... त्राण कमी कमी होतय. पण निश्चय करून जीवाच्या आकांताने तो पळतोय. आणि मुठीत धरून ठेवलेली ती वस्तू????? दचकून त्याने ती पुन्हा चाचपून पाहतोय, तिच्याभोवतीची बोटं अधिकच घट्ट झालीत. ही वस्तू आपण किती शिताफीनं हस्तगत केली त्याच्या हातून पण मग त्यामुळेच तर तो खवळला. आता आपण त्याच्या तावडीत सापडून चालणारच नाही.

Keywords: 

लेख: 

परीकथा - निसर्गपरी

एका छोट्याश्या गावात श्रावणी आणि राधा नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. श्रावणी १० वर्षांची तर राधा तिची छोटी बहीण शेंडेफळ. त्यांच्या दारासमोर छोटीशी बाग होती. श्रावणी आणि राधा आपल्या आई-बाबांसोबत रोज झाडांना पाणी घालताना, त्यांची मशागत करताना सोबत असायच्या. मध्ये मध्ये त्या स्वतःही काही झाडांना पाइप घेऊन पाणी घालायच्या. श्रावणी कुंडीत, झाडाजवळ पाण्याचा पाइप आणून द्यायची तर चिमुकली राधा पाण्याची धार कुंडीत, झाडाला टाकायची असे दृश्य बर्‍याचदा असे. आई बी किंवा रोपे लावत असताना आईने केलेल्या छोट्या खड्यात बी टाकायचे काम दोघी करायच्या.

लेख: 

पाने

Subscribe to कथा