September 2018

माझ्या घरी अालेले गणपतीबाप्पा :)

घरी मी अाणि अाई दोघीच असल्याने,गणपती बसवत नाही,पण मोदक असतात अाणि रोज नवा गणपती, यावेळी कंटाळा केला अाणि १ दिवसाअाड रांगोळी काढली, या यावर्षी अाणि मागच्यावर्षी काढलेल्या रांगोळ्या :)

ImageUpload: 

नवरात्र स्पेशल

आपण बायका मुळातच फेस्टिव्ह इन्कलीनेशन असणाऱ्या, म्हणजे या ना त्या प्रकारे नटायला सजायला आवडत आपल्याला, आपल्यातल्या बर्याच जणी नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग वगैरे पण फॉलो करतो, तेवढीच थोडी जास्त मजा.. आणि प्रत्येक साडीवर मॅचिंग जुलरी असेल तर अजून मज्जा.. पण रोज रोज काही मॅचिंग जुलरी घालता येत नाही मग मॅचिंग मंगळसूत्र मिळाला तर, मला खात्री आहे अनेकींना आवडेल.

म्हणूनच साडी किंवा ड्रेसवर जाईल असा मॅचिंग मंगळसूत्र सेट बनवलाय मी, कानातलयांसकट

DSC_2218.jpg
बघा आवडतोय का...

सिवाजी..द बॉस्स

सुरुवातीलाच एक मनुष्य घोषणा देणाऱ्या प्रचंड जनसमुदायातून एका तुरुंगात जातो.शेजारचा तुरुंग वाला त्याला 'काय केलंस म्हणून तुरुंगात आलास' विचारत असतो.आपण नै का, शेजारी कोणी राहायला आलं की 'मूळचे कुठचे, इथे बदली झाली का, अमक्या गावचे का, शिवाजी पेठेशेजारी वाडा आहे त्या अमक्या काकांना ओळखत असाल' वगैरे हिस्टरी दारातच घेतो तसे.इथे आपला नायक सिवाजी 'लोगोका भला किया इसलीये जेल हुई' सांगतो.

Keywords: 

आगंतुक

तुझं माझं नातं म्हणजे love hate relationship

तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम.....इतकं की त्यामुळे माझं अस्तित्व आलं धोक्यात.

माझ्या मनात मात्र तुझ्याबद्दल दुस्वास.. तुझ्या प्रेमापेक्षा कितीतरी पटींनी जास्त

आणि का नसावा ?? मला न विचारता आलास माझ्या आयुष्यात

आणि तेही चोर पावलांनी, माझ्याही नकळत.

किती सुखात होते मी....

प्रेमळ नवरा, गुणी मुली.....सगळं कसं अगदी आखीव रेखीव...

तुझ्यासाठी कुठेच जागा नव्हती - अगदी तसूभरही.. आणि तुझी गरज तर त्याहून नव्हती.

पण तरी तू आलास ....माझ्यावर नसलेला तुझा हक्क गाजवायला

लेख: 

मुळ्याचे मुटके:

मुळ्याचे मुटके:

साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून

दीड वाटी कणिक

एक वाटी रवा

एक वाटी बेसन

एक टीस्पून धने पूड

एक टीस्पून जीरे पूड

एक टेस्पून आलेलसूण पेस्ट

अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)

एक टीस्पून आमचूर

पाव टी स्पून खायचा सोडा

मीठ चवीनुसार

अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल

बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)

पाककृती प्रकार: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle