June 2021

कृष्णडोहाच्या पैलतीरी

मुखबंधन : ही एक काल्पनिक कथा आहे. राधाकृष्ण यांच्या कित्येक कथा प्रचलित आहेत. पण गोपींच्या कथा फारशा ऐकिवात नाहीत. शरद पौर्णिमेच्या रासाच्या खेळापुरतेच त्यांचे जनमानसातले स्वरूप सिमीत आहे. सर्वच गोपगोपी कान्हावर जवळजवळ तितकेच प्रेम करायचे असे मला वाटते म्हणून ह्या काल्पनिक गोपीला नायिका करून मी कथा लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य गोष्टींचा आदर रहावा तरीही काल्पनिक गोपीला सुद्धा न्याय मिळावा म्हणून त्यांचे आपसातले कमीत कमी संवाद कथेत येऊ दिले आहेत. ही खूप साधी सहज कथा आहे. मी स्वानंदासाठी लिहिली आहे आणि वाचून तुम्हालाही आनंद मिळावा एवढा सरळ हेतू आहे.

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण

इथून पुढे.....
कृष्णडोहाच्या पैलतीरी ** पंचम चरण

त्या विचारांनी तिच्या हस्तांनाही वेग दिला. सकाळची कामं भराभर आटोपली पण मध्यान्ह काही होईना ! मगं गुणवंती मावशीला अजून कार्य सांगण्यासाठी टुमणे लावले, व लोणी काढायचे काम कमळेकडून आग्रहाने स्वतःकडे घेतले. मावशीला ही चलबिचल लक्षात येऊन त्या म्हणाल्याही "अगं तुझी आजची कार्यसंपन्न करण्याची गती बघता तू तर पहाता पहाता भांडभर नवनीत काढशील किंवा तेच भयाने तरंगायला लागेल क्षणभरात !"

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठं चरण

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** षष्ठम् चरण

सर्व सख्या त्यांच्या भोजनसामग्रीचे वाडगे व स्वच्छ वस्त्राच्या गाठोडीत बांधलेल्या दशम्या घेऊन निर्धारित समयावर एकत्र निघाल्या.

मुग्ध व मधुर हितगूज करत त्यांची नाजूक पावलं यमुनेच्या काठाकाठानी पडत होती. प्रत्येकीने चौघींना पुरेल इतकी शिदोरी घेतली होती. उत्साहाने जरा जास्तच घेतल्या गेले हे त्यांना बोलताना लक्षात आले. कुणी बालगोपाल दिसले तर त्यांच्यासह हा खाऊ वाटावा असे त्यांच्या मनात आले.

लेख: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंंतिम चरण

इथून पुढे......

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** अंतिम चरण

शरदपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी नारायणी परत जाणार आहे हे सख्यांना कळाल्यावर त्यांनी शरदपौर्णिमा नित्यापेक्षा अधिकच उत्साहाने साजरी करायचे ठरवले. त्यासाठी सर्वच सख्या स्वतःकडील सर्वात सुंदर वस्त्र व अलंकार नारायणीने परिधान करावा असा आग्रह देखील करू लागल्या. त्यांचे ते निष्पाप, निर्व्याज प्रेम पाहून नारायणीला गहिवरून आले. तिच्याकडे असलेल्या वस्त्रालंकारात ती संतुष्ट आहे हे त्यांना पटवून द्यायला तिला बरेच प्रयास करावे लागले.

