माझ्या आईच्या माहेरी...सांगलीतील वाळवा गाव तिचं ... गौरी जेवणाला गवसणीच्या पोळ्या आणि खीर करतात. तिच्यामुळे आमच्याकडेही या पोळ्या होतात. आमरस आणि ही पोळी पण खूप छान लागते. मला तर वाटतं गणपतीत मोदकाची उकड उरली की काय करायचं यातूनच याचा शोध लागला असावा.
शाळेच्या ग्रुपवर माझ्याच माहेरच्या कॉलनीत रहाणार्या मित्राने जेव्हा सांगितले की तू या वर्षी ५० वर्षांचा झालास, त्यानिमित्त मोठ्ठं सेलिब्रेशन असणार आहे, तेव्हा काय वाटलं कसं सांगू तुला? ५० नसले तरी २२-२३ वर्षे नक्कीच तुझ्या सान्निध्यात होते मी. तू यायचास तेव्हाचे १०-१२ दिवस म्हणजे मंतरलेले दिवस असत. अजुनही त्याचं गारुड आहे मनावर. लोक उन्हा-पावसाची तमा न बाळगता पायी चालत पंढरीला जातात, शिर्डी गाठतात. काय मिळतं त्यांना असा त्रास सोसून? माझ्या लेखी या प्रश्नांचं जे उत्तर तेच तुझ्यासमवेतचे दर वर्षीचे १०-१२ दिवस जगतानाचे उत्तर....निव्वळ आनंद.
साहीत्यः एक वाटी ओलं खोबर + ५-६ वेल्दोड्याचे दाणे + अर्ध लिंबू+ दोन चमचे लाल तिखट , ( मिठ साखर चविप्रमाणे)
खोबर ,लाल तिखट , भरपूर वेल्दोड्याचे दाणे मिठ अन जराशी साखर असं बारीक ( आजीच्या भाषेत गंधासारख) वाटायच अन त्यात लिंबू पिळायच. फारच झकास लागत! मिरची ब्याडगी असेल तर लाल रंग ही भारी येतो!
“हां तर मी मूळचा पुण्याचा. हे तर तुला कळलंयच आता.” सिद्धार्थ बोलता बोलता हळूच तिच्याकडे पाहत म्हणाला.
“हो. कळलं... पुढे..?” निशाने सरळ प्रश्न केल्यावर जरा नाराजीनेच सिद्धार्थने पुढे सांगायला सुरुवात केली.
“हं.. तर माझं शिक्षण पुण्यातच झालं. अगदी इंजिनीरिंग होईपर्यंत मी पुण्यातून कधीच बाहेर कुठे गेलो नव्हतो. इंजिनीरिंग होऊन जॉब लागल्यावर मात्र पहिल्यांदा मित्र मैत्रिणींबरोबर ट्रीपला जायचं ठरलं.
मोठा ग्रुप होता आमचा. पण त्यातल्या काही मोजक्या लोकांशीच मी बोलायचो. खूप शांत होतो मी”
“काय सांगतोस? तू शांत होतास?” निशाने मध्येच त्याचं वाक्य तोडत विचारलं.
गेल्यावर्षी याच दिवशी मी ओवरीज आणि युट्रस रीमुव करून घरी आले. हिमोग्लोबिन 6 वर आलं होतं. सात आठ महिने पाळी महिना महिना चालू रहात होती. त्यामुळे ऑपरेशन करावं लागलं. त्याक्षणी माझ्या मनातल्या भावनांचा गुंता शब्दबद्ध केलाय..तो शेअर करतेय.
हिन्दी बिग बॉस पहातय का कोणी ?
नाही म्हणता म्हणता मी पहायला सुरवात केली आहे .
तसे ३ च एपिसोड्स झालेत पण नमक मिर्च कम है असं वाटलं !
अतरंगी वियर्डो पब्लिक नाहीच्चे यावेळी , नॉर्मल पब्लिक आहे.
हिन्दी बिबॉ याआधी कधी पाहिले नाही पण खूप ऐकून होते क्रेझी पब्लिक बद्दल.. स्वामी ओम, डॉली बिन्द्रा , राखी सावन्त, राहुल महाजन यासारखी क्रेझी कॅरॅक्टर्स मिसिंग आहेत इथे !
जोड्यांमधे नवरा बायको, गरल्फ्रेंड बॉफ्रे नाहीत, ट्रान्स जेंडर, गे कपल्सही नाहीत !
उगीच मित्र मित्र , गुरु शिष्य, गायक फॅन टाईप जबरदस्तीच्या जोड्या केल्या आहेत.