March 2022

Nee's 7th anniversary collection - April 2022

7 वर्ष पूर्ण हे स्पेशल असते म्हणतात. तर त्या निमित्त मी ही थोडी नवी दिशा, नवी वाट धुंडाळायचा प्रयत्न करते आहे.
या कलेक्शनमधे दागिने नाहीत. दागिन्यांच्या पलिकडे हे माध्यम शोधायचा हा छोटासा प्रयत्न
इंग्लिशबद्दल माफ करा.

MW 02

जाल्यात मासोली - Fish in net
Steel and brass wire fish inspired by fish motif in Odisha sarees. Fish caught in copper wire net. Acrylic on canvas.
Diameter - 10.7 inches
MW 02t.jpg

Keywords: 

कलाकृती: 

स्टेट, नॅशनल पार्क्स - ६. 'Beginner's Luck' - Waterton Canyon

सुचना:
तिसर्‍या पॅराग्राफनंतर एक सापाचा फोटो आहे. तसा काही भयावह नाही पण कुणाला पहावत नसल्यास म्हणुन आधी सांगतेय. मला पुर्वी सापांचे फोटो पाहुनही त्रास व्हायचा. मी फेबु, इन्स्टा स्क्रोल करताना सापाचा फोटो दिसला तर फोन फेकुन देते कधीकधी घाबरुन. लहान असताना आमच्या घरी एक प्राणीमित्र यायचा. एकदा त्याने हौसेने एक फोटो अल्बम आणलेला आम्हाला दाखवायला. मी पान उलटल्यावर सापाचा फोटो पाहुन दचकुन अल्बम उघड्या दाराबाहेर फेकुन दिलेला. फारच लाईव्ह फोटोग्राफी होती त्याची. माझी तेवढी नाहीच पण आता निदान थांबुन सापांचे फोटो वगैरे काढण्याइतकी प्रगती आहे.

स्टेट, नॅशनल पार्क्स - ८. 'कुछ तो गडबड है दया'- Golden Gate Canyon

पार्कच्या वाटेवर एका फुड जॉइंटमध्ये जाऊन पॅक्ड सुशी घेतली. कमी मेसी आणि हेल्दी म्हणुन. शहराबाहेर पडायच्या आधी अशा बर्‍याच टिवल्याबावल्या केल्या. का? तर आज काही जास्त अंतर कापायचे नाहीए तर कशाला घाई. निवांत पेट्रोल भरत, स्टारबक्समध्ये कॉफी पीत अशी चालले होते. शहर सोडले आणि मी अपेक्षा केली नव्हती इतका मोठा घाट लागला. या वाटेवर मी कधी आलेले नव्हते त्यामुळे घाटात गाडी चालवायची आहे ही कल्पना नव्हती. पाठी लावलेली सायकल पडत तर नाही ना हे सारखे आरशात बघत होते. किती वळणे आली आणि गेली. प्रत्येक वळणावर दरीचे रम्य दृष्य होते. मध्ये मध्ये फलक दिसत होता पार्कचा, तो फॉलो करत राहिले आणि पोचले एकदाची.

स्टेट, नॅशनल पार्क्स - ९. 'Once is a mistake,'- Golden Gate Canyon

नारिंगी ठिपका पाहुन थबकले आणि त्याच वेळेस एक जाणीव झाली की सगळे काही चिडीचुप झालेले आहे. भयाण शांतता म्हणतात तसे. एकाही पक्ष्याचा आवाज नाही, झाडीत खारींची सळसळ नाही, काहीच नाही. वाचुन ठाऊक होते की अशी अचानक शांतता जेव्हा पसरते तेव्हा आजुबाजुला काहीतरी धोका असतो. मोठा जंगली प्राणी किंवा पक्षी किंवा अजुन काही. नारिंगी रंगाचा कुठलाच प्राणी इकडच्या जंगलांत नसतो त्यामुळे तो ठिपका म्हणजे शिकारीच होता हे नक्की झाले. पण तो बराच दुरवर आहे तर मग इथे स्मशानशांतता का? नक्कीच प्राणी असावा आसपास. हृदयाचे ठोके वाढले. स्प्रेवर हात गेला. बाजुला नजर गेली तर तेथे ही गुहा दिसली.

स्टेट, नॅशनल पार्क्स - १०. 'बुंदों से बाते'- Golden Gate Canyon

सुप आणि कॉफी पिऊन तरतरी आली. पाऊस पडु लागला तसा एका झाडावर प्लास्टिक ओढुन जरा आडोसा तयार केला आणि दगडावर पाऊस पहात बसले. सुरुवातीला पावसाचा वैताग वाटला. डोंबिवलीत मोठे झालेले कधी पाऊस एंजॉय करतात काय? डोंबिवलीकरांचा पाऊस म्हणजे वैताग, आणि चिखल एवढेच. शिवाय माझ्या फक्कड कुकिंग प्लॅनचे बारा वाजले. बरोबर आणलेले तांदुळ, अंडे, मीठमसाला आता काही उपयोगाचे नव्हते. या पावसात काहीही शिजवणे नको वाटले. नुसतेच भांडेभर पाणी उकळुन ठेवले. रेडीमिक्स खाऊ जरा वेळाने म्हणुन. कोलोरॅडोचा पाऊसही नुसता गारेगार असतो. बर्फाचे पाणी पडावे असा.

पाने

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle