इथे अनिश्काने लिहीलेले वाचून अमेझॉन वरून ब्लॉक्स व कलरिंग मटेरिअल मागवलेले घरी येउन
पडले आहे. हे वाक्य शोले मधील पिस्तौल जेल में आ चुका है ह्या अॅक्सेंट मध्येच वाचावे.
युट्रूब वर विडीओ बघत आहे.
लाकडाचे कोरलेले ब्लॉक्स, कलर च्या बाटल्या, बाइंडरचा मोठा डबा व फिक्सर ची बारकी बाटली आली आहे. पण त्याचे कसे वापरायचे ते प्रमाण दिलेले नाही. तुम्हाला काही माहिती असल्यास लिहा. मी ट्रायल एरर नी करेनच. बाकी टेक्निक व्हिडीओ वर बघितले आहे.
हैद्राबादला ब्लॉक प्रिंटींगचे मोठे केंद्र आहे व उत्तम कपडे साड्याओढण्या मिळतात. तेव्हा पासून हे करून बघायचेच होते.
आज मधल्या खोलीतलं कपाट आवरायला काढलं. जुनी पुस्तकं, मासिकं, मी काहीबाही खरडलेल्या वह्या, वर्तमानपत्रांतली, मासिकांतली आवडलेली कात्रणं लावलेल्या फायली.. कितीतरी महिने.. कदाचित बहुधा वर्षंच झाली असतील, हे कपाट मुळापासून आवरल्याला. बैठकीच्या खोलीतल्या, काचेचं दार असलेल्या कपाटात सहसा नवीन आणलेली, खूप आवडणारी वगैरे गटातली पुस्तकं मी ठेवते. मग जागा कमी पडायला लागली की, काही पुस्तकांची रवानगी या मधल्या खोलीतल्या कपाटात होते. कधीतली मला आवराआवरीचा उत्साह असतो तेव्हा वरवर आवरते हे कपाट. पण गेल्या महिन्यात माझं तसं मोठं आजारपण झालं, तसं मनात हे सगळंच आवरतं घ्यायचे विचार घोळतायत.
"आई लवकर दे गं पोहे मला , उशीर होतोय"
पहाट म्हणावी का मध्य रात्र हा प्रश्न पडावा अशा वेळेला रियाचा आरडा ओरडा ऐकुन आई दचकून उठली आणि त्या पाठोपाठ रितूही...आईच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे पाहून शांतपणे smile देणाऱ्या आपल्या दिदीला पाहुन खरंतर ती चक्रावली होती, इतक्यात तिच्या डोक्यात प्रकाश पडला..
'अभी ! येस्स अभी येणारेय आज. म्हणून मॅडम इतक्या खुष आहेत तर'
"काय ग एवढ्या लवकर...."
आईचं वाक्य पूर्ण होण्या आधीच रितूने खुलासा केला,
"अग आई आज अभी येणारेय ना. मग कशी झोप लागेल त्याच्या रियाला? "
आणि पुढच्या क्षणी तिच्या पाठीत धपाटा पडला
हनी ग्लेझ्ड चिकन सोप्प आहे अगदी.
१. खोलगट पॅनमध्ये दोन चमचे बटर वितळवून त्यात बोनलेस चिकन थाय किंवा ब्रेस्ट पिसेस उलट-सुलट बाजूने मीठ आणि मिरपूड घालून पाच पाच मिनिटे नीट शिजवायचे.
२. एका बोलमध्ये प्रत्येकी पाव कप ऑऑ, लिंबूरस आणि मध, दोन लसूण पाकळ्या ठेचून, एक चमचा सॉय सॉस आणि एक चमचा इटालियन सिझनिंग घालून नीट मिसळायचे.
३. हे पूर्ण मिश्रण पॅनमधल्या चिकनवर ओतून लसणीचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवायचे.सॉसही थोडा घट्ट होऊन चिकनला चिकटला पाहिजे.
मैत्रीणींनो, इथे आपण आंध्रप्रदेशातील जवळपासची फिरण्याची ठिकाण, ईथली संस्कृती, बोली भाषा, सण, इथली फेमस खादाडी ह्याबद्दल लिहू या.
कसे पोहचणार??
विमानसेवा आहेच सोबत ट्रेन्स आणि बस सेवा ही आहे. पुण्याची शताब्दी एक्सप्रेस मला खूप आवडते पण अजून त्याने जाण्याचा योग नाही आला आहे. ती सकाळी ६ ला पुण्यावरून सुटते आणि दुपारी अडीच ला सिकंदराबाद. हुसेनसागर ह्या ट्रेनच आणि माझ खूप जवळच नातं आहे. ह्या ट्रेननेच नेहमी प्रवास असतो. अजून बर्याच ट्रेन्स मुंबईवरून आहेत ज्यांचा पुणेला हॉल्ट असतो.
थोडी टेक्निकल माहिती - झाकणाची भांडी बनवणे खुप नजाकतीचे काम असते. भांडे बनवायचे, त्याच्या गळ्याचे माप घ्यायचे. मग झाकण बनवताना ते माप सतत चेच्क करत रहायचे. मग त्याला वरचा दांडा (गोळा / नॉब ) लावायचा. आणि दोन वेळा भाजायचे. यात दुसर्या भाजण्यात जर ग्लेझ थोडाजरी गळाला, जास्त झाला तरी ते झाकण भांड्यापासून सुटे होत नाही. कधी कधी ते काढताना फुटते. कधी पूर्ण बरणी / कॅसेरोल फुटु शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या परिक्षांमधून पास झालेल्या काही बरण्या तुमच्या समोर आणातेय.
सीबीएससी अभ्यासक्रमानुसार शिक्षण देणार्या काही खूप चांगल्या शाळा हैद्राबादेत आहेत. मेरिडिअन स्कूल, महर्षी विद्या मंदीर , भारतीय विद्या भवन, ज्युबिली हिल्स पब्लिक स्कूल व इतरही आहेत.
ह्या अभ्यासक्रमाची जी काउन्सील आहे त्यांनी भारतभरातील सीबीएससी स्कूलस च्या प्रिन्सिपल्स ची एक कॉन्फरन्स २००६ मध्ये हैद्राबादेत आयोजित केली होती. माझी मुलगी तेव्हा महर्षी विद्यामंदीर
मध्ये दुसरी-तिसरीत होती. ही व हिची मैत्रीण अनुकृती व अनुची आई वसुधा ही आमची लोकल पार्टी. मध्ये मध्ये रिहर्सलला येउन प्रोत्साहन देणारी हसरी सविता आत्या ही एक गेस्ट कलाकार.