हॉलिवुडानं आपल्याला दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी माझ्यामते दोनच! (दोनच का? तर लहानपणापासून दूरदर्शन खूप पाहिल्याने 'एक किंवा दोन बस्स!' हे घोषवाक्य मनात ठसलं आहे.) तर दुसरी गोष्ट म्हणजे अर्नोल्ड श्वार्झनेगर.. माहेरचा टर्मिनेटर, थांब कमांडो कुंकू लावते या महासुपरहिट कौटुंबिक अॅक्शनपटांचा महानायक! आणि पहिली म्हणजे ममीचे सिनेमे. 'द ममी' आणि '(तीच) ममी रिटर्न्स'.. अर्नोल्डविषयी बोलण्यासारखं खूप आहे. माझा पत्रमित्रसुद्धा अर्नोल्ड नावाचा स्पॅनिश मुलगा आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेम्यातल्या 'ला टोमाटिना'च्या नाचात माझ्या ताईनेसुद्धा भाग घेतला होता.
सुधा श्रीकांत बरोबर लग्न होऊन घरी आली तेव्हा थोडी बावरून जायची सुरवातीला . दोघे चांगले शिकलेले नोकरी करणारे एकाच जातीचे. ठरवून झालेल लग्न . सुधाला श्रीकांत च्या आईच्या स्वभावाची थोडी कल्पना आली होती. सिंधम्मा कर्नाटकातल्या त्यामुळे थोड्या वेगळ्या असतील असा सुधाचा समाज. त्यात श्रीकांत चे वडील लवकर गेले त्यामुळे सिंधममा थोड्या जासि अपेक्षा ठवून होत्या असा सगळ्याना वाटले. सुधा समजून घेत होती. साडी नेसली पाहिजे, स्वयंपाक शिकून घे वगैरे.
परवा अंजूताई रिलायन्समध्ये भेटली - मुलींसाठी ऑनलाईन स्थळे बघते म्हणाली, मी गारच! म्हणजे ऑनलाईन स्थळेही बघता येतात? सोपं काम आहे म्हणे.. म्हणजे आपली प्रोफाईल क्रीएट करायची फोटो, bio-data इतकं टाकून आणि आपल्याला कोणी इंटरेस्टिंग वाटले तर त्याला/ तिला अॅप्रोच करायचे, मग concerned व्यक्ती फोन्स, इमेल्स, व्हॉट्स अॅप, इतकं करून date वर जातात. लग्न ठरवतात नाही तर मग बाय बाय करतात एकमेकांना. मला माझी वेळ आठवली, बाबांची पूर्ण भरत आलेली स्थळांची डायरी आठवली.
एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुशील, सद्वर्तनी राजा राज्य करत होता. त्याची एक तशीच सुशील, सद्वर्तनी राणी होती. त्यांना एक मुलगा होता. मुलगा म्हणजे राजपुत्रच तो! तो उसळत्या रक्ताचा, मौजमजा आवडणारा तरुण होता. गुरुकुलातून विद्यार्जन संपवून आल्यावर राजवाड्यात डिट्टो डीडीएलजेचा प्रसंग घडला. गुरुकुलातून आलेल्या प्रगतिपुस्तकात राजपुत्राने मिळवलेले गुण आणि निकाल सोडून 'नौकानयनात अ+. नेमबाजी ब. वर्तणूक समाधानकारक.' वगैरे भरताड लिहिलेलं पाहून राजाला निकाल काय तो समजलाच होता, पण त्याने तो काही व्यथित वगैरे झाला नाही.
हातापायाला मुंग्या आल्या.. दरदरुन घाम फुटला. मला ’त्याला’ शोधायलाच हवं. सकाळी घरातून निघाले तेव्हा सगळं ठिक होतं. दुपारी लंच मधे? नाही तेव्हाही सगळं आलबेलच होतं. बहुतेक संध्याकाळी बसमधे चढताना...येस तिथेच काही झालं असावं. आता कसं शोधायचं? हृदयाचे ठोके वाढले आणि मी कंट्रोल हातात घ्यायच्या आत, भितीने कंट्रोल तिच्या हातात घेतला. काळोखी पसरली आणि माझी शुद्ध हरपली.
कोणीतरी तोंडावर पाणी मारलं... "चॉकलेट आहे का कुणाकडे?" असा प्रश्न आजुबाजुला फ़िरला. कुठून तरी चॉकलेट आलं. कुठूनतरी पाण्याची बाटली आली.
आपल्या मैत्रिणींपैकी काहींनी पटकथा शिबिरात भाग घेतला. काही कष्टाळू मुलींनी दोन्ही दिवस तर काही कमी कष्टाळूनी एक दिवस. तरिही सराव म्हणून आम्ही इथं छोटे सीन्स लिहायचं ठरवलं आहे. गोष्ट साधी आहे. तरी बघू कसं जमतंय इंटरेस्ट टिकवून ठेवायला. इथं काही नियम , पद्धती, शिकलेले मुद्दे वगैरे लिहीत नाही. ते चर्चा झाली तर येतीलच.
गोष्ट आपल्या लाकुडतोड्याची आहे. जमेल तुटकी रसाळ पणे, प्रेक्षकांना खुर्चीवर बसून राहायला भाग पाडेल अशी लिहीत राहायचं आहे.
सहभागी मुली.
अवल
विनी,
अगो,
अनु,
सन्मि
ऊन आता फारच कडक होऊ लागलं होतं. मुलं, बायका, पुरुष आता फार वेळ बाहेर जाईनाशी झाली. आसपासचे छोटे झरेही आटले. गुहेबाहेरचे गवतही पिवळे धम्मक झालं. झाडांचे शेंडेही हिरव्याची साथ सोडू लागले. सीतेला कसलीतरी चाहूल लागली होती. मनात आत खूप काही आर्त, हूरहूर लावणारं वारं वाहू लागलं होतं. तिला रामाचा विरह आता अजिबातच सोसवेना. तो सतत बरोबर असावा असं वाटू लागलं.
नवरा गेलाय फिरतीवर, दुसर्या शहरात. घरात मी एकटीच. आता एकटीसाठी काय जेवायला करायचं? साधी खिचडी टाकावी म्हणून मी डाळ-तांदूळ धुऊन पातेलं गॅसवर ठेवून फोडणी केली. तितक्यात...
आशुतोषने सकाळचा चहा पित असतांना नेहमीच्या सवयीने मोबाईल हातात घेऊन मेसेजेस, व्हॉट्स अप चॅटस,एफ. बी. बघायला सुरुवात केली. काही वेळातच त्याच्या स्क्रीनवर व्हॉटस अप पॉप अप आले. अमित अॅडेड यू....अम्याने नवा ग्रुप का तयार केला? असा विचार करतच आशुतोष त्या ग्रुपवर पोचला. अमित अॅडेड निखिल,अमित अॅडेड कुणाल असे एकापाठोपाठ एक मेसेजेस वाचत असतांनाच नंतरच्या मेसेजने आशुतोषला हसूच आले.
अमित चेंज्ड ग्रुप नेम टू ‘लेडीज स्पेशल’.
“अम्या... सकाळी सकाळी टाकली काय रे पहिल्या धारेची?” आशुतोषने पोस्ट टाकली.
पाठोपाठ निखिलही “XXXX, चार मुलांच्या ग्रुपचे नाव लेडीज स्पेशल? :thinking: