June 2021

ऑयकाॅसच्या संचालिका केतकी घाटे - मुलाखत

भारतीय संस्कृती ही पर्यावरण विचारी आणि निसर्गसंवर्धक आहे. प्राचीन संस्कृत वाड्मयात त्याचे दाखले सर्वत्र मिळतात. वराहपुराणात सांगितलंय की -
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत् तिष्ठान्ति मेदिन्यां संतति, पुत्र पौतृकी ॥
म्हणजे जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने, आणि सरोवर आहेत तोपर्यंत तुम्ही, तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील. हे वाक्य प्रश्नार्थक झालंय ना?

Keywords: 

रूपेरी वाळूत - ४

रविवारी सकाळी शिल्लक एकुलत्या एक गेस्टने चेकआऊट केल्यावर पलाश कामाला लागला. लग्न जरी पुढच्या मंगळवारी असले तरी तयारीला दिवस खूप कमी होते. कोल्हापूरला नेहमीच्या दुकानात कॉल करून त्याने ग्रोसरीची ऑर्डर दिली. भटजींची तारीख बुक केली. गावात पक्याला झेंडूची फुले, आंब्याच्या डहाळ्या, केळीचे खांब आणि पाने, गुलाबाचे हार वगैरे लिस्ट दिली. संध्याकाळच्या कॉकटेल पार्टीसाठी ऑर्किड्स बूक करून ठेवली. ड्रिंक्सची लिस्ट दुकानात पाठवली. फेटेवाला आणि मेहंदीसाठी गावातली एक मुलगी सांगून ठेवली. आता फक्त पार्टीसाठी वेडिंग केक शिल्लक होता.

Keywords: 

लेख: 

रूपेरी वाळूत - ५

टर्रर्र. टर्रर्र... टर्रर्रर्र... टर्रर्रर्रर्र....

डोक्याशी वाजणारा अलार्म स्नूझ करायला मोबाईल बराच चाचपूनही तिच्या हातात सापडत नव्हता. शेवटी उठून बसत तिनेच रात्री उशीखाली सरकवलेला मोबाईल बाहेर काढून अलार्म बंद केला. शिट!!! नऊ वाजले! तिने कपाळावर हात मारला. तिला तासाभरापूर्वी घराबाहेर पडायला हवे होते आणि ती अजून अंथरुणातच होती. घर शांत होते म्हणजे सगळे आपापल्या कामांना बाहेर पडून गेले होते. तिने पटकन ब्लॅंकेट बाजूला केले आणि पळापळ करत कामाला लागली.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

कोमिन्स्की मेथड

नेटफ्लिक्सवरील सिरीज ‘कोमिन्स्की मेथड‘ आज पाहायला घेतली. (थँक्स नी) चौथा एपिसोड पण सुरू झाला. तसा विषय ग्राउंडब्रेकिंग अ‍ॅज सच नाहीये पण तरीही फार कॅप्टिवेटिंग आहे. मला सगळीच लोकं आवडतायत!
सिरीजमधले काय आवडतंय/नाही आवडत आहे ह्यावर चर्चा करायला धागा..

रूपेरी वाळूत - ६

समोर फोटोग्राफरकडे बघत स्माईल देतादेता मिनूला ती दिसली. डोळे मोठे करून तिने हाताने इकडे ये म्हणून इशारा केला. नोराने ओठांनी सॉरी म्हणत कानाची पाळी पकडली आणि पटकन मिनूशेजारी जाऊन बसली.

"तू मार खाणारेस माझ्या हातून! लग्न संपू दे फक्त. कुठे होतीस?" मीनू चेहऱ्यावर राग न दाखवता समोर बघून हसत म्हणाली.

"सॉरी यार, काल खूप काम होतं त्यामुळे उठायला उशीर झाला. नवरीबाई गोड दिसताय एकदम, मेहंदी मस्त रंगली!" नोरा हसून तिच्या कानाशी कुजबुजत म्हणाली.

"थँक्स! बट समवन्स लूकींग हॉट टुडे! आजूबाजूला बघ सगळे डूड्स तुझ्यावर डोळा ठेऊन आहेत". मिनू तिला डोळा मारत म्हणाली.

Keywords: 

Taxonomy upgrade extras: 

कृष्णडोहाच्या पैलतीरी * तृतीय चरण

पहिले चरण : https://www.maitrin.com/node/4245
दुसरे चरण : https://www.maitrin.com/node/4246

कृष्णडोहाच्या पैलतीरी ** तृतीय चरण

लेख: 

रूपेरी वाळूत - ७

दाराबाहेर उन्हात चमकणारी थार पाहून नोराच्या पोटात खड्डा पडला. केक सांभाळत, खड्डे चुकवत कमीत कमी स्पीडने ब्लू लगूनपर्यंत पोहोचायला पाऊण तास तरी लागेल. पाऊण तास एकटीने या माणसाबरोबर घालवणे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तरीही धीर करून ती उभी राहिली. तिच्याबरोबर आतून ममाचा मदतनीस ऑली हातात केक बॉक्स घेऊन आला. ड्रायव्हर सीटवर तिच्या ओळखीचे जेलने सेट केलेले केस किंवा महागडा रेबॅन न दिसता वेगळंच डोकं दिसत होतं. ती पुढे जायच्या आत तो माणूसच खाली उतरला.

"हॅलो मॅम, मला पलाश सरांनी केक न्यायला पाठवलंय. मी मुकेश, रिसॉर्टवर काम करतो." तो हसून म्हणाला.

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle