डोहाळेजवणात मिळालेला सुंदर ब्रोकेड चा ब्लाऊज पीस होता.ब्लाऊज शिवायचे नव्हते.
गोल्डन श्रग शिवायला टाकायला गेले तर टेलर ने ९०० शिलाई सांगितली. त्याला मनात 'गेलास ढगात' म्हटले आणि २५ रु. चे अस्तर आणून घरी शिवायला घेतला.माझे आणि शिवणाचे विशेष सख्य नाही उसवलेले शिवण्याशिवाय.आणि फॅशन मेकर मशिन साबांचे असल्याने जपून वापरावे लागते तटकन सुई किंवा बॉबिन चा दोरा तुटला तर मला दोन्ही बदलता येत नाही. :)
या सगळ्यातून मनाच्या डोळ्याने बघत आणि कोणतीही मापे न घेता शरीराला गुंडाळून अंदाज घेत शिवलेला श्रग.
माझे बरेच जुने सलवार कमीझ मी बाजुला ठेवुन दिले होते की यांचे काहीतरी करू म्हणुन. तसेच बर्याच ओढण्या पण ठेवल्या आहेत काहीतरी करु म्हणुन. तर त्याची एक बेडशीट बनवली. ५ टॉप + १ ओढणी असे मिळून हे बनवले आहे. थोडे दिवस का होईना बरे दिसेल असे वाटतेय :) घरच्यांना तरी आवडलेय रंग वगैरे. आयडिया माझ्या वहिनीच्या आईची. त्या असे बरेच काही काही करुन घेतात शिंप्याकडून. इथे शिंंपी आणि कष्टंबर आम्हीच! पेक दिवस पदर खोचून लावल्या कात्र्या टॉपना आणि हे बनवले!
टोट bag खूप दिवसांपासून शिवायची होती. खूप चुका करत एकदाची ती पण झाली.
ही अस्तर आणि interfacing लावून केली आहे. नुसत्या एकेरी कापडानी स्ट्रेंग्थ मिळत नाही आणि झोळ पडतो असा अनुभव होता त्यामुळं हा अस्तर आणि interfacing चा तीन लेयर्सचा प्रयोग. यामुळं छान गुबगुबीत फील आलाय. अस्तराला वरचेच काळे कापड वापरले.
वर लावलेला लाल पट्टा लावताना सरळ रेषा गंडलीय जरा त्यामुळं क्वालिटी कंट्रोल
बेल्ट शिवताना पण सिमेट्री गेली असं वाटलं. म्हणून सरळ embroidery stitch वापरला. ज्यामुळं जरा बरा लुक आलाय.
बस्कू आणि टीमने इतका छान उपक्रम (मैत्रिण) सुरू केलाय...पण वेळेअभावी इथे बागड्ता येत नाहीये.
तरी मी केलेल्या बाळंतविड्याचे काही फोटो.
आता काहीजणींना आठवेल की तिकडे मायबोलीवरही हे पाहिल्याचं. बरोब्बर. काही कपडे तेच आहेत. काही नवीन पण आधीच्यातल्या उरलेल्या कापडातलेच शिवले. असं लागतं किती कापड ......चिंगुल्यांच्या टिंगुल्या कपड्यांना!
हा पहा निळा चौकटीचा पायजमा आणि शर्ट.
शर्टावर निळा त्रिकोण आहे तो खिसा नाही बरं .... नुसता एक त्रिकोण लावून त्याला एक बटण लावलय.
१९ एप्रिल ला दुसर्या संस्थळाच्या लेडीजचा एक कट्टा होता रसायनीला त्यासाठी खास मी शिवलेला अनारकली. याच्या लेसेस ही मी कापडापासुन शिवल्या आहेत. एक छोटा गोल पॅच सोडला तर बाकीचं सगळं मी शिवलंय.
कुणाला सेमीस्टीच शिवुन हवा असल्यास मला संपर्कातुन ई-मेल करा.
स्नेहश्रीला खुप घेराचा साध्या पॅटर्नचा अनारकली ड्रेस शिवुन हवा होता तर मॅडमनी मला त्यासाठी ऑर्डर दिली. वे़ळेअभावी मी पुर्ण ड्रेस शिवुन न देता सेमीस्टीचड् शिवुन द्यायचे कबुल केले. तिला वाईन कलरमधे ब्रासो नेट चे मटेरीयल हवे होते, ते आमच्या कडे (बोईसरला) मिळाले, पण अस्तराचे कापड मिळाले नाही. तिने कलर कॉम्बिनेशनसाठी एक वेबसाईट सुचवली, पण त्यातले सेम कॉम्बिनेशन्स बोईसरला मिळणे मुश्कील होते, म्हणुन स्वतःच्या मनानेच एक कॉम्बो शोधला आणि कापड विकत घेतले.