शीर्षक वाचूनही इथे आलेल्या शूर मुलींचा मी जाहीर सत्कार करेन म्हणते ... शालेय जीवनात ज्याने अंत बघितला पण लिहून संपला नाही असा प्रश्न :वैताग: पण घाबरू नका इथे फक्त तुम्हाला टिप्स लिहायच्या आहेत . आपण एखादया ठिकाणी फिरायला जात असू तर तिथे करायचं शॉपिंग ,फिरायची ठिकाणं, फूड, डूज डोन्ट साठी इथे मदत मागूया.
सुरवात मी करते
Hongkong डिजनी लॅन्ड फिरायला जातोय ,5 दिवसाची ट्रिप असणार आहे त्यातले 2 दिवस डिजनी मध्ये असू , 1 दिवस ओशन पार्क .
मी व्हेज असल्याने सोबत ठेपले ठेवायचा सल्ला मिळाला आहे . माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे, प्लिज हेल्प
माणसांमुळे डोळे अतीगोड (चोक तातलं) :fadfad: होऊन निवलेच आहेत तर आता जीभ गोड करण्याकडे वळूया. तुर्की दोन खंडांच्या काठावरचा देश असल्यामुळे एशियन आणि युरोपियन पदार्थांचा अगदीच गोड संगम झाला आहे. त्यामुळे शाकाहारींसाठी तर गोडाचे भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. अगदी आपल्या गोडाच्या शिऱ्यापासून ते स्पॅनिश चुरोपर्यंत सगळंच त्यांनी आपलंसं केलं आहे.
यावर्षी पहिल्यांदाच ऑथेंटिक थँक्सगिवींगचा घाट घालतेय. इंटरनेटवर प्रचंड रेसिपीज आहेत. कुणाला खात्रीशीर स्टेप बाय स्टेप रेसिपीज माहिती आहेत का? किंवा एखादा ब्लॉग वगैरे. रोस्टेड टर्की, ग्रीन बीन्स कॅसरोल आणि कॉर्न कॅसरोल रेसिपी हवी आहे. बाकी मॅश्ड पोटेटॉज, ग्रेवी, क्रॅनबेरी सॉस येतो मला. पाय बाहेरुन विकत आणेन.
आमची गेल्या काही वर्षात सीझन्ड कॉर्डकटर्स होण्याकडे वाटचाल चालली आहे. कॉर्ड कटींग म्हणजे केबल वगैरे बंद. आमचीही वाटचाल करण्यामागे दोन कारणे आहेत अर्थात. १) पैसे वाचवणे. २) आयुष्यातील noise कमी करणे. सेन्सरी ओव्हरलोड कमी करणे.
इकडे अमेरिकेत विशेषतः केबल भयंकरच महाग आहे! ४०-५० $ पासून सुरवात होत १००-१५०-१८० $ असं कितीही वाढू शकते बील. ह्यामध्ये साधारण १० पासून २५०-४५० इतके चॅनल्स बघायला मिळतात.
लहानपणी घरातले शाळेत सोडून जातात
तेंव्हा दोन पर्याय असतात समोर. एकतर आजूबाजूला रडणाऱ्या सगळ्यांसारखं भोकाड पसरून रडणे किंवा पाणी डोळ्यातच थोपवत शाळा सुटायच्या घंटेची वाट बघणे.
आपण दुसरा निवडतो. खरंच किती शिकतो ना स्वत:कडूनच?
परीक्षा देत देत मोठे व्हायला लागतो
एखादा पेपर जातो अवघड. वाटत झालं आता, मार्क्स कमी पडणार आणि ते तसे पडतातही.
वडील सहामाहीच्या प्रगतीपुस्तकावर सही करताना काही म्हणत नाहीत पण ते मार्क्स आपल्याच डोळ्यात खुपतात
मग पुढच्या चाचणीत आपण त्या विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून ते जेतेपदाच्या निशाणीसारखे मिरवत आणतो प्रगतीपुस्तकावर.
डोक्यात काहीतरी नवीन खूळ येतं आणि ते शांत बसू देत नाही. मागच्या वर्षी लेकीकडे युएसएला गेलो होतो. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच होता. वाचून वाचून किती वाचणार आणि पाहून पाहून किती टीव्ही बघणार? नवरात्र झाल्यावर इंडियन स्टोअरमध्ये गेलो तर मराठी/भारतीय फराळाच्या पदार्थाने व दिवाळीच्या सामानाने दुकाने भरलेली, सजलेली होती. डाॅलर किंमती म्हणजे त्याचे रुपयांतर बघून डोळे विस्फारले. त्यापेक्षा कितीतरी स्वस्तात व चविष्ट पदार्थ घरी करता येऊ शकतो, असा ठराविक पिढीजात ममव (मराठी मध्यमवर्गीय) विचार आला नाही तर... असं कसं बरं व्हावं...???
- खजूर ५०० ग्रॅम (सुपर मार्केट मध्ये बिया काढलेल्या असलेलं पॅक घेतले होते)
- अंजीर २०० ग्रॅम (ताजे फळं नाही, ड्राय फिग चे पॅक)
- सुका मेवा - काजू, बदाम, पिस्ता प्रत्येकी मुठभर (तसे अंदाजे पंचे)
- ओट्स एक छोटी वाटी
- राजगिरा ( ऑप्शनल, पण मी टाकला होता)
- डेसिकेटेट कोकोनट
कृती
- काजू, बदाम, पिस्ता हे कढई मध्ये रोस्ट करून घ्यावे आणि थंड झाल्या वर मिक्सर मधून ओबड धोबड वाटून घ्यावे. ( १-२ दा च घुर्र)
- ओट्स ही थोडेसे रोस्ट करून (हाताला गरम लागतील तितकेच) आणि थंड झाल्यावर मिक्सर मधून १-२ दा च घुर्र