लेख: 

रूपेरी वाळूत - ८

केक खाऊन सगळे आपापल्या टेबलवर सेटल होताच डीजेने डान्सची घोषणा केली. सगळे दिवे बंद झाली आणि झगझगीत फोकस मिनूचा हात हातात घेऊन डान्स फ्लोरवर जाणाऱ्या वरूणवर पडला. आय फाउंड अ लव्ह.. फॉर मी.. म्हणत एड शीरानचा आवाज सगळीकडे पसरला. त्या तालावर मिनू वरूणचा स्लो वॉल्ट्झ सुरू झाला आणि रात्र रोमँटिक झाली. एकेका ओळीवर हौशी लोकांनी कोरस सुरू केला. चार कडवी झाल्यावर गिरकी घेऊन मिनू थांबली आणि तिने बाकी कपल्सना जॉईन होण्याची रिक्वेस्ट केली. त्यांच्या नातेवाईकांपैकी तीन चार जोड्या जॉईन झाल्या आणि गाणं पुन्हा सुरू झालं.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

कोरोना आला पाहुणा:

कोरोना आला पाहुणा:
मंडळी किती लपवलं होतं आमचं घर त्याच्यापासून वर्षभर! नजर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत होतो घरातले सगळे मेम्बर्स!! तरीही त्याचं लक्ष गेलं कसं काय ते महत्त्वाचं नाही पण गेलं हे खरं...हळूच शिरकाव करत त्याने एकेकावर आपला अंमल दाखवायला सुरुवात केली. एक दोन दिवस ताप हळूहळू करत सगळ्या चौदा जणांवर आपला प्रभाव दाखवू लागला.

Keywords: 

रूपेरी वाळूत - ९

पलाश त्याची कामे करताना मधून मधून गर्दीत नोराला शोधत होता. अचानक ती दिसेनाशी झाली होती. पायल तर आधीच तिच्या वडिलांबरोबर निघून गेली होती. मिनूने त्याला गाठून नोराची चौकशी केल्यावर तो अगदीच गोंधळून गेला. मिनूलाही न सांगता ही गेली कुठे... त्याने बेकरीच्या मोबाईलवर कॉल केला. मारिया आंटीने फोन उचलला.

"मिया तुकाच फोन करत होता, माया येत होता पन पुलावरना पानी गेला. त्याला फोनपण लागत नाही. पाऊस थांबला की नोराला सकाळी धाडून देशील काय?" त्या म्हणाल्या.

Keywords: 

लेख: 

फूड स्टायलिंग - कोथिंबीर

कोथिंबीर - शिर्षक वाचून जरा विनोदी वाटत असेल पण कोथिंबीरीत इतकं पोटेन्शियल आहे की त्यावर एक अख्खा लेख लिहिता येईल. आम्हाला कुकिंग सकट एक डिश करायला कमीत कमी १ तास लागतो. कुकिंग, डिश क्लिन करून त्यात खाली कणिक भरून, ग्रेव्ही, पिसेस सेट करून प्लेसमेंट ठरवायची, पदार्थाचं फिनिशिंग करायचं, आजूबाजूचे प्रॉप्स ठेवायचे आणि फायनल क्लिक घेण्याच्या आधी कोथिंबीर किंवा पुदिना किंवा अजुन काही, जे गार्निश शोभतय ते ठेवायचं, टेकच्या लास्ट मिनिट ला हीरोइन एकदा आरशात बघून तीट पावडर ठीक करते तसंच!

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - १०

"हम्म... कपडे! ते मी रात्रीच धुवायला दिले. ड्रेस थोडा फाटला होता तोही नीट करून येईल. इतक्यात यायला हवे." तो सहज म्हणाला.

"व्हॉट?!" ती उडालीच. "म्हणजे.. तू.." तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. शिट! म्हणजे... इनर्सपण! विचारानेच ती लालेलाल झाली.

"डोन्ट वरी, मी नाही. तूच ते काढून दिले आणि रोब घातलास." तो हसत म्हणाला.

ओह, थँक गॉड! तिने निःश्वास टाकला आणि त्याच्याकडे बघून हसली.

"ओके तू आता शांतपणे नाश्ता कर, कपडे आले की थोड्या वेळात आपण निघू. मी आलोच.." म्हणून टॉवेल उचलून तो बाथरूममध्ये गेला.

Keywords: 

लेख: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